AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जेवणाची पाकिट घेण्यासाठी थांबले, पण १५ जणांच्या आयुष्यातील शेवटचे जेवण ठरले

परतणाऱ्या लोकांसाठी मध्य प्रदेशातील सिधी येथील चुरहट-रीवा राष्ट्रीय महामार्गावर जेवणाच्या पाकिटांची व्यवस्था केली होती. तीन बसेस त्यासाठी थांबल्या होत्या.

जेवणाची पाकिट घेण्यासाठी थांबले, पण १५ जणांच्या आयुष्यातील शेवटचे जेवण ठरले
| Updated on: Feb 25, 2023 | 10:59 AM
Share

भोपाळ : शबरी मातेच्या जयंतीनिमित्त मध्य प्रदेशातील सतनामध्ये कोल समाजाचा महाकुंभ 24 फेब्रुवारी रोजी (Kol Samaj Sammelan)आयोजित केला होता. या कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit shah), मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान (shivraj singh chouhan) सहभागी झाले होते. या महाकुंभामध्ये सहभागी होण्यासाठी राज्यभरातून लोक आले होते. कार्यक्रम आटोपून अनेक जण आपल्या गावाकडे परत निघाले. परतणाऱ्या लोकांसाठी मध्य प्रदेशातील सिधी येथील चुरहट-रीवा राष्ट्रीय महामार्गावर जेवणाच्या पाकिटांची व्यवस्था केली होती. तीन बसेस त्यासाठी थांबल्या होत्या. परंतु ही जेवणाची पाकिटे त्यांच्या आयुष्यातील शेवटची ठरली.

ट्रकने धडक दिली तेव्हा काही प्रवाशी जेवणाची पाकिटे घेऊन बसमध्ये बसली होती. परंतु या तीन बसेसला ट्रकने धडक दिल्यामुळे पंधरा जणांचा मृत्यू झाला.

रीवा आणि सतना जिल्ह्यांच्या सीमेवर शुक्रवारी रात्री उभ्या असलेल्या या बसेसवर एका सिमेंटच्या ट्रक आदळला. त्या ट्रकने तीन बसेसला धडक दिली. या अपघातात 15 जणांचा मृ्त्यू झाला. अपघातातील दहा मृतांची ओळख पटली आहे. इतर पाच जणांची ओळख अजून पटलेली नाही.या अपघातात जखमी झालेल्यापैकी 10 जणांची प्रकृती गंभीर आहे. बरखडा गावाजवळील बोगद्याच्या बाहेर शुक्रवारी रात्री हा अपघात झाला आहे.

महाकुंभात गेले होते

सतना येथे आयोजित कोल समाजाच्या महाकुंभात सहभागी होऊन या बसेस परतत येत होत्या. या कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री शिवराज सिंह देखील सहभागी झाले होते. सीएम शिवराज सिधीमध्ये होते. माहिती मिळताच त्यांनी बडखरा गाव गाठले.

दोन बसेस दरीत कोसळल्या

रात्री ९ वाजता मोहनिया बोगद्यापासून काही अंतरावर हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. येथे भरधाव ट्रकने धडक दिल्याने दोन बस 10 फूट खोल दरीत कोसळल्या. महामार्गावरच एक बस उलटली. ट्रक सिमेंटने भरलेला होता, धडकेनंतर उलटला.

जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांसह सिधी आणि रीवा जिल्ह्याचे उच्च अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत आणि दोन्ही बसमधील सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आले आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि भारतीय जनता पक्षाच्या मध्य प्रदेश युनिटचे अध्यक्ष विष्णू दत्त शर्मा हे देखील सतना येथून घटनास्थळी पोहोचले होते, असे अधिकाऱ्याने सांगितले.

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.