AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हॉटेलमध्ये शिरताच सर्वातआधी बेडच्या खाली रिकामी पाण्याची बाटली का टाकावी? तुम्हलाही माहिती नसेल या मागचं खरं कारण

आपण जेव्हा बाहेरगावी प्रवास करतो, विषेत: जिथे आपल्या ओळखीचं कोणीच नसतं, अशा ठिकाणी राहण्यासाठी आपल्याला हॉटेलशिवाय दुसरा कोणताच पर्याय नसतो. मात्र आपण मुक्कामासाठी जी हॉटेल निवडतो ती नवी असल्यामुळे आपल्या मनात अनेक शंका असतात.

हॉटेलमध्ये शिरताच सर्वातआधी बेडच्या खाली रिकामी पाण्याची बाटली का टाकावी? तुम्हलाही माहिती नसेल या मागचं खरं कारण
हॉटेलमध्ये बेडखाली रिकामी पाण्याची बाटली का टाकावी?Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 16, 2026 | 7:01 PM
Share

अनेकदा आपण काही कामनिमित्त किंवा पर्यटनासाठी दुसऱ्या एखाद्या शहरात जात असतो. अशा प्रत्येक ठिकाणीच आपल्या कोणी ओळखीचं असेल किंवा आपले नातेवाईक असतील असं होत नाही, आणि जरी समजा नातेवाईक असले तरी देखील अनेकजण त्यांना आपला त्रास नको असा विचार करतात. त्यामुळे आपण जेव्हा आपलं घर सोडून बाहेर गावी फिरण्यासाठी जातो किंवा कामानिमित्त जातो तेव्हा तिथे आपल्या मुक्काची व्यवस्था म्हणून आपण एखाद्या चांगल्या हॉटेलची निवड करतो. हॉटेल कितीती चांगलं असलं, हॉटेल स्टाफकडून मिळणाऱ्या सुविधाही चांगल्या असल्या तरी असं हॉटेल आपल्यासाठी पूर्णपणे नवीन असतं. त्यामुळे त्या हॉटेलच्या सुरक्षेसंदर्भात आपल्या मनात अनेक शंका उपस्थित होत असतात. अनेकदा आपण अशा ठिकाणी अस्वस्थ देखील होतो.

आपण जर यापूर्वी काहीवेळा त्या हॉटेलमध्ये मुक्काम केला असेल तर मग गोष्ट वेगळी असते, आपल्याला तेथील सर्व वातावरणाची कल्पना असते.  परंतु अनेकजण असे असतात की ज्या शहरात जायचं आहे, त्या शहरात जाण्यापूर्वीच गैरसोय नको म्हणून आधीच ऑनलाईन हॉटेलची बुकिंग करतात. अशा स्थितीमध्ये तर चिंता अधिक वाढते, कारण आपण ती हॉटेल देखील पाहिलेली नसते. सर्वच गोष्टी आपल्यासाठी नवीन असतात.

दरम्यान अनेक हॉटेमध्ये यापूर्वी देखील असे प्रकार घडले आहेत, काही हॉटेलच्या बेडरूममध्ये छुपे कॅमेरे लावले जातात. यामुळे तुमच्यासोबत धोका होऊ शकतो, त्यामुळे जेव्हा तुम्ही हॉटेलमध्ये मुक्कामाला असता तेव्हा अधिक सतर्क राहणं गरजेचं असतं. याच संदर्भात एका एअर होस्टसने आपला अनुभव शेअर केला आहे.

एअर होस्टसने केवळ आपला अनुभवच शेअर केला नाही तर हॉटेलमध्ये जे लोक मुक्काम करतात त्यांना सल्ला देखील दिला आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये प्रवेश करतात तेव्हा रूममध्ये प्रवेश करताच सर्वात आधी बेडच्या खाली रिकामी पाण्याची बाटली टाका असं या एअर होस्टसेने सांगितलं आहे. तिने त्यामागचं कारण देखील सांगितलं आहे. ती म्हणते की समजा तुम्ही तुमच्या बेडखाली रीकामी बाटली फेकली आणि ती जशीच्या तशी दुसऱ्या बाजुने बाहेर आली तर याचा अर्थ असा होतो की तुमच्या बेडखाली कोणी लपलेलं नाहीये, मात्र जर बाटली बाहेर आली नाही  तर मात्र मग चिंता करण्याचं कारण असू शकतं, असं या एअर होस्टसने म्हटलं आहे. तसेच तुम्ही जेव्हा हॉटेलमध्ये शिरता तेव्हा पहिल्यांदा तुमच्या बेडरूमध्ये लावण्यात आलेले सर्व आरसे नीट चेक करा असा सल्लाही या एअर होस्टेसने दिला आहे. कारण अशा ठिकाणीच छुपे कॅमेरे असल्याची जास्त शक्यता असते, असंही तिने म्हटलं आहे.

Follow Us
शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीला सुरुवात; नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीला सुरुवात; नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
राहुल गांधींच्या 9 तासांच्या ठिय्यानंतर आज पुन्हा रणशिंग? खरगेंच्या...
Congress Protest : राहुल गांधींच्या 9 तासांच्या ठिय्यानंतर आज पुन्हा रणशिंग? खरगेंच्या लंच डिप्लोमसीत पुढची रणनीती काय?
मस्कऱ्या गणपतीच्या दर्शनासाठी आशिष शेलार मुधोजीराजेंच्या निवासस्थानी
मस्कऱ्या गणपतीच्या दर्शनासाठी आशिष शेलार मुधोजीराजेंच्या निवासस्थानी
MPSC विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी लढणार... रोहिणी खडसे
MPSC विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी लढणार... रोहिणी खडसे यांचा सरकारला इशारा
महाज्योती परीक्षा रद्द, 'या' केंद्रांवरील विद्यार्थ्यांची होणार फेरपरी
महाज्योती परीक्षा रद्द, आंबेगाव आणि नांदेड केंद्रांवरील विद्यार्थ्यांची होणार फेरपरीक्षा
प्रदीप पूर्णेकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; नेमकं काय म्हणाले?
Pratap Sarnaik On Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; ठाण्यातील प्रकरणावर नेमकं काय म्हणाले?
MPSC अध्यक्षांनी आमचे बारा वाजवले म्हणून...; विवेकानंद पाटील नेमकं...
Vivekanand Patil on Bhimanvar : MPSC अध्यक्षांनी आमचे बारा वाजवले म्हणून...; विवेकानंद पाटील नेमकं काय म्हणाले?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात तपासला वेग; अल्टो कार जप्त, गाडीत सापडला...
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात तपासला वेग; पप्पू शिंदेने दिलेली अल्टो कार जप्त, गाडीत सापडला...
दुष्काळाची झळ! छत्रपती संभाजीनगरातील 150 वीटभट्ट्या बंद, हजारो मजुर...
दुष्काळाची झळ! छत्रपती संभाजीनगरातील 150 वीटभट्ट्या बंद, हजारो मजुरांवर उपासमारीची वेळ
माझी नार्को टेस्ट करा, तुम्हाला सगळं...; शिवराज मोरे असं का म्हणाले?
Shivraj More : माझी नार्को टेस्ट करा, तुम्हाला सगळं...; शिवराज मोरे असं का म्हणाले?