AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

समुद्रात मृत्यूचा थरार… 6 मच्छिमार पडले, अजस्त्र लाटा उसळल्या, हृदयाची धडधड वाढली, श्वास थांबला अन्… काय घडलं शेवटी?

कर्नाटकातील मंगळूरजवळ खोल समुद्रात सहा लोक अडकले होते. मोठ मोठ्या लाटा, प्रचंड वारा आणि मृत्यू डोळासमोर दिसत असताना रात्रीच्या वेळी नेमके काय घडलं?

समुद्रात मृत्यूचा थरार... 6 मच्छिमार पडले, अजस्त्र लाटा उसळल्या, हृदयाची धडधड वाढली, श्वास थांबला अन्... काय घडलं शेवटी?
indian coast guard rescues six fishermen
| Updated on: Jun 30, 2026 | 11:13 AM
Share

समद्रात मृत्यूचा थरार पाहायला मिळाला. उसळत्या समुद्राच्या लाटा,  खराब हवामान आणि एक बोट बुडत होती.  या बोटीत सहा लोक अडकले होते. आपला जीव वाचवण्यासाठी धडपड सुरु होती. रात्रीच्या वेळ होती आणि हे सहा लोक आपल्या मृत्यूशी झुंज देत होते. अतिशय कठीण काळ असल्याने सुटका होईल की त्यांचा जीव वाचेल की नाही असा प्रश्न होता पण या रात्रीच्या भयाण शांतेत भारतीय तटरक्षक दलांनी पुन्हा एकदा चमत्कार करुन दाखवला. भारतीय तटरक्षक दलांनी पुन्हा एकदा उसळत्या समुद्राच्या लाटा, खराब हवामान आणि बुडणाऱ्या बोटीच्या संकटात जीव वाचवण्यासाठी धडपडणाऱ्या सहा मच्छिमारांच्या मदतीला धावून आले आहे. तटरक्षक दलाने मंगळूरूजवळ रात्रीच्या वेळी एक अत्यंत आव्हानात्मक आणि धाडसी मोहीम राबवून सर्व सहा मच्छिमारांची सुखरूप सुटका केली.

मिळालेल्या माहितीनुसार, ‘मंजू माथा’ नावाची एक मासेमारी बोट कर्नाटकातील सुरतकलपासून सुमारे 33 सागरी मैल अंतरावर खोल समुद्रात होती. अचानक, खराब हवामान आणि उंच लाटांचा तडाखा बसल्याने बोटीच्या तळाचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीमुळे बोटीत वेगाने पाणी भरू लागले, ज्यामुळे ती बुडण्याचा आणि मच्छिमारांच्या जीवाला धोका निर्माण झाला. या संकटाच्या क्षणी, मच्छिमारांनी तात्काळ VHF-RT द्वारे आपत्कालीन कॉल केला. भारतीय तटरक्षक दलाच्या ‘आयसीजीएस सचेत’ या जहाजाने तो संकटकालीन कॉल शोधून काढला आणि क्षणभरही विलंब न लावता घटनास्थळाकडे कूच केले. समुद्राची परिस्थिती अत्यंत खडतर होती, परंतु तटरक्षक दलाच्या जवानांनी हार मानली नाही.

खराब हवामान आणि उंच लाटा असूनही, तटरक्षक दलांनी सावधगिरीने काम केले. मच्छिमारांपर्यंत पोहोचण्यासाठी रिमोटने चालणाऱ्या लाईफबॉयचा वापर करण्यात आला. एकामागून एक, सर्व सहा लोकांना सुरक्षितपणे वाचवण्यात आले. त्यानंतर तटरक्षक दलाने सर्व वाचवलेल्या मच्छिमारांना न्यू मंगळुरू बंदरात आणले, जिथे त्यांना पुढील देखभालीसाठी स्थानिक अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले.

भारतीय तटरक्षक दलाने म्हटले आहे की, “हे अभियान समुद्रातील मानवी जीवनाच्या संरक्षणाप्रती असलेली त्यांची दृढ वचनबद्धता दर्शवते. आधुनिक तंत्रज्ञान, प्रशिक्षित कर्मचारी आणि तत्पर प्रतिसादासह, तटरक्षक दल कोणत्याही सागरी आपत्कालीन परिस्थितीला प्रतिसाद देण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. एका अधिकृत निवेदनात, तटरक्षक दलाने म्हटले आहे की, ‘वयम रक्षमः’ (आम्ही रक्षण करतो) या आपल्या ब्रीदवाक्यानुसार, ते देशाच्या सागरी क्षेत्रावर सतत लक्ष ठेवून आहे आणि समुद्रात संकटात सापडलेल्यांना वेळेवर मदत पोहोचवणे हे त्यांचे सर्वोच्च प्राधान्य आहे”.

Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात