भयानक! जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा पुन्हा हैदोस, यूपीच्या 2 मजुरांवर गोळीबार

जम्मू-काश्मीरच्या बुडगावमध्ये दोन मजुरांवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला आहे. उस्मान मलिक आणि सुफियान अशी जखमी झालेल्या मजुरांची नावे आहेत. विशेष म्हणजे गेल्या काही आठवड्यातील हा चौथा दहशतवादी हल्ला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये टार्गेट किलिंगच्या घटना पुन्हा वाढताना दिसत आहेत.

भयानक! जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा पुन्हा हैदोस, यूपीच्या 2 मजुरांवर गोळीबार
Follow us
| Updated on: Nov 01, 2024 | 9:39 PM

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा हैदौस अद्यापही सुरुच आहे. दहशतवाद्यांकडून कधी भारतीय सैन्याच्या जवानांवर हल्ला केला जातोय, कधी सैन्याच्या वाहनाला टार्गेट केलं जातं, तर कधी बाहेरील राज्यातील मजुरांवर हल्ला केला जातोय. विशेष म्हणजे आजदेखील अशीच धक्कादायक घटना समोर आली आहे. जम्मू-काश्मीरच्या बुडगाव जिल्ह्यात दोन बाहेरील राज्यांच्या मजुरांवर गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी 2 मजुरांची गोळ्या झाडून हत्या करण्याचा प्रयत्न केला. संबंधित छटनेची माहिती मिळताच सुरक्षा यंत्रणा घटनास्थळी दाखल झाले. जखमी मजुरांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यानंतर भारतीय सैन्य आणि पोलिसांकडून सर्च ऑपरेशन केलं जात आहे.

उत्तर प्रदेशच्या साहनपूर येथील रहिवासी उस्मान मलिक (वय 20) आणि सुफियान (वय 25) यांच्यावर गोळी झाडण्यात आली आहे. उस्मानला डाव्या हाताला जखम झाली आहे. तर सुफियानला डाव्या पायाला गोळी लागली आहे. दोन्ही जल शक्ती विभागात डेली वेजेज म्हणून काम करत होते. दोन्ही मजूर गोळी लागल्याने जखमी झाले आहेत. पण त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. दोघांना जेवीसी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.

गेल्या आठवड्यात याआधी 3 घटना

विशेष म्हणजे बाहेरील राज्याच्या व्यक्तीवर काश्मीरमध्ये गोळीबाराची ही पहिली वेळ नाही. याआधीदेखील अनेकवेळा राज्याबाहेरील नागरिकांना दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. गेल्या आठवड्यात बटागुंड त्राल येथे झालेल्या गोळीबारात एक व्यक्ती जखमी झाली होती. ते प्रकरण हे गेल्या काही दिवसांमधील तिसरं प्रकरण होतं. त्यानंतर आज झालेली घटना ही चौथी घटना आहे. विशेष म्हणजे जम्मू-काश्मीरमध्ये संघटीत दहशतवाद कमी झाल्यानंतर टार्गेट किलिंगच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गेल्यावर्षी देखील दहशतवाद्यांनी वेगवेगळ्या भागात वास्तव्यास असणाऱ्या काश्मीर बाहेरील रहिवाशांना टार्गेट करत हत्या केली होती.

हे सुद्धा वाचा

जम्मू-काश्मीरच्या श्रीनगर येथे दहशतवाद्यांनी याच वर्षात फेब्रुवारी महिन्यात सिख समजाच्या दोन जणांना टार्गेट केलं होतं. दहशतवाद्यांनी दोन्ही जणांवर Ak47 रायफलने गोळी झाडली होती. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला होता. ते दोघे पंजाबच्या अमृतसर येथील रहिवासी होते. अमृत पाल आणि रोहित असं मृतक तरुणांची नावे होती. याशिवाय त्याआधी 2023 मध्ये दहशवाद्यांनी काश्मीरी पंडित संजय शर्मा यांची हत्या केली होती. या दुर्दैवी घटना सातत्याने आतापर्यंत घडत आल्या आहेत.

आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले...
आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले....
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?.
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?.
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट.
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी.
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं.
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली.
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?.
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण.