AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Owaisi : आपण ‘हुकूमत’ला बदलू शकत नाही, मुस्लिम व्होटबँकेवर ओवैसींचं मोठं वक्तव्य, केजरीवाल पाठोपाठ गुजरात दौऱ्यावर

या देशात मुस्लिम व्होट बँक कधीच नव्हती आणि असणारही नाही. जर आपण सरकार बदलू शकतो तर भारतीय संसदेत मुस्लिमांचे इतके कमी प्रतिनिधित्व का?

Owaisi : आपण 'हुकूमत'ला बदलू शकत नाही, मुस्लिम व्होटबँकेवर ओवैसींचं मोठं वक्तव्य, केजरीवाल पाठोपाठ गुजरात दौऱ्यावर
असदुद्दीन ओवैसीImage Credit source: tv9
| Updated on: May 14, 2022 | 8:58 PM
Share

नवी दिल्ली : देशातील वातावरण आणि राजकारण हे हनुमान चालिसा, मशीदवरील भोंगे आणि बुल्डोजरमुळे तंग झाले असतानाच आता ऑल इंडिया अजलिस-ए-इत्तेहाद मुस्लीमीन प्रमुख असदुद्दीन ओवैसी (AIMIM chief Asaduddin Owaisi) यांनी पुन्हा एकदा बाबरी मशीद आणि ज्ञानवापी मशिदीच्या नावावर मुस्लिमांमध्ये खळबळ उडवून देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी यावेळी ‘तुम्ही सरकार बदलू शकत नाही कारण तुमची व्होट बँक (vote bank) कधीच नव्हती, नाही आणी होणारही नाही, असं म्हटलं आहे. ते गुजरातमधील अहमदाबादमध्ये जनतेला संबोधित करताना बोलत होते. तसेच यावेळी त्यांनी आधी बाबरी झाली, आता ज्ञानवापी होत आहे. तुम्ही धूर्तपणे बाबरी मशीद हिसकावून घेतली, पण आता तुम्हाला ज्ञानवापी हिसकावता येणार नाही. ज्ञानवापी मशीद (Gyanvapi issue) होती आणि राहीलं असंही म्हटलं आहे.

तिन्ही पक्षांवर मुस्लिमांचा विश्वासघात केल्याचा आरोप

तर ओवैसी यांनी काँग्रेस, बहुजन समाज, आणि सपा यांच्यावरही निशाणा साधला. त्यांनी तिन्ही पक्षांवर मुस्लिमांचा विश्वासघात केल्याचा आरोप केला. तसेच भाजप, काँग्रेस, बहुजन समाज, आणि सपा यांची इच्छा आहे की तुम्ही मुस्लिम असाल, तर तुमच्या घरात रहा. सध्या ज्ञानवापीचा मुद्दा चालू आहे. काँग्रेस, बसपा, आप आणि सपा या विषयावर काही बोलले का? तुमची व्होट बँक आता राहिलेली नाही. म्हणून हे सगळे गप्प आहेत. तसेच ओवैसी म्हणाले की, या देशात मुस्लिम व्होट बँक कधीच नव्हती आणि असणारही नाही. जर आपण सरकार बदलू शकतो तर भारतीय संसदेत मुस्लिमांचे इतके कमी प्रतिनिधित्व का? बाबरी मशिदीऐवजी आपण सरकार बदलू शकलो असतो. आणि आता तर ज्ञानवापी मशीदाचाही मुद्दा ऐरणीवर आला आहे. आणि फक्त मुस्लिमांची केवळ दिशाभूल केली जात आहे, असेही ओवैसी म्हणाले. तर यासभेत त्यांनी मुस्लिम व्होट बँकवर बोलताना उपस्थित लोकांना विचारले की, मला सांगा की, गुजरातचा मुस्लिम खासदार शेवटचा कधी होता?

पूजास्थान कायदा 1991 चे उल्लंघन

तसेच ओवैसी यांनी ज्ञानवापी मशीदीच्या सर्वेक्षणाला दिलेल्या अनुमतीवरुन प्रश्न उठवताना पूजास्थान कायदा 1991 चे उल्लंघन होत असल्याचे म्हटले आहे. तर व्होट बँकवर ओवैसी बोलण्याची ही पहिलीच वेळ नाही. उत्तर प्रदेश निवडणुकीच्या प्रचारादरम्यान देखील ओवैसी यांनी मुस्लिमांना मतदारांऐवजी ‘मत आकर्षित करणारे’ बनण्याचे आवाहन केले होते. समाजवादी पक्षाने (एसपी) नेहमीच मुस्लिमांचा त्यांच्या मतांसाठी वापर केला आहे आणि त्यांच्या हक्कांसाठी आणि विकासासाठी कधीही काम केले नाही, असे ते प्रयागराजमधील सभेत म्हणाले होते.

तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.