Bihar Election Live Update: राजदला दिलासा, तेजप्रताप यादव आघाडीवर

तेज प्रताप यादव समस्तीपूर जिल्ह्यातील हसनपूर विधानसभा मतदारसंघातून पिछाडीनंतर आघाडीवर आले आहेत. (Tej Pratap Yadav trailing from Hasanpur )

Bihar Election Live Update: राजदला दिलासा, तेजप्रताप यादव आघाडीवर
Follow us
| Updated on: Nov 10, 2020 | 1:00 PM

पाटणा :  बिहार विधानसभा निवडणुकीची (Bihar assembly election)  मतमोजणी सुरु आहे. एनडीए आणि महाआघाडी यांच्यामध्ये काटें की टक्कर सुरु आहे. एनडीए 124 जागांवर आघाडीवर आहे तर महागठबंधन 105 जागांवर आघाडीवर आहे. तेजस्वी यादव यांनी झंझावाती प्रचार अभियान राबवले. मात्र, तेजप्रताप यादव समस्तीपूर जिल्ह्यातील हसनपूर विधानसभा मतदारसंघातून सुरुवातीला ते पिछाडीवर होते मात्र आता ते आघाडीवर आले आहेत. (Tej Pratap Yadav trailing from Hasanpur )

तेजप्रताप यादव यांच्या विरोधात जनता दलाचे राजकुमार राय निवडणूक लढवत आहेत. तेजप्रताप यादव  यांनी राजकुमार राय  यांच्यावर आघाडी मिळवली आहे. तेजप्रताप यादव त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेत.

हसनपूरमधून तेजप्रताप यादव यांचे सासरे चंद्रिका राय सारण जिल्ह्यातील परसा विधानसभा मतदारसंघातून आघाडीवर आहेत. चंद्रिका राय जेडीयूमधून निवडणूक लढवत आहेत. लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबासोबत वाद झाल्यांतर चंद्रिका राय जेडियूमध्ये गेले होते.

बिहार विधानसभा निवडणूक निकाल थोड्याच वेळात लागणार आहे. बिहारचे विद्यमान मुख्यमंत्री आणि JDU चे सर्वेसर्वा नितीश कुमार यांच्या भविष्याचा फैसलाही आज लागेल. अशावेळी नितीश कुमार यांचा JDU आणि भाजप महायुतीला बहुमत मिळालं, तर नितीश कुमार एक नाव विक्रम बनवतील. बिहारचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री बनण्याची संधी नितीश कुमार यांच्याकडे आहे. यापूर्वी हा विक्रम बिहारचे पहिले मुख्यमंत्री कृष्ण सिंह यांच्या नावावर आहे.

एनडीए आणि महागठबंधन यांच्यामध्ये काटें की टक्कर सुरु आहे. एनडीए 124 जांगावर आघाडीवर असून महागठबंधन 105 जागावंर आघाडीवर आहे. मात्र, दोन्ही आघाड्यांमध्ये टक्कर सुरु आहे. जर काटें की टक्कर सुरु राहिली तर लोकजनशक्ती पक्षाचे प्रमुख चिराग पासवान यांची भूमिका महत्त्वाची ठरू शकते. सध्या चिराग पासवान यांचा लोकजनशक्ती पक्ष 6 जागांवर आघाडीवर आहे. चिराग पासवान यांनी या जागा जिंकल्यास ते खरोखरच बिहारचे किंगमेकर ठरतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

संबंधित बातम्या:

Bihar Election Result 2020 LIVE | उत्साह शिगेला, एनडीएच्या जागा वाढल्या

Bihar Election Result : बिहारमध्ये नवं सरकार सत्तेत येण्यास काही तास बाकी, राज्याला ‘या’ समस्यांपासून दिलासा मिळणार?

(Tej Pratap Yadav trailing from Hasanpur )

Non Stop LIVE Update
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.