Tamil Nadu election results 2026 : 2 महिला आणि 3 महापुरुष… थलपति विजयच्या राजकीय पोस्टरवरील ते 5 हिरो कोण? ज्यामुळे मिळाला छप्परफाड विजय
तामिळनाडूच्या राजकारणात सध्या फक्त एकाच नावाची चर्चा आहे, ते म्हणजे : थलपथी विजय. कोणत्या दूरदृष्टीमुळे ये या मुक्कामापर्यंत पोहोचू शकले ? जाणून घेऊया सविस्तर

गेल्या अनेक दशकांपासून तामिळनाडूचे राजकारण ‘फुकटच्या गोष्टी’ आणि ‘घराणेशाही’भोवती फिरत होतं. मात्र, थलपथी विजय यांचे तामिळनाडूमध्ये आशेचा किरण म्हणून उदयास आलेआहेत. ते केवळ टाळ्या मिळवणारे एक ‘सुपरस्टार’ नव्हे, तर त्याहूनही अधिक काहीतरी आहेत, हे त्यातून सिद्ध झालं आहे. तामिळनाडूच्या राजकारणात प्रतीकांना प्रचंड महत्त्व आहे. जेव्हा अभिनेता विजय यांच्या ‘तमिळगा वेत्री कळघम’ (टीव्हीके) या पक्षाच्या पहिल्या प्रमुख पोस्टरवर पाच प्रमुख चेहरे झळकले, तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. या पाच प्रमुख व्यक्तींची निवड करून, विजय यांनी एक अशी ‘अभेद्य भिंत’ उभी केली, जी प्रतिस्पर्धी पक्षांना भेदणे अशक्य वाटले. कोण आहे ते 5 चेहरे, जाणून घेऊया सविस्तर..
राजकीय पोस्टरवरील त्या 5 व्यक्ती कोण ? का केली निवड ?
1) पेरियार ईव्ही रामासामी
ओळख – द्रविड आंदोलनाचे जनक आणि सामाजिक न्यायाचे समर्थक
राजकीय फायदा – तामिळनाडूचं राजकारण हे पेरियार यांच्याशिवाय अधुरं आहे. ते ‘द्रविडियन मुळापासून’ वेगळे नाहीत, पेरियार ईव्ही रामासामी यांचा समावेश करून विजय यांनी हेच स्पष्ट केलं. त्यांनी पेरियार यांचे ‘आत्मसन्मान’ आणि ‘जातीविरोधी’ विचार स्वीकारून DMKच्या पारंपारिक व्होट बँकेला संदेश दिला की, खरं द्रविड राजकारण आता TVKकडे आहे. एकीकडे इतर पक्ष एका एकाच साच्यात असताना, विजयने या पाच चेहऱ्यांच्या माध्यमातून तामिळनाडूतील प्रत्येक कुटुंबाशी नातं जोडलं.
2) डॉ. बी. आर. आंबेडकर
ओळख – भारतीय संविधानाचे जनक, कोट्यवधी लोकांच्या हक्काची लढाई लढणारे महानायक आणि सामाजिक समानतेचे मोठे समर्थक
राजकीय फायदा – डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना पोस्टरवर जागा देऊन विजय यांनी दलित आणि शोषित वर्गाचा विश्वास जिंकला. तामिळनाडूमध्ये दलित व्होट बँकेची भूमिका निर्णायक ठरते. विजय यांनी त्यांच्या रॅलीमध्ये ‘पिरपुक्कम एल्ला उयिर्क्कुम’ म्हणजेच जन्माने सर्व समान आहेत, ही भूमिका घेतली होती. डॉ. आंबेडकरांच्या पोस्टरने त्याला घटनात्मक बळ दिले.
3) के. कामराज
ओळख – काँग्रेसचे दिग्गज नेते आणि तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री ज्यांना शिक्षण सुधारक मानलं जातं.
राजकीय फायदा – कामराज यांचं सरकार तामिळनाडूमध्ये ‘सुवर्ण युग’ मानलं जातं. या निवडणुकीदरम्यान विजय यांनी त्यांना आपल्या पोस्टवर अशासाठी जागा दिली , जेणेकरून ते स्वत:ला ‘स्वच्छ आणि निस्वार्थी राजकारणाचे’ उत्तराधिकारी म्हणून सादर करू शकतील. आपल्या रॅलीदरम्यान विजय यांनी वारंवार कामराज यांच्या कार्यकाळातील शासन परत आणू, अशी शपथ घेतली. याचा अर्थ असा की, एक असं सरकार आणू ज्यांच्या कार्यकाळात, शिक्षणावर सर्वात जास्त खर्च होईल आणि मुख्यमंत्री पद केवळ सेवेचं माध्यम असेल.
द्रविड पक्षांच्या अनेक दशकांच्या कथित भ्रष्टाचारामुळे वैतागलेली जनता, मतदार हे विजय यांच्या भूमिकेमुळे प्रभावित झाले. कामराज यांच्यासारखा स्वच्छ, साधा,आणि विकासाचे व्हिजन असलेल्या नेत्याच्या शोधात असलेले मतदारही यामुळे प्रभावित झाल्याचे दिसून आले. कामराज यांना ‘कलवी थंथाई’ म्हणजेच शिक्षणाचे पितामह मानलं जातं. विजय यांनी त्यांच्या पक्षाच्या एज्युकेशन व्हिजनमध्ये कामराज यांच्या स्कूल नेटवर्कचा उल्लेख केला. त्यांनी तामिळनाडूतील साक्षरतेचा दर एकेकाळी बदलला होता.
4) रानी वेलु नचियार
ओळख – शिवगंगाची महान राणी आणि भारतातील पहिली महिला स्वातंत्र्य सैनिक. तिने 1780 साली ईस्ट इंडिया कंपनीविरोधात सशस्त्र लढा देत विजय मिळवला. त्यांनी झाशीची रानी लक्ष्मीबाई यांच्या, सुमारे 75 वर्षं आधीच इंग्रजांना युद्धात धूळ चारली. त्यांनी ब्रिटीश शस्त्रागार नष्ट करण्यासाठी मानवी बॉम्बचा वापर केला होता.
राजकीय फायदा – विजय यांनी वेलु नचियार यांची निवड करून ‘तामिळ वीरता’ आणि ‘ नारी शक्ती’चं सर्वांत शक्तीशाली प्रतीक सादर केलं. त्याद्वारे विजय यांनी ‘तमिळ अस्मिता’ उभारली आणि तरूणांना हा संदेश दिला की, फक्त आधुनिक तंत्रज्ञान हाच नव्हे तर तामिळनाडूच्या मातीचा गौरवशाली आणि साहसी इतिहास हाही पक्षाचा आधार आहे. त्यांनी महिलांमध्ये जोश निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
5) अंजलि अम्मल
ओळख – कडलूर एक निर्भय स्वातंत्र्यसैनिक, त्यांनी असहकार चळवळीपासून ते भारत छोडो आंदोलनापर्यंत अनेकदा तुरुंगवास भोगला. त्यांच्या शौर्याने प्रभावित होऊन महात्मा गांधींनी त्यांना ‘दक्षिण भारताची झाशीची राणी’ म्हटले. त्यांच्या भाषणांना घाबरून ब्रिटिश सरकारने त्यांच्यावर बंदी घातली होती, तरीही त्यांनी बुरखा घालून गांधीजींची भेट घेतली.
राजकीय फायदा – पोस्टरवर अंजली अम्माल यांचे नाव ही विजय यांचा मास्टरस्ट्रोक मानला गेला. एका सामान्य पार्श्वभूमीच्या महिलेचा सन्मान करून, विजय यांनी हे सिद्ध केलं की, ते केवळ इतिहासातील प्रसिद्ध व्यक्तींपुरते मर्यादित नाहीत, तर समाजासाठी सर्वस्व त्याग केलेल्या अज्ञात नायकांचाही ते आदर करतात, हेच त्यांनी दाखवून दिलं.
का सफल ठरला हा डाव ?
या पाच व्यक्तींची निवड करून, विजय यांनी तामिळनाडूच्या प्रत्येक नागरिकाच्या मनाला भिडणारा एक संदेश दिला.
– पेरियार यांच्याकडून त्यांनी सामाजिक न्याय घेतला.
– आंबेडकर यांच्याकडून त्यांनी समानता घेतली.
– कामराज यांच्याकडून त्यांनी प्रामाणिकपणा आणि शिक्षणाचा आदर्श दिला.
– वेल्ली नाचीयार आणि अंजली अम्माल यांच्याकडून त्यांनी महिला सक्षमीकरण आणि तामिळ अस्मिता घेतली.