AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

divorce : सतत मॅगी करते म्हणून, नवऱ्याच्या टकलाची लाज वाटते म्हणून.. कोणत्या क्षुल्लक कारणांवरुन होतायेत देशात घटस्फोट.. घ्या जाणून

पत्नीवर नाराज असलेल्या पुरुषाला मुंबईतील न्यायालयाने घटस्फोटाची परवानगी दिली. पतीने आरोप केला होता की त्याची पत्नी खूप रागावलेली आणि अत्याचारी होती. ती कायम सेक्सची मागणी करत असे तर आणि आपण त्यात असमाधानकारक नाही. त्यामुळे आपल्याला घटस्फोट हवा अशी मागणी कौटुंबिक न्यायालयाकडे केली होती.

divorce : सतत मॅगी करते म्हणून, नवऱ्याच्या टकलाची लाज वाटते म्हणून.. कोणत्या क्षुल्लक कारणांवरुन होतायेत देशात घटस्फोट.. घ्या जाणून
घटस्फोटImage Credit source: tv9
| Updated on: Jun 02, 2022 | 3:18 PM
Share

नवी दिल्ली : मध्यंतरी घटस्फोटाच्या (Divorce) एका विधानावरून महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis)यांच्यात जोरदार वादावादी झाली होती. त्यावेळी अमृता फडणवीस यांनी मुंबईतील ट्रफिकमुळे घटस्फोटांचे प्रमाण वाढल्याचे म्हटले होते. त्याविधानावरून राज्यातील राजकीरण तापले होते. आता यासारख्याच अनेक कारणांमुळे घटस्फोट होत असल्याचे समोर आले आहे. घटस्फोटाच्या प्रमाणात भारताची स्थिती इतर देशांच्या तुलनेत चांगली आहे. अमेरिका जगातील सर्वात विकसित देश, जिथे घटस्फोटाचे प्रमाण 40 टक्क्यांच्या जवळपास आहे, तर भारतात ते दोन टक्क्यांच्या खाली आहे. मात्र, गेल्या काही वर्षांतील आकडेवारी पाहिली तर (भारत घटस्फोटाचे प्रमाण) येथेही हा वेग वाढल्याचे दिसून येत आहे. वेग वाढला आहे पण घटस्फोटाची कारणे ही धक्कादायक (shocking reasons) आहेत. गेल्या आठवड्यातच म्हैसूरमध्ये एका पतीने आपल्या पत्नीपासून घटस्फोट घेतला कारण त्याची पत्नी फक्त आणि फक्त मॅगी बनवते (मॅगी घटस्फोट प्रकरण). त्याच वेळी, एका पतीने आरोप केला की त्याची पत्नी खूप रागीट आणि हुकूमशाही गाजवणारी आहे आणि सेक्सची अतृप्त इच्छा दर्शवते. याबाबत घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. तर अनेक दाखल झालेल्या प्रकरणांची कारणे पाहिली तर घटस्फोट घेण्याचे कारण ही वेगळीच असल्याचे समोर येत आहे. ज्याचा पूर्वी विचारही कोणी केला नसेल.

मॅगी

अलीकडेच म्हैसूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली. जिथे एका पतीने आपल्या पत्नीपासून घटस्फोट घेण्यासाठी मॅगीचे कारण सांगितले. तसेच तो म्हणाला त्याची पत्नी फक्त आणि फक्त मॅगी बनवते. कोर्टात पतीने सांगितले की, त्याच्या पत्नीला मॅगीशिवाय दुसरे काहीही कसे शिजवायचे हे माहित नाही. ती नाश्त्यालाही मॅगी बनवते, दुपारच्या जेवणातही मॅगी बनवते आणि रात्रीच्या जेवणातही. त्यामुळे या प्रकरणाचे नाव ‘मॅगी केस’ असे ठेवण्यात आले आणि अखेर या प्रकरणात दोघांचा घटस्फोट झाला.

लैंगिक इच्छा

पत्नीवर नाराज असलेल्या पुरुषाला मुंबईतील न्यायालयाने घटस्फोटाची परवानगी दिली. पतीने आरोप केला होता की त्याची पत्नी खूप रागावलेली आणि अत्याचारी होती. ती कायम सेक्सची मागणी करत असे तर आणि आपण त्यात असमाधानकारक नाही. त्यामुळे आपल्याला घटस्फोट हवा अशी मागणी कौटुंबिक न्यायालयाकडे केली होती. तसेच आपल्या या याचिकेत न्यायालयाला त्याने सांगितले की, त्याची पत्नी लैंगिक वर्तनाची अत्याधिक आणि असमाधानकारक इच्छा दाखवत असे. 2012 मध्ये लग्न झाल्यापासून महिलेने त्याचा छळ केला होता. ही महिला त्याला औषधे देत असे आणि दारू पिण्यास भाग पाडत असे, असा आरोपही त्याने केला आहे. पतीने आरोप केला आहे की ती त्याला अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवण्यासाठी बळजबरी करायची आणि जेव्हा तो नकार देत असे तेव्हा ती त्याच्यावर अत्याचार करायची. अखेर दोघांचा घटस्फोट झाला.

बायको पॅन्ट घालते मला घटस्फोट हवा

मुंबईतील परळ भागातील एका व्यक्तीने आपल्या पत्नीने भारतीय कपड्यांऐवजी शर्ट-पॅन्ट घातल्याच्या कारणावरून तिच्यापासून विभक्त होण्याची मागणी केली. तर लग्नाच्या तीन वर्षांनंतरही पत्नीने आपल्याला तिला हात लावायाला दिला नाही. मला लैंगिक संबंध बनवता आलेला नाही. तिने तिनएक वर्ष आमच्यातील लैंगिक संबंधांना परवानगी दिलेली नाही असेही याचिकेत नमूद केले आहे. त्यामुळे कौटुंबिक न्यायालयाने घटस्फोट मंजूर केला. तर मुंबई उच्च न्यायालयाने तो रद्द केला. क्रूरतेचे दरवाजे इतके विस्तृत उघडता येत नाहीत, अन्यथा निसर्गाच्या विसंगतीच्या प्रत्येक प्रकरणात घटस्फोट द्यावा लागेल, असे न्यायालयाने म्हटले आहे.

लिपस्टिकची मागणी

नुकतेच लखनऊमध्ये पत्नीच्या रोज नवीन लिपस्टिकच्या मागणीला कंटाळून एका व्यक्तीने कैसरबाग येथील कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी धाव घेत अर्ज केला. या व्यक्तीने कौटुंबिक न्यायालयात सांगितले की, त्याची पत्नी दररोज त्याच्याकडून नवीन लिपस्टिकची मागणी करते. याशिवाय ती दिवसभर घरात झोपते, तिला घरातील सामान्य कामेही करता येत नाहीत. यामुळे त्याला घरातील सर्व कामे स्वतःच करावी लागतात. पत्नीच्या या सवयींमुळे व्यथित होऊन त्याला तिच्यापासून वेगळे व्हायचे आहे.

पत्नी नियमित पार्ट्यांमध्ये

काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रात एक प्रकरण समोर आले होते जिथे पतीने घटस्फोटासाठी अर्ज केला होता आणि सांगितले होते की त्याची पत्नी नियमित पार्ट्यांमध्ये राहते. कोर्टाने परवानगी दिली नसली तरी मला घटस्फोट हवा आहे. त्याच वेळी, यूपीमध्ये आणखी एक प्रकरण समोर आले, जेव्हा तिला तिच्या पतीचे टक्कल असल्याची सत्यता समजली तेव्हा तिने घटस्फोटासाठी अर्ज केला.

तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.