1 फेब्रुवारी 2026 रोजी अर्थसंकल्प सादर होणार, अर्थमंत्री सीतारमण ‘हा’ विक्रम करणार, जाणून घ्या
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2026 रोजी रविवारी रात्री 11 वाजता संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यावेळी त्या ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित करणार आहे.

यंदाचा अर्थसंकल्प खास असणार आहे. केंद्र सरकारने आर्थिक वर्ष 2026-27 च्या सर्वसाधारण अर्थसंकल्पाच्या तारखा जाहीर केल्या आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2026 रविवारी दुपारी 11 वाजता संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अलिकडच्या वर्षांत प्रथमच केंद्रीय अर्थसंकल्प रविवारी सादर केला जाईल. चला तर मग याविषयीची माहिती जाणून घेऊया.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 28 जानेवारी रोजी संसदेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करणार आहेत. 29 जानेवारीला आर्थिक पाहणी अहवाल सादर केला जाणार आहे. आठवड्याच्या शेवटी अर्थसंकल्प सादर करणे नवीन नाही. निर्मला सीतारामन यांनी शनिवारी 2025 चा अर्थसंकल्प सादर केला होता.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे वेळापत्रक
अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन टप्प्यात होणार आहे. पहिला टप्पा : 28 जानेवारी ते 13 फेब्रुवारी 2026 दुसरा टप्पा: 9 मार्च ते 2 एप्रिल 2026
सीतारामन यांची ऐतिहासिक नोंद
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेला हा सलग नववा अर्थसंकल्प असेल. यासह, सलग अनेक अर्थसंकल्प सादर करणाऱ्या त्या पहिल्या महिला अर्थमंत्री ठरतील. माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या विक्रमाच्या (देसाई यांनी एकूण 10 अर्थसंकल्प सादर केले होते) त्या जवळ जातील. 2019 मध्ये त्यांनी भारताच्या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री म्हणून पदभार स्वीकारला.
तारीख आणि परंपरा
1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करण्याची परंपरा 2017 पासून सुरू आहे. यापूर्वी फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 28 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या कार्यकाळात अर्थसंकल्पातील प्रस्तावांची अंमलबजावणी 1 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या या नवीन आर्थिक वर्षापूर्वी लागू व्हावी यासाठी हा बदल करण्यात आला होता.
‘हे’ देखील जाणून घ्या
स्वातंत्र्यानंतरचा ‘हा’ देशाचा 88 वा अर्थसंकल्प असेल. यापूर्वी 1999 मध्ये तत्कालीन अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी रविवारी, 28 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर केला होता. 1 फेब्रुवारी 2026 रोजी संत गुरु रविदास जयंती देखील आहे, ज्यामुळे काही राज्यांमध्ये सार्वजनिक सुट्टी असेल, परंतु अर्थसंकल्पाच्या सादरीकरणावर त्याचा परिणाम होणार नाही.
विकास दर 7.4%
सरकारने 7 जानेवारी रोजी जाहीर केलेल्या अंदाजानुसार, चालू आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये देशाची अर्थव्यवस्था 7.4% दराने वाढण्याची अपेक्षा आहे. मागील आर्थिक वर्ष 2024-25 मधील 6.5% वाढीपेक्षा ही वाढ जास्त आहे. जागतिक आव्हाने आणि व्यापारी तणाव असूनही, भारतीय अर्थव्यवस्था मजबूत आहे.
