हा द्रव पदार्थ आहे सापाचा सर्वात मोठा शत्रू, फक्त दोन थेंब घरात शिंपडा, साप पुन्हा घरात कधीच येणार नाही
आपल्या परिसरात किंवा घरामध्ये पावसाळ्याच्या दिवसांत आपल्याला अनेकदा साप दिसून येतात, आज आपण साप घरात येऊ नये, यासाठी काय उपाय करता येतील त्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

भारतामध्ये हजारो प्रजातीचे साप आढळून येतात, मात्र यातील केवळ हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच साप हे विषारी असतात. मात्र आपला सापांबाबत मोठा गैरसमज हा असतो की, आपल्याला प्रत्येक साप हा विषारीच वाटतो, या गैरसमजामुळे दिसला साप की त्याला आपण मारतो. यामुळे सापाच्या देशातील अनेक दुर्मिळ जाती सध्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. मात्र एक लक्षात घ्या, तुमच्या आसपासच्या परिसरात किंवा इतर ठिकाणी जे साप आढळून येतात, त्यातील मोजक्याच प्रजाती या विषारी असतात, ज्यामध्ये घोणस, फुरसे, मण्यार आणि नाग या सापाच्या प्रजाती सर्वात जास्त विषारी असतात. परंतु साप विषारी असो अथवा बिनविषारी त्याला पकडण्याचा प्रयत्न चुकूनही करू नका, ते तुमच्या जीवावर बेतू शकतं, त्याची माहिती तुमच्या परिसरातील सर्पमित्रांना द्या.
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये घरात साप निघण्याचं प्रमाण वाढतं, कारण पावसाळ्यात सापांच्या बिळात पाणी शिरत आणि ते बिळातून बाहेर पडतात, सुरक्षित आणि उबदार निवारा शोधण्यासाठी ते घरात घुसतात, त्यामुळेच पावसाळ्यात सर्पदंश होण्याच्या घटनांमध्ये देखील मोठी वाढ होते. अशा परिस्थितीमध्ये सतर्कता हाच सापांपासून बचावाचा सर्वोत्तम मार्ग आहे. मात्र असे काही छोटे -छेटे उपाय आहेत, ज्यामुळे साप तुमच्या घराच्या आसपास देखील फिरणार नाहीत, अशाच काही उपायांबाबत आपण जाणून घेणार आहोत.
रॉकेल – सापला रॉकेल अर्थात केरोसीनच्या वासाचा त्रास होतो, त्यामुळे जिथे रॉकेल सांडलं आहे, किंवा घरात रॉकेल आहे, अशा ठिकाणांपासून साप दूर राहातो, तो त्या परिसरामध्ये देखील फिरकत नाही.
त्याचप्रमाणे सापला लसून, कांदा पुदीना आणि तुळस या सारख्या वनस्पतींचा वास देखील सहन होत नाही, ज्या घरात यापैकी एक झाड असेल त्या घरात साप कधीच जाणार नाही.
कापूर – दररोज सकाळी आपल्या घरातील देवापुढे कापूर लावावा, यामुळे वातावरण तर प्रसन्न राहातच, त्याचसोबत कापुराचा वास सापाला त्रासदायक ठरतो, त्यामुळे जर तो घरात असेल तर दूर निघून जातो, कधीही तुमच्या घरात साप दिसणार नाही.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
