
कॅलिफोर्निया : सध्या इलेक्ट्रीक कार घेण्याचा ट्रेंड येत आहे. आपल्या देशातही विविध देशाच्या इलेक्ट्रीक कार बाजारात येत आहेत. या कार चालविताना काळजी घ्यावी लागत आहे. कारण नेहमीच्या कारच्या तुलनेत या कार चालणे थोडे वेगळे आहे. अमेरीकेतील कॅलिफोर्नियात एका विचित्र अपघात घडला आहे.
ट्वीटरवर वेस्ट कॅलिफोर्नियाच्या प्रातांतील एका टेस्ला कार चालकाकडून घडलेल्या विचित्र अपघाताचा फोटो ट्वीट करण्यात आला आहे. टेस्लाच्या इलेक्ट्रीक कार आपल्या देशात जरी अजून आल्या नसल्या तरी आंतरराष्ट्रीय बाजारात या कारना खूपच मागणी आहे. या कार कंपनीचे मालक इलोन मस्क सर्वात श्रीमंत उद्योगपती म्हणूनही ओळखले जात आहेत.
या टेस्ला कार चालकाने चुकून ब्रेक दाबण्याऐवजी एस्कलेटर दाबल्याने या कारने भिंत तोडून थेट स्वीमिंग पूलच गाठल्याचे उघडकीस आले आहे. या कारमध्ये लहान मुलासह एकूण तीन जण बसले होते, त्या तिघांनाही रेस्क्यू टीमने सुखरूपपणे वाचवले आहे. त्यामुळे इलेक्ट्रीक कार चालविताना जरा सांभाळून चालविल्या पाहीजेत.