AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ओबीसी आरक्षण आणि प्रभाग रचने संदर्भात सुनावणी लांबली, न्यायालयात नेमकं काय घडलं ? जाणून घ्या

गेल्या काही महिन्यांपासून स्थानिक स्वराज्य संस्था आणि प्रभाग रचनेवरुन सुप्रीम कोर्टात दाखल असलेल्या याचिकेवर निकाल लागत नसल्याने निवडणुका खोळंबल्या आहेत.

ओबीसी आरक्षण आणि प्रभाग रचने संदर्भात सुनावणी लांबली, न्यायालयात नेमकं काय घडलं ? जाणून घ्या
Image Credit source: Google
Kiran Balasaheb Tajne
Kiran Balasaheb Tajne | Updated on: Dec 13, 2022 | 2:11 PM
Share

संदीप राजगोळकर, नवी दिल्ली : स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी आरक्षण आणि प्रभाग रचने संदर्भात आजही निर्णय झालेला नाही. सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीत सर्व याचिकाकर्त्यांना एकत्रित मुद्दे मांडणी करण्यास सांगितली आहे. आता पुढील सुनावणी 17 जानेवारीला होणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षणाचा मुद्दा आणि आणि प्रभाग रचनेचा मुद्दा निकाली निघालेला नाही. वेगवेगळ्या याचिका दाखल असल्याने हा प्रश्न निकाली निघत नव्हता. त्यातच आता सुप्रीम कोर्टात नुकत्याच पार पडलेल्या सुनावणीत सर्व याचिकाकर्त्यांना एकत्रितपणे मुद्दे मांडण्याची सूचना सुप्रीम कोर्टाने दिली आहे. 17 जानेवारीला होणाऱ्या सुनावणीत सूचनेनुसार मुद्दे मांडले गेल्यास स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा होणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून अनेक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा होणार आहे.

गेल्या काही महिन्यांपासून स्थानिक स्वराज्य संस्था आणि प्रभाग रचनेवरुन सुप्रीम कोर्टात दाखल असलेल्या याचिकेवरुण निवडणुका खोळंबल्या आहेत. 17 तारखेला यावर निर्णय होण्याची आता शक्यता आहे.

त्यातच वेगवेगळ्या याचिका असल्याने निकाल स्पष्ट होत नसल्याने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेवर प्रशासक आहे, त्यामुळे विकास कामांना ब्रेक लागल्याची स्थिती निर्माण झाली आहे.

त्यामुळे निवडणुक आयोगाच्या निवडणुकीच्या घोषणेची वाट बघणाऱ्या राजकीय मंडळींचा अनेकदा हिरमोड होतांना दिसून येत आहे. त्यामुळे यावर सुप्रीम कोर्टाचा काय निकाल येणार याकडे राजकीय नेत्यांच्या नजरा लागून आहे.

आज सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीत सर्व याचिकाकर्त्यांना एकत्रित मुद्दे मांडणी करण्यास सांगितली आहे. आता पुढील सुनावणी 17 जानेवारीला होणार आहे. याचिकाकर्त्यांच्या मुद्द्यानुसार सुनावणी करण्यात येणार आहे.

Follow Us
मराठमोळ्या अभिनेत्याच्या घरी सुरेख डेकोरेशन; सामाजिक संदेश देत केलं बा
मराठमोळ्या अभिनेत्याच्या घरी सुरेख डेकोरेशन; सामाजिक संदेश देत केलं बाप्पांचं स्वागत
विनयभंगाच्या तक्रार प्रकरणी शिंदे गटातील आमदार संजय गायकवाडांची मोठी..
विनयभंगाच्या तक्रार प्रकरणी शिंदे गटातील आमदार संजय गायकवाडांची मोठी प्रतिक्रिया; थेट म्हणाले...
देवेंद्र फडणवीस यांचा राजभाषा दिनी मातृभाषा, भारतीय भाषांच्या गौरव...
देवेंद्र फडणवीस यांचा राजभाषा दिनी मातृभाषा आणि भारतीय भाषांच्या गौरवाचा संदेश
अमित शहा, फडणवीस, शिंदे अन् सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजभाषा...
अमित शहा, फडणवीस, शिंदे अन् सुनेत्रा पवार एकाच मंचावर; वाशीत राजभाषा संमेलनाचा थाट!
अखेर दिशा सालियन मृत्यू प्रकरणात CBI FIR दाखल; संशयितांच्या यादीत...
अखेर दिशा सालियन मृत्यू प्रकरणात CBI FIR दाखल; संशयितांच्या यादीत मोठी नावे
परत येईन की नाही, माहीत नाही; मी... मनोज जरांगे अचानक असं का म्हणाले?
परत येईन की नाही, माहीत नाही; मी... मनोज जरांगे अचानक असं का म्हणाले?
Ganeshotsav 2026 : नाशिकमध्ये 27 हजार रुपये किलोचा गोल्डन मोदक चर्चेत,
Ganeshotsav 2026 : नाशिकमध्ये 27 हजार रुपये किलोचा गोल्डन मोदक चर्चेत, खास काय?
मंत्री पंकजा मुंडे यांच्या घरी बाप्पाचे आगमन, छगन भुजबळांनी घेतले अंजी
Ganpati Bappa Morya | मंत्री पंकजा मुंडे यांच्या घरी बाप्पाचे आगमन, छगन भुजबळांनी घेतले अंजीरवाडी मंडळात दर्शन
गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील ...
Sanjay Raut | गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील हुकूमशाही...
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली..
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली बाप्पांची मूर्ती