राहुल गांधींना २ तासानंतर पोलिसांनी सोडले, बाहेर येताच दाखवले भारताचे संविधान…
काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी आज दिल्लीत निवडणूक आयुक्तांच्या भेटीसाठी मोठे ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर किंग्जवे पोलिसांनी त्यांना घटनास्थळावरुन ताब्यात घेतले होते. दोन तासानंतर त्यांना सोडण्यात आले.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी आज दिल्लीत निवडणूक आयुक्तांच्या भेटीसाठी मोठे ठिय्या आंदोलन केले. आठ तास हे आंदोलन केल्यानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची रात्री उशीरा धरपकड करण्यात आली. त्यानंतर किंग्जवे कॅम्प पोलिसांनी त्यांना घटनास्थळावरुन ताब्यात घेतले. दोन तासानंतर त्यांना सोडण्यात आले, तेव्हा राहुल गांधी यांनी देशाचे संविधान दाखवले.
काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज दिल्लीत दणाणून सोडली. निवडणूक आयुक्तांनी बेकायदेशीर पणे SIR मोहिम सुरु केली असून मतदारांना वगळले तसेच फॉर्म 6 मध्ये बेकायदेशीर बदल केल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.त्यांनी राजीनामा द्यावा अशी त्यांची मागणी आहे. यासाठी त्यांनी आज नवी दिल्लीत आठ तास ठिय्या आंदोलन केले. आकाशवाणी परिसरात राहुल गांधी आणि काँग्रेसच्या कार्यकर्ते घोषणााबाजी करत राहिले. त्यानंतर सायंकाळी उशीरा राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. त्यानंतर दोन तासांनी पोलिसांनी त्यांना सोडले.
प्रणिती शिंदे आम्ही सकाळपासून बसलो होतो. ग्यानेश कुमार यांची भेट आम्हाला हवी होती. सीईसी ३०० एमपींना भेटणार होते. त्यांना काय एवढी भीती होती. भाजपाचे नेते आणि ते एका माळेचे मणी आहेत. त्यांना आरआरएसच्या प्रमाणे देशद्रोह करायचा आहे. आम्ही हे खपवून घेणार नाही असे खासदार प्रणिती शिंदे यांनी यावेळी सांगितले.
आम्ही राजीनामा घेऊच…
पोलिस बळाचा वापर करण्यात आला आहे. आम्हाला सहा ते सात जणांना खेचून नेण्यात आले. मी आकाशवाणी मी पडले. आम्हाला दोन तास पोलिसांनी बसवून ठेवले. माझी चप्पल गायब झाली मी अनवाणी आहे. हे काय सुरु आहे. आम्ही थांबणार नाही. ग्यानेश कुमार यांचा राजीनामा घेऊनच राहणार असे काँग्रेसच्या कार्यकर्त्या वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे. हे जे आम्हाला घाबरावयाचा प्रयत्न करत आहे. आम्ही घाबरणार नाही आम्ही लढणारी माणसे आहोत. आम्ही आंदोलन करणार आणि ग्यानेश कुमारांचा राजीनामा घेणारच असे वर्षा गायकवाड यांनी यावेळी प्रतिक्रीया देताना सांगितले.
