मंत्र्यांसोबत खास कनेक्शन, पाकिस्तानमध्ये VIP ट्रीटमेंट ‘या’ 5 कारणांमुळे ज्योती मल्होत्रा रडारवर

Jyoti Malhotra: 'या' 5 कारणांमुळे ज्योती मल्होत्राचा खरा चेहरा आला सर्वांसमोर, अय्याशीसाठी काहीही... तपास यंत्रणांची देखील उडाली झोप..., ज्योतीचे मंत्र्यांसोबत खास कनेक्शन ते पाकिस्तानमध्ये VIP ट्रीटमेंट...

मंत्र्यांसोबत खास कनेक्शन, पाकिस्तानमध्ये VIP ट्रीटमेंट या 5 कारणांमुळे ज्योती मल्होत्रा रडारवर
फाईल फोटो
| Updated on: May 19, 2025 | 11:27 AM

Jyoti Malhotra: पाकिस्तानी हेरगिरीच्या आरोपाखाली पकडलेल्या ज्योती मल्होत्रावर देशाच्या तपास यंत्रणेचा संशय झपाट्याने वाढत होता. यामागे एक दोन नाही तर अनेक कारणे आहे. ज्योतीची दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयाशी मैत्री होती आणि पाकिस्तानी लष्कर आणि उच्च अधिकाऱ्यांशी तिचे संपर्क होते. एवढंच नाही तर, पाकिस्तान आणि चीनचा व्हिसा देखील सहज मिळत होता. पण इतर लोकांना पाकिस्तान आणि चीनचा व्हिसा फार लवकर मिळत नाही. शिवाय सामान्य घरतील असल्यानंतर देखील ज्योती रॉयल आयुष्य जगत होती. यांसारख्या अनेक गोष्टींमुळे ज्योती तपास यंत्रेणाच्या रडारवर आली.

न्यू अग्रसेन कॉलनीतील रहिवासी ज्योती मल्होत्राने कोरोना काळात तिचं यूट्यूब चॅनल सुरू केलं. सुरुवातीला ज्योती लोकल व्हिडीओ युट्यूब आणि सोशल मीडियावर पोस्ट करत होती. त्यानंतर ज्योती शहरातून बाहेर आली आणि मंदिरांसोबतच परदेशात देखील जाऊ लागली. 2023 नंतर, जेव्हा तिचे पाकिस्तानशी संबंध सुधारले, तेव्हा पाकिस्तानसोबत ज्योतीची मैत्रीही वाढली. पाकिस्तानसोबतच तिला चीनचा व्हिसा देखील सहज मिळाला.

भारताचे चीन आणि पाकिस्तानशी असलेले संबंध सर्वांना माहीत असूनही ज्योतीला सहज व्हिसा मिळाल्याने ती तपास यंत्रणेच्या रडारवर आली. त्यानंतर, पाकिस्तानला गेल्यानंतर, ज्योतीने त्या देशाला चांगल्या गोष्टी दाखवण्यात कोणतीही कसर सोडली नाही. ती तिथली परिस्थिती भारतीय दृष्टिकोनातून अधिक चांगल्या प्रकारे दाखवण्याचा प्रयत्न करत होती.

एवढंच नाही तर, ज्योतीची पाकिस्तान उच्चायुक्तालयातील दानिशशी जवळीक असल्याने तपास यंत्रणांचा संशय अधिकच बळकट झाला. दानिश याच्यासोबत बोलणं आणि त्याला भेटायला येणं देखील सर्वांना खटकणारं होतं.

‘या’ 5 कारणांमुळे संशय झाला अधिक बळकट

1. पाकिस्तान उच्चायुक्तालयातील दानिशशी असलेले खास कनेक्शन

2. दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयात मैत्री.

3. पाकिस्तानी सेना आणि अधिकाऱ्यांसोबत खास संबंध

4. पाकिस्तान आणि चीनचा तात्काळ मिळालेला व्हिसा, जगत होती आलिशान आणि रॉयल आयुष्य…

5. मरियम नवाज यांच्यापर्यंत संपर्क

तपास यंत्रणांची देखील उडाली झोप…

जेव्हा ज्योतीचं आलिशान आणि रॉयल जीवन तपास यंत्रणेसमोर आले तेव्हा त्यांनाही धक्का बसला. काही दिवसांपूर्वी ज्योती बाली येथे गेली होती जिथे ती मजा करत होती. यावेळी ज्योतीसोबत एक पाकिस्तानी अधिकारी असल्याची माहिती देखील समोर आली. सध्या याप्रकरण यंत्रणा कसून तपासणी करत आहे.