AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगातलं सर्वात उंच मंदिर, डोळ्याचं पारणं फेडणारा गाभारा, गर्दी होईल, रांगा नाहीत!! 2 मिनिटांत थेट गाभाऱ्यापर्यंत प्रवेश, कुठे उभारलं जातंय?

हे मंदिर अनेक अर्थांनी वैशिष्ट्यपूर्ण आहे. मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दा होईल, पण ती जाणवणार नाही. दर्शनासाठी धक्का-बुक्की, चेंगरा-चेंगरीची तर सूतराम शक्यता नाही. ५०४ फूट उंच मंदिरात ५१ फुटांची देवीची प्रतिमा भाविकांच्या डोळ्याना समाधान देईल.

जगातलं सर्वात उंच मंदिर, डोळ्याचं पारणं फेडणारा गाभारा, गर्दी होईल, रांगा नाहीत!! 2 मिनिटांत थेट गाभाऱ्यापर्यंत प्रवेश, कुठे उभारलं जातंय?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Feb 22, 2023 | 9:25 AM
Share

भारतात  (India)उभं राहतंय जगातलं (World) सर्वात उंच मंदिर (Tallest temple). 1500 कोटी कोटी रुपये खर्च करून हे 504 फूच उंच मंदिर बांधलं जातंय. मंदिराची लांबी ४०० फूट असेल. मंदिरात 51 फूट उंचीची देवीची मूर्ती असेल. गुजरात राज्यातील अहमदाबाद येथे वैष्णोदेवी सर्कलजवळ जासपूर इथे हा प्रकल्प उभा राहतोय. जगत जननी मां उमिया देवीचं हे मंदिर असेल. मंदिराच्या गर्भगृहाचा पाया तयार झालाय. 2026 मध्ये भव्य मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाईल. त्यानंतर सामान्य भाविकांसाठी ते खुले होईल. मंदिराची अनेक वैशिष्ट्य आहे. त्यापैकी एक म्हणजे इथे दर्शनाला असंख्य ठिकाणाहून भाविक येतील. पण गर्दी जाणवणार नाही. रांगेत ताटकळत उभं रहावं लागणार नाही. तर 2 मिनिटात थेट देवीच्या गाभाऱ्यापर्यंत नेऊन सोडलं जाईल.

जर्मन आणि भारतीय स्थापत्यशास्त्र

या मंदिराची अनेक वैशिष्ट्ये आहेत. जर्मन आणि भारतीय स्थापत्यकलेचा हा उत्तम संगम असेल. उमियाधाम संस्थानाच्या मते, मंदिरात 1440 खांब असतील. हा एक विक्रम ठरेल. यापू्र्वी सरदार पटेल यांच्या जगातील सर्वात उंच पुतळ्याला 800 खांब वापरण्यात आले होते. मंदिर बांधकामासाठी एक मोहीम राबवली जात आहे. हुं पण पायानो पिल्लर… असं त्याचं नाव आहे. याअंतर्गत कुणीही व्यक्ती 11 लाख रुपये देऊन हा खांब आपल्या नावाने बांधू शकतो. आतापर्यंत ४०० जणांनी खांब बांधण्यासाठी दान दिलंय. यात पाटीदार आणि इतर समाजबांधव तसेच एनआरआयचाही समावेश आहे.

300 फूट उंचावरून दिसेल शहराचा नजारा

या मंदिरात 300 फूट उंचावर एक व्ह्युइंग गॅलरी असेल. इथून अहमदाबाद शहराचं संपूर्ण दृश्य डोळ्यात साठवता येईल. संस्थानच्या मते, मंदिर पूर्ण झाल्यानंतर जर्मनीची टीम येईल आणि ते किती मजबूत झालंय, याची तपासणी करेल. तपासण्या होतील. ही प्रक्रिया 6 महिने चालेल. त्यानंतर मंदिरात मूर्तीची प्रतिष्ठापना होईल.

न रांग, ना चेंगरा-चेंगरी

मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे इथं दर्शनासाठी रांग लावाली लागणार नाही. त्यामुळे धक्काबुक्की नाही आणि चेंगरा-चेंगरीची तर सूतराम शक्यता नाही. भाविकांसाठी व्हीआयपी पासही नसतील. त्याऐवजी एस्केलेटर्स लावण्यात आले आहे. या एस्केलेटर्सची स्पीडही निश्चित ठरलेली असेल. भाविक दोन मिनिटात देवीच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचतील. हे भव्य मंदिर पाहण्यासाठी गर्दी उसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही खास व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच दोन मजले पार्किंगसाठी ठेवण्यात आले आहेत.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.