सुषमा स्वराज जयंती : सर्वोच्च न्यायालयातील वकिली ते भाजपचा सर्वात प्रभावी महिला चेहरा; कसा होता स्वराज यांचा राजकीय प्रवास?

आपलं वकृत्व, इंग्रजी, हिंदी आणि संस्कृत भाषेवरील प्रभुत्व, प्रभावी नेतृत्व कौशल्य, भाजपचा आक्रमक, पण संयत चेहरा अशी ओळख असलेल्या सुषमा स्वराज यांची आज जयंती आहे. त्यानिमित्त त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर छोटासा प्रकाश

सुषमा स्वराज जयंती : सर्वोच्च न्यायालयातील वकिली ते भाजपचा सर्वात प्रभावी महिला चेहरा; कसा होता स्वराज यांचा राजकीय प्रवास?
सुषमा स्वराज
Follow us
| Updated on: Feb 14, 2022 | 5:00 AM

मुंबई : आपलं वकृत्व, इंग्रजी, हिंदी आणि संस्कृत भाषेवरील प्रभुत्व, प्रभावी नेतृत्व कौशल्य, भाजपचा आक्रमक, पण संयत चेहरा अशी ओळख असलेल्या सुषमा स्वराज (Sushma Swaraj) यांचा जन्म 14 फेब्रुवारी 1953 रोजी हरियाणातील अंबाला छावणी परिसरात झाला होता. त्यांचे वडील हरदेव शर्मा हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (Rashtriya Swayamsevak Sangh) स्वयंसेवक होते. त्यामुळे सुरुवातीपासूनच त्या संघाशी संबंधित होत्या. अंबाला येथिल सनातन धर्म महाविद्यालातून स्वराज यांनी संस्कृत आणि राज्यशास्त्र विषयात बीए केलं. त्यानंतर पंजाब विद्यापीठातून (Punjab University) कायद्याचं शिक्षण घेतलं. पुढे 1970 पासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून त्यांच्या आंदोलनात्मक आणि राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली.

स्वराज यांनी 1973 मध्ये सर्वोच्च न्यायालयात आपल्या वकिलीला सुरुवात केली. त्यावेळी जयप्रकाश नारायण यांच्या संपूर्ण क्रांती आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या काळात लादलेल्या आणीबाणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयात वकिली करणारे स्वराज कौशल यांच्याशी सुषमा यांची ओळख झाली. या ओळखीचं रुपांतर मैत्रीत आणि मैत्रिचं पुढे प्रेमात झालं. 1975 मध्ये या दोघांनी विवाह केला. स्वराज कौशल हे जॉर्ज फर्नांडिस यांचे सहकारी होते. त्यामुळे सुषमा स्वराजही पुढे फर्नांडिस यांच्या चळवळीची कायदेशीर बाजू सांभाळू लागल्या. इतकंच नाही तर आणीबाणीच्या काळात गाजलेल्या बडोदा डायनाईट प्रकरणात जॉर्ज यांचा बचाव करणाऱ्या वकिली समुहात सुषमा स्वराज यांचाही समावेश होता. पुढे पती स्वराज यांनी आपली वकिली कायम ठेवली तर आणीबाणीनंतर त्या भाजपमध्ये दाखल झाल्या. 1977 मध्ये वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी त्या हरियाणातून आमदार आणि मंत्रीही बनल्या. पुढे त्यांनी राष्ट्रीय राजकारणात प्रवेश केला आणि कधीही मागे वळून पाहिले नाही.

Sushma Swaraj 2

सुषमा स्वराज आणि स्वराज कौशल

सोनिया गांधींविरोधातील बेल्लारीची निवडणूक

सुषमा स्वराज यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याविरोधात 1999 मध्ये बेल्लारीतून दंड थोपटले होते. सोनिया यांनी अमेठी आणि बेल्लारी अशा दोन ठिकाणाहून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यावेळी भाजपनं परदेशी सून विरुद्ध भाजपची मुलगी अशी प्रचारनिती आखली होती. माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी हे देखील स्वराज यांच्या प्रचारासाठी बेल्लारीत आले होते. असं असलं तरी निकाल काय लागणार हे स्पष्टच होते. मात्र, तरीही स्वराज यांनी निवडणूक लढण्याचे धाडस दाखवले. मात्र त्या निवडणुकीत स्वराज यांना पराभव पत्करावा लागला होता.

दरम्यान, सुषमा स्वराज यांच्यावर त्यावेळी केलेल्या दोन वक्तव्यामुळे त्यांच्यावर दोन शिक्के कायमस्वरुपली लागले. त्यातील एक म्हणजे स्वराज यांनी सोनिया गांधी पंतप्रधान झाल्या तर केशवपन करुन श्वेतवस्त्रांमध्ये राहीन असं वक्तव्य केलं होतं. मात्र, सोनिया गांधी पंतप्रधानपदी विराजमान झाल्या नाहीत आणि स्वराज यांनाही त्यांचं वक्तव्य अमलात आणावं लागलं नाही. तर दुसरा मुद्दा म्हणजे, याच निवडणुकीत स्वराज यांनी बेल्लारीचे वादग्रस्त खाणसम्राट रेड्डी बंधू हे आपल्या भावासारखे आहेत, असंही वक्तव्य केलं होतं.

Sushma Swaraj 1

सुषमा स्वराज

परराष्ट्र मंत्रीपदाची कामगिरी गौरवास्पद

मोदी सरकारच्या पहिल्या टर्ममध्ये सुषमा स्वराज यांच्यावर परराष्ट्र खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यांनी परराष्ट्र मंत्रालयासारखं खातं लोकाभिमुख केलं. परराष्ट्र मंत्री असताना स्वराज अवघ्या एका ट्विटच्या माध्यमातून जगाच्या कानाकोपऱ्यात असलेल्या भारतीयांना मोलाची मदत केली. तुम्ही जगात कुठेही असा, तुमचा देश तुमच्या मदतीसाठी तत्पर आहे, अशी भावना स्वराज यांनी परदेशात असलेल्या भारतीयांच्या मनात निर्माण केली होती. इतकंच नाही तर स्वराज यांनी पासपोर्ट लवकर मिळावा म्हणून जी ऑनलाईन सुविधा सुरु केली. तो अगदी महत्वपूर्ण निर्णय ठरला. ज्यामुळे अनेकांचे पासपोर्टच्या अडचणी संपल्या. याच साठी त्यांनी मोबाईल अॅप देखील आणले.

महाराष्ट्रातील निवृत्त अधिकारी असलेल्या कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने अटक केल्यानंतर सुषमा स्वराज यांनी ज्या पद्धतीने काम केले. ते महत्त्वाचे ठरले. याच प्रकरणात त्यांनी हरीश साळवे यांना आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताची बाजू मांडण्यात पाठवले. ज्याचा फायदा झाला. तसंच परदेशात अडकलेल्या अनेक भारतीय लोकांना त्यांनी ज्या प्रकारे तत्परतेने मदत केली. ती नक्कीच वाखाणण्याजोगी राहिली.

त्याचबरोबर चुकून पाकिस्तानात पोहोचलेली दिव्यांग युवती गीता 10 वर्षानंतर सुषमा स्वराज यांच्या प्रयत्नाने भारतात परतली होती. 26 ऑक्टोबर 2015 मध्ये जेव्हा गीता भारतात परतली तेव्हा तिचा भारत की बेटी असा उल्लेख स्वराज यांनी केला होता. इतकंच नाही तर त्यांनी गीताच्या आई-वडिलांच्या शोधासाठी 1 लाख रुपयांचं बक्षीसही जाहीर केलं होतं.

Sushma Swaraj 3

चुकून पाकिस्तानात गेलेल्या गीताला भारतात आणले

निवडणूक न लढण्याचा निर्णय आणि निधन

सुषमा स्वराज यांनी आजारपणामुळे 2019 ची निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्या सक्रीय राजकारणापासून दूर झाल्या. असं असलं तरी काश्मीरमधील 370 कलम रद्द केल्यानंतर त्यांनी भाजप सरकारच्या निर्णयाचं स्वागत केलं. ‘हा दिवस या जन्मात पाहायला मिळाला अशी आपली इच्छा होती, तू पूर्ण झाली’, अशी प्रतिक्रिया स्वराज यांनी दिली होती. पुढे 6 ऑगस्ट 2019 रोजी वयाच्या 67 व्या वर्षी दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरु असताना कार्डिअॅक अरेस्टमुळे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यावेळी संपूर्ण भारत शोकाकुल झाला होता.

सुषमा स्वराज यांच्या नावे नोंद असलेले राजकीय विक्रम!

>> स्वराज एखाद्या राजकीय पक्षाच्या पहिल्या महिला प्रवक्त्या ठरल्या. >> हरियाणात जनता पार्टीच्या त्या सर्वात कमी वयाच्या प्रभारी राहिल्या. >> हरियाणा सरकारमध्ये सर्वात कमी वयाच्या कॅबिनेट मंत्री >> दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री >> राष्ट्रीय पातळीवर भाजपच्या पहिल्या महिला कॅबिनेट मंत्री >> आऊटस्टॅन्डिंग पार्लमेंटरियन पुरस्कार मिळवणाऱ्या एकमेव महिला खासदार >> मोदी सरकारमधील पहिल्या पूर्णवेळ महिला परराष्ट्र मंत्री >> 2009 मध्ये लोकसभेत पहिल्या महिला विरोधी पक्षनेत्या >> भाजपच्या पहिल्या महिला राष्ट्रीय मंत्री

11 जून, 1996 चे सुषमा स्वराज यांचे लोकसभेतील गाजलेले भाषण

इतर बातम्या :

‘सरकार गेल्यापासून देवेंद्र फडणवीस फ्रस्ट्रेशनमध्ये’, आदित्य ठाकरेंचा जोरदार टोला

Video : ‘नाना.. हिंमत असेल तर सागर बंगल्यावर येऊन दाखव’, प्रसाद लाड यांच्याकडून एकेरी उल्लेख, पटोलेंना थेट आव्हान

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.