या छोट्या देशाचा भारताला सर्वात मोठा धक्का, होणार प्रचंड नुकसान, एका निर्यणामुळे देशभरात खळबळ
अमेरिकेनं भारतावर लावलेल्या टॅरिफमुळे भारतीय निर्यातदारांचं आधीच मोठं नुकसान झालं आहे, अमेरिकेमध्ये होणारी निर्यात प्रचंड प्रमाणत कमी झाली आहे. त्यानंतर आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे.

भारत रशियाकडून तेलाची खरेदी करतो म्हणून अमेरिकेनं भारतावर 25 टक्के अतिरिक्त टॅरिफ लावला आहे. त्यामुळे आता अमेरिकेनं भारतावर लावलेला एकूण टॅरिफ 50 टक्क्यांवर पोहोचला आहे. अमेरिकेनं भारतावर लावलेल्या टॅरिफमुळे भारत आणि अमेरिकेमधील संबंध ताणले गेले आहेत. निर्यातीला देखील मोठा फटका बसला आहे. मात्र अमेरिकेनं भारतावर टॅरिफ लावल्यानंतर भारतानं रशिया आणि चीनसोबतची निर्यात वाढवली आहे, याचा काही प्रमाणात भारताला फायदा होताना दिसत आहे. मात्र दुसरीकडे भारतीय वस्तूंची आवक अमेरिकेत घटल्यामुळे तिथे मात्र महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. एकीकडे भारत अमेरिकन टॅरिफसोबत लढत असतानाच आता भारतासाठी आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे, यामुळे भारताचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे.
मॅक्सिकोने (Mexico) भारत, चीनसह आशिया खंडातील अनेक देशांवर 50 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे. यामुळे आता भारत सरकार आणि भारतातील निर्यातदारांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. एका रिपोर्टनुसार मॅक्सिकोने केलेल्या या घोषणेनंतर भारतानं यावर आक्षेप देखील घेतला आहे, येत्या एक जानेवारीपासून मॅक्सिको भारतामधील विविध वस्तूंवर तब्बल 50 टक्के टॅरिफ लावणार आहे. पीटीआयच्या एका रिपोर्टानुसार मॅक्सिकोने भारतामधील निर्यात होणाऱ्या विविध वस्तूंवर 50 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला आहे, या सर्व पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारकडून स्पष्ट संकेत देण्यात आले आहेत, की या टॅरिफ धोरणानंतर भारत सरकार आपल्या देशातील निर्यातदारांच्या हिताचं संरक्षण करण्यासाठी आवश्यक ते सर्व पाऊलं उचलेल.
मॅक्सिकोने लावलेल्या या टॅरिफमुळे तब्बल 52000 कोटी रुपयांपेक्षाही जास्त निर्यातीवर थेट परिणाम होणार आहे. भारत आणि मॅक्सिकोदरम्यान सुरू असलेल्या आयात -निर्यातीच्या आकड्यांवर नजर टाकल्यास स्पष्ट दिसून येते की, आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये भारतानं तब्बल 8.90 अब्ज डॉलर रुपयांच्या वस्तुंची निर्यात मॅक्सिकोमध्ये केली होती. तर मॅक्सिकोकडून 2.9 डॉलरची आयात केली होती, अशा स्थितीमध्ये जर आता एक जानेवारीपासून मॅक्सिकोने भारतावर टॅरिफ लावला तर त्याचा मोठा परिणाम हा भारतावर होण्याची शक्यता आहे, या पार्श्वभूमीवर मॅक्सिकोसोबत सरकारचं बोलणं सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.
