AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बायकोचं अफेअर, संतप्त नवऱ्याने घेतला टोकाचा निर्णय, मंदिरात जबरदस्तीने प्रियकरासोबत लग्न लावलं, गावकऱ्यांनी मात्र…

viral news : बायकोचं बाहेर अफेअर सुरु असल्याची नवऱ्याला माहिती मिळाली. त्यानंतर त्याने टोकाला निर्णय घेतला. ज्यावेळी हा सगळा प्रकार सुरु होता, त्यावेळी गावकऱ्यांना मोठा धक्का बसला. त्या घटनेचा एक व्हिडीओ सुध्दा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

बायकोचं अफेअर, संतप्त नवऱ्याने घेतला टोकाचा निर्णय, मंदिरात जबरदस्तीने प्रियकरासोबत लग्न लावलं, गावकऱ्यांनी मात्र...
bihar newsImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 08, 2023 | 1:06 PM
Share

मुंबई : बिहार (bihar news) राज्यातील नवादा जिल्ह्यातील एका लग्न झालेल्या महिलेलं बाहेर अफेअर (navada viral news) होतं. ज्यावेळी प्रियकर त्या महिलेला भेटायला आला, त्यावेळी तिच्या घरच्यांनी त्याला पकडून ठेवलं. त्याला मारहाण सुध्दा करण्यात आल्याचं व्हिडीओत दिसत आहे. महिलेचा पती ज्यावेळी घरी पोहोचला, त्यावेळी त्याने टोकाला निर्णय घेतला. त्याने तिथल्या एका देवळात लग्न लावून दिलं आहे. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर (bihar police) व्हायरल झाला आहे. पोलिस अधिकारी म्हणत आहे की, या प्रकरणात कसल्याची प्रकारची तक्रार अद्याप आमच्याकडे आलेली नाही.

हा प्रकार बिहार राज्यातील नवादा जिल्ह्यातील नारदीगंज क्षेत्रातील कहुआरा गावातील आहे. युवक आपल्या कामासाठी बाहेर गेला होता. त्यावेळी महिलेचा प्रियकर घरी पोहोचला. युवकाच्या नातेवाईकांनी दोघांना पकडले आणि त्यांची धुलाई केली. त्यानंतर त्या तरुणाला बांधून घातला होता. ज्यावेळी महिलेच्या पतीला हा सगळा प्रकार समजला. त्यावेळी तो अधिक टेन्शनमध्ये आला. तो घरी आला, त्यानंतर त्याने दोघांना जवळच्या मंदीरात नेले, त्याचबरोबर तिथं त्यांचं लग्न लावून दिलं.

दोघांचं जबरदस्तीनं लग्न लावून दिलं जातं होतं. त्यावेळी तिथं ग्रामस्थ आणि इतर लोकं सुध्दा उपस्थित होती. विशेष म्हणजे त्या प्रियकराने महिलेच्या डोक्यात सगळ्याच्या समोर कुंकू लावलं. या प्रकारानंतर त्या दोघांना गावातून हाकलून देण्यात आलं. या सगळ्या प्रकरणात पत्नीचा नवरा काहीचं बोलायला तयार नाही. या घटनेचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, त्यामध्ये हा सगळा प्रकार दिसत आहे.

व्हायरल व्हिडीओ पाहून अधिकारी काय म्हणाले ?

त्या महिलेचा पती नवादा येथील नारदीगंज परिसरातील गरहीया गावातील रहिवासी आहे. त्याचं सुध्दा लग्न झालं आहे आणि त्याला सुध्दा तीन मुलं आहेत. त्याचबरोबर ती महिला सुध्दा कहूआरा गावातील रहिवासी आहे. त्या महिलेला सुध्दा दोन मुलं आहेत. या प्रकरणी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, ही बाब उजेडात आली आहे. या प्रकरणात अजूनतरी आमच्याकडे कसल्याची प्रकारची तक्रार आलेली नाही. त्यामुळे आम्ही काही सांगू शकत नाही.

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.