“संजय राऊत, एक तर तुम्ही या नाही तर आम्ही येतो”; कन्नडिगांनी राऊतांना डिवचलं

कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांमुळे सीमाभागातील गावामध्ये ताणतणाव पसरत आहे. त्यामुळे या परिसरात महाराष्ट्र आणि कर्नाटकची असणारी बससेवा ठप्प झाली आहे.

संजय राऊत, एक तर तुम्ही या नाही तर आम्ही येतो; कन्नडिगांनी राऊतांना डिवचलं
Follow us
| Updated on: Dec 07, 2022 | 4:15 PM

बेळगावः महाराष्ट्र-कर्नाटक वादावर लवकर तोडगा निघाला नाही तर, माझ्यासह आमच्या नेत्यांना बेळगावला जावं लागेल असा इशारा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला होता. त्यानंतर 48 तासानंतरही हा वाद विकोपाला जात असून आता कर्नाटकातील कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रासह ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनाच थेट इशारा दिला आहे.

महाराष्ट्रातून कर्नाटकात आलेल्या वाहनांची कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली होती. त्यानंतर त्याचे जशास तसे पडसाद महाराष्ट्रात उमटले.

त्यानंतर आता कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी खासदार संजय राऊत यांना हिम्मत असेल तर बेळगावामध्ये या. नाही तर आम्ही तर तिकडे येतो असा थेट इशाराच राऊतांना देण्यात आला आहे. त्यामुळे हे प्रकरण आता आणखी चिघळणार असल्याचे दिसत आहे.

महाराष्ट्रात विविध संघटनांनी जशास तसे उत्तर दिल्यानंतर कर्नाटकातील वेगवेगळ्या संघटनांनीही आता महाराष्ट्राला इशारा देत बसला काळे काय फासता, हिम्मत असेल तर बेळगावमध्ये या अशा चिथावणीखोर वक्तव्य केली आहेत.

महाराष्ट्रात गेलेल्या कर्नाटक परिवहन महामंडळाच्या बसला काळे फासून त्यावर महाराष्ट्राचे स्टिकर लावल्या प्रकरणी कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यर्त्यांनी हा चिथावणीखोर इशारा दिला आहे.

कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांमुळे सीमाभागातील गावामध्ये ताणतणाव पसरत आहे. त्यामुळे या परिसरात महाराष्ट्र आणि कर्नाटकची असणारी बससेवा ठप्प झाली आहे.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर दोन्ही राज्यातील सरकार काय भूमिका घेणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. तर दुसरीकडे सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील गावांनी कर्नाटकात जाण्याचा निर्णय घेतला असल्याने हा वाद आणखी चिघळणार आहे.

Non Stop LIVE Update
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.