AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

येथे लपलेले आहे जगातील सर्वाधिक सोने, जर सापडले तर जग दहापट श्रीमंत होईल, शंभर टक्के वाढेल सोन्याचा साठा

सारी दुनिया सोन्या सारख्या मौल्यवान धातूची चाहती आहे. परंतू जगातील महासागराच्या पाण्यातच सर्वाधिक सोने लपलेले आहे. ते जर का मिळाले तर जगाचा इतिहासच बदलून जाईल

येथे लपलेले आहे जगातील सर्वाधिक सोने, जर सापडले तर जग दहापट श्रीमंत होईल, शंभर टक्के वाढेल सोन्याचा साठा
GOLD (1)Image Credit source: socialmedia
| Updated on: Feb 15, 2023 | 6:15 PM
Share

नवी दिल्ली : सोन्याच्या दागिन्यांना जगात सर्वाधिक मागणी आहे. कोणत्याही संकटात सोनेच कामी येते. सोने तारण ठेवून व्यक्ती किंवा देश संकटातून बाहेर पडू शकतात. जगातील सर्वाधिक सोने कुठे आहे माहिती आहे का ? तुम्हाला वाटेल कुठल्या तरी खाणीमध्ये हे सोने आहे. परंतू हे सोने खाणीमध्ये नसून समुद्रात दडलेले आहे. गिनिज वर्ल्ड रेकॉर्डच्या वेबसाईटने दिलेल्या माहीतीनूसार जगातील सर्वात जास्त सोने समुद्राच्या पाण्यात दडलेले आहे. हे आतापर्यंत खाणीतून खोदून काढलेल्या सोन्यापेक्षा शंभर पट जादा आहे.

समुद्राच्या पाण्यात 20 मिलीयन टन म्हणजेच 2 कोटी टन नैसर्गिक सोने विरघळलेले आहे. जर त्याची किंमत काढायला गेला तर 2017 मध्ये असलेल्या  जगाच्या एकूण जीडीपीच्या 10 पट जास्त भरेल इतकी आहे. या सोन्याला समुद्राच्या पाण्यापासून वेगळे करायला यश आले तर जगातील गरीबी एका क्षणात नष्ट होईल असे म्हटले जाते. समुद्राच्या पाण्यापासून सोन्याला वेगळे करणे मात्र अवघड काम आहे. एक लिटर समुद्राच्या पाण्यातील सोन्याचे प्रमाण खूपच कमी आहे, हे एक ग्राम सोन्याच्या 13 अब्ज हिस्स्यांएवढे आहे. ते एका समुद्रापेक्षा दुसऱ्या समुद्रात कमी किंवा जास्त असू शकते.

तंत्र किंवा फार्म्युला  नाही

सध्याच्या काळात समुद्राच्या पाण्यापासून सोने वेगळे करणारे कोणतेही तंत्र किंवा फार्म्युला आपल्याकडे नाही. जगातील खाणीमधून आतापर्यंत 2.44 लाख टन सोने काढलेले आहे, जगात खोदकाम करून जेवढे सोने काढले त्याच्यापैकी अधिक सोने गेल्या पन्नास वर्षात काढल्याचे वर्ल्ड गोल्ड काऊन्सिलने म्हटले आहे. आता सुद्धा जमिनीत 57 हजार मे. टन सोने शिल्लक आहे, आतापर्यंत काढलेल्या सोन्याला 23 मीटर रुंद आणि 23 मीटर लांब क्युबमध्ये सामावले जाऊ शकते. 2016 च्या आकडेवारीनूसार चीन, ऑस्ट्रेलिया आणि द. आफ्रिका यांनी सर्वाधिक सोने खोदले आहे. जगात सर्वाधिक सोन्याचा साठा असलेला अमेरिका चौथ्या क्रमांकावर आहे, एकुण सोन्याचा सात टक्के हिस्सा उद्योगांसाठी वापरला जातो. इलेक्ट्रॉनिक, मेडीसिन, कम्युनिकेशन डीव्हाईस, एअरक्राफ्ट इंजिन, स्पेस क्राफ्ट तयार करण्यासाठी सोने वापरले जाते.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच