AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तो परत येतोय…पुन्हा छत्र्या कपाटातून बाहेर काढा, या तारखेपासून पुन्हा धुवाँधार बॅटींग

सध्या भारताच्या बहुतांश भागात दुष्काळ सदृश्य स्थिती आहे, परंतु पॅसिफिक महासागरात हवामान प्रणाली तयार होत आहेत. जर ही मान्सून प्रणाली बंगालच्या उपसागरात पोहोचली, तर येत्या १८ ते २५ जुलै दरम्यान रुसलेला मान्सून पुन्हा परत येऊ शकतो.

तो परत येतोय...पुन्हा छत्र्या कपाटातून बाहेर काढा, या तारखेपासून पुन्हा धुवाँधार बॅटींग
monsoon return
| Updated on: Jul 12, 2026 | 5:34 PM
Share

गेले दोन ते तीन दिवसांपासून पावसाने ओढ दिली आहे. भारतातील अनेक भागात दुष्काळदृश्य परिस्थिती आहे. देशाचा पूर्व भाग वगळता दुष्काळ सारखी परिस्थिती आहे. पावसाने ओढ दिल्याने शेतकरी चिंतेत आहे.मान्सूनचा वेग अचानक थांबलेला असल्याने एल-निनो परिणामाची धास्ती शेतकऱ्यांसह अनेकांच्या मनात दाटली आहे. परंतू आता एक चांगली बातमी आली आहे. रुसलेला मान्सून पुन्हा वेग पकडणार आहे. काय नेमकी स्थिती बनली आहे हे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

monsoon retrun

monsoon retrun

भारतात मान्सून देशभर पसरल्यानंतर अचानक मध्येच त्याला ब्रेक लागला आहे.हवामानात सध्या कुठे पाऊस तर कुठे शुष्क वातावरण आहे. महाराष्ट्रातील अनेक भागात पावसाने ओढ दिली आहे. शेतकऱ्यांनी चिंता लागून राहिली आहे.परंतू त्यातल्या त्यात एक चांगली बातमी आली आहे. पश्चिम प्रशांत महासागरात अनेक हवामान सिस्टीम तयार होत आहे. परंतू चांगली बातमी ही की अनेक हवामानाचे मॉडेल सांगत आहेत की यातील काही बंगालाच्या उपसागरापर्यंत पोहचले. अनेक हवामानाचे सिस्टीम तयार होत असून त्या फेव्हरेबल जागांवर आहे. त्यामुळे १८ ते २५ जुलै दरम्यान मान्सून पुन्हा सक्रीय होऊ शकतो. परंतू मध्य आणि उत्तर भारतात यात अडथळा येऊ शकतो.

पूर्व भारतात पाऊस बरसत आहे. परंतू पश्चिम, उत्तर आणि मध्य भागात दुष्काळाचा सामना सुरु आहे. यामुळे पिकांवर परिणाम होत आहे. खास करुन भात, मका आणि डाळी या पिकांवर याचा परिणाम होणार आहे. जलशयांची पातळी कमी होत आहे. त्यामुळे पुणे, मुंबई येथील पिण्याच्या पाण्यावर आता पासूनच कपात सुरु झाली आहे. पिण्याचे पाणी आणि सिंचनाचा प्रश्न आवासून उभा आहे. मान्सूनची ट्रफ लाईन तिच्या सामान्य स्थितीपासून हटले. त्यामुळे बाष्प घेऊन येणारे वारे पुरेशा प्रमाणात पोहचत नाहीएत.त्यामुळे चिंता निर्माण झाली आहे.

अशात प्रशांत महासागरातून येणारी बातमी आशेचे किरण बनून येत आहे. प्रशांत महासागरात ट्रॉपिकल सिस्टीम वा लो प्रेशर एरिया बनण्याची प्रक्रीया सुरु आहे. जर ही सिस्टीम पश्चिमेच्या दिशेने वाढली आणि भारताच्या जवळ बंगालचा उपसागरात प्रवेश केला आहे, त्यामुळे ती मान्सूनची मजबूत करु शकते. अनेक आंतरराष्ट्रीय आणि भारतीय मॉडेल उदा. ECMWF, GFS आणि IMD चे मॉडेल ही शक्यता वर्तवत आहेत.

मान्सून १८-२५ जुलैला परतणार ?

आता १८ ते २५ जुलै हा कालावधी मान्सूनसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. जर बंगालच्या उपसागरात पॅसिफिक महासागरातील प्रणाली सक्रिय झाली, तर त्या खालच्या पातळीवरील वाऱ्यांना बळकट देतील आणि त्यामुळे मान्सूनचा पट्टा पुन्हा सामान्य स्थितीत येऊ शकेल. यामुळे मध्य भारत, उत्तर भारत आणि राजस्थान-गुजरातसारख्या कोरड्या भागांमध्ये चांगला पाऊस पडू शकतो असे म्हटले जात आहे. ला-नीनासारखी परिस्थिती किंवा पॅसिफिकमध्ये विकसित होणाऱ्या प्रणाली भारताच्या मान्सूनला आधार देऊ शकतात.मात्र,जर या प्रणाली कमकुवत झाल्या किंवा त्यांनी दिशा बदलली, तर दुष्काळाची स्थिती अधिक गंभीर होऊ शकते. त्यामुळे, भारतीय हवामान विभाग (IMD) आणि इतर संस्था दररोज माहितीचे विश्लेषण करीत आहेत.

Follow Us
दिल्लीमध्ये 15 हजार पोलीस तैनात; CJP आंदोलनाला परवानगी नाही मात्र...
CJP Delhi Protest : दिल्लीमध्ये 15 हजार पोलीस तैनात; CJP आंदोलनाला परवानगी नाही मात्र अभिजीत दीपके...
जंतर-मंतरवरील आंदोलनावर पोलिसांची ड्रोनद्वारे नजर; प्रत्येक हालचाल...
Delhi CJP Jantar Mantar Protest : जंतर-मंतरवरील आंदोलनावर पोलिसांची ड्रोनद्वारे नजर; 150 पोलिसांना बॉडी कॅमेरे, प्रत्येक हालचाल होणार...
ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील आंदोलनाचा धसका? जंतरमंतर परिसरात जाणारे
Delhi CJP Jantar Mantar Andolan : ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील आंदोलनाचा धसका? जंतरमंतर परिसरात जाणारे सर्व रस्ते बंद, इंटरनेट सेवाही...
सीजेपी आंदोलनाआधी दिल्लीचं छावणीत रूपांतर; जंतर-मंतरवर BSF, CRPF अन्..
Delhi Jantar- Mantar CJP Andolan : सीजेपी आंदोलनाआधी दिल्लीचं छावणीत रूपांतर; जंतर-मंतरवर BSF, CRPF अन्....
मला अटक करा... अभिजीत दीपकेंचं सरकारला खुलं आव्हान, पुढे म्हणाले...
Abhijeet Dipke : मला अटक करा... अभिजीत दीपकेंचं सरकारला खुलं आव्हान, पुढे म्हणाले...
गजानन कीर्तिकरांच्या घरवापसीच्या चर्चेने एकनाथ शिंदे संतापले? म्हणाले,
Shivsena : गजानन कीर्तिकरांच्या घरवापसीच्या चर्चेने एकनाथ शिंदे संतापले? म्हणाले, आम्हाला गांभीर्याने....
मोदीजी, बीपी चेक करत राहा; अभिजीत दीपकेंचा पंतप्रधानांना टोला
Abhijeet Dipke : मोदीजी, बीपी चेक करत राहा; अभिजीत दीपकेंचा पंतप्रधानांना टोला, मेट्रो-रेल्वे बंदीवरून सरकारवर निशाणा
रेल्वे, मेट्रो बंदच्या निर्णयाविरोधात कोर्टात सुनावणी; कोर्टाने....
CJP Protest : सीजेपीचं उद्या दिल्लीत आंदोलन, रेल्वे, मेट्रो बंदच्या निर्णयाविरोधात कोर्टात सुनावणी; कोर्टाने केंद्राला काय सांगितलं?
गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करणार? स्वतःच केला मोठा खुलासा
Gajanan Kirtikar : Shivsena : गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करणार? स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाले...
एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर दीपकेंचा सरकारला टोला
Abhijeet Dipake : एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर अभिजित दीपकेंचा सरकारला टोला