AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजधानीतील तो अशुभ बंगला,कोणत्याच CM ला फळला नाही,आता त्याचे नशीब बदलणार ?

अनेक जण म्हणतात की एखाद्या इमारतीने कोणाचे भाग्य निश्चित होत नाही. परंतू भारतीय राजकारणात अनेक प्रतीके आणि मान्यतेचा परिणाम पाहायला मिळत आला आहे.

राजधानीतील तो अशुभ बंगला,कोणत्याच CM ला फळला नाही,आता त्याचे नशीब बदलणार ?
bungalow file photos
| Updated on: Jun 16, 2026 | 7:13 PM
Share

दिल्लीच्या राजकारणाची संस्कृती देशातील इतर राज्याहून भिन्न आहे. येथील सरकारी बंगल्यात प्रशस्थ लॉन असते आणि बंगल्यात राहणाऱ्यांचा थाट एखाद्या राजाप्रमाणे असतो. मात्र, दिल्लीत एका अशुभ बंगल्याची कहाणी तुम्ही ऐकली असेल..राजधानीच्या सिव्हील लाईन्स स्थित ३३ शमनाथ मार्गावरील या सरकारी बंगल्याला दशकाहून अधिक काळ शापित मानले गेले आहे. परंतू आता या ७० वर्षे जुन्या बंगल्याला नवा मालक मिळणार आहे. या रहस्यमयी बंगल्याच्या कहाणीत आता कलाटणी मिळणार आहे.

33 शमनाथ मार्गावरील हा बंगला दिल्लीचे पहिले मुख्यमंत्री चौधरी ब्रह्म प्रकाश यांचे अधिकृत निवास बनले होते. त्यानंतर जे जे मुख्यमंत्री त्या निवासस्थानी राहिले त्यांचा मुख्य कार्यकाल काही ना काही कारणांनी पूर्ण झाला नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात या बंगल्यास शापित ठरवण्यात आले. कारण हा बंगला कोणत्याही मुख्यमंत्र्याला भावला नाही.

आता कोण बनणार या बंगल्याचा मालक ?

दिल्ली सरकारने या बंगल्याला मुख्यमंत्र्यांचे निवास स्थान म्हणून वापर करण्याच्या ऐवजी याला नव्या उद्देश्यासाठी विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. बातम्यानुसार सरकारने येथे राज्य आपात्कालिन व्यवस्थापन संबंधित आधुनिक कार्यालय आणि कमांड सेंटर बनवण्याची तयारी केली आहे.यासाठी ब्रिटीशकालीन या इमारतीला नष्ट करण्याचा विचार केला जात आहे. म्हणजे आता यास मुख्यमंत्री निवास नव्हे तर आपात्कालिन व्यवस्थापन व्यवस्थेचे नवीन केंद्र बनवण्याचा निर्णय घेतला आहे.

ब्रिटीश काळाचा वारसा

हा ब्रिटीश काळाचा वारसा असलेला हा बंगला १९२० च्या दशकात तयार केला होता. दोन मजल्याच्या या विशाल बंगल्यात चार बेडरुम, ड्राईंग रुम, मोठे लॉन, फवारे आणि स्टाफ क्वॉर्टर सारख्या सुविधा आहेत. दिल्ली विधानसभेच्या जवळ असल्याने हा बंगला मुख्यमंत्र्यांचे निवास स्थान म्हणून उपयोगी मानला जात होता. परंतू अंधविश्वास आणि राजकारणातील योगायोगाने या बंगल्याची पार रया गेली. अशात आता या बंगल्याला आता प्रशासकीय केंद्र म्हणून नवीन ओळख मिळाली तर पुढे कदाचित या बंगल्याची अशुभ असल्याची छबी कदाचित दूर होईल.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा