बंगालमधून सर्वात मोठी बातमी, या नेत्याच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ, ममता बॅनर्जींसोबत खास नातं

पश्चिम बंगालमधून मोठी बातमी समोर आली आहे. सुवेंदू अधिकारी हे पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री असणार आहे. अमित शहा यांच्या उपस्थितीत आज झालेल्या आमदारांच्या बैठकीत अधिकारी यांची भाजपचे सभागृह नेते म्हणून निवड करण्यात आली आहे.

बंगालमधून सर्वात मोठी बातमी, या नेत्याच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ, ममता बॅनर्जींसोबत खास नातं
Adhikari CM
Image Credit source: Google
| Updated on: May 08, 2026 | 5:02 PM

पश्चिम बंगालमधून मोठी बातमी समोर आली आहे. सुवेंदू अधिकारी हे पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री असणार आहे. अमित शहा यांच्या उपस्थितीत आज झालेल्या आमदारांच्या बैठकीत अधिकारी यांची भाजपचे सभागृह नेते म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यामुळे आता त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. सुवेंदू अधिकारी हे 2020 मध्ये भाजपात सामील झाले होते. त्याआधी ते ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये होते. या दोन्ही नेत्यांनी एकमेकांसोबत अनेक वर्षे काम केलेले आहे.

भाजपला निर्णायक बहुमत

संपूर्ण देशाचे लक्ष पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीकडे लागले होते. 4 मे 2026 रोजी जाहीर झालेल्या निकालात भारतीय जनता पक्षाने ऐतिहासिक विजय मिळवत सत्तापालट केला आहे. एकूण 294 जागांपैकी भाजपला 2026 जागांवर विजय मिळाला आहे. तर तृणमूल काँग्रेस (TMC) 81 जागा मिळाल्या होत्या. या निवडणुकीत काँग्रेस आणि इतर पक्षांना खास कामगिरी करता आलेली नव्हती. यात टीएमसीच्या अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव झाला होता. यात ममता बॅनर्जी यांचाही समावेश होता.

कोण आहेत सुवेंदू अधिकारी?

सुवेंदु अधिकारी हे पश्चिम बंगालच्या राजकारणातील प्रभावशाली नेत्यांपैकी एक आहेत. त्यांचा जन्म 15 डिसेंबर 1970 रोजी पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील कांथी येथे झाला. राजकीय वातावरणात वाढ झाल्यामुळे त्यांनी लहान वयातच राजकारणात रस दाखवला. त्यांनी विद्यार्थी राजकारणातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि नंतर ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस (TMC) मध्ये प्रवेश केला. 2009 मध्ये पहिल्यांदा लोकसभा निवडणूक जिंकून खासदार बनले. त्यानंतर ते राज्याच्या राजकारणात सक्रिय झाले आणि 2016 मध्ये नंदीग्राम मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले.

ममता बॅनर्जी यांना दोनदा हरवलं

डिसेंबर 2020 मध्ये त्यांनी TMC सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. 2021 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी नंदीग्राम मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि ममता बॅनर्जी यांना कडवी टक्कर देत पराभूत केले, ज्यामुळे ते राष्ट्रीय स्तरावर चर्चेत आले. आताही त्यांनी ममता बॅनर्जी यांचा पराभव केला आहे. त्यानंतर आता त्यांची मुख्यमंत्री म्हणून निवड झाली आहे.

Follow Us