AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमित शाहांचं शीर धडावेगळं करायला हवं, महुआ मोईत्रांचं वादग्रस्त विधान!

तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांचा उल्लेख करत मोठे विधान केले आहे. त्यांच्या या विधानामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे मोईत्रा यांनी हे विधान भर सभेत केले आहे. आता भाजपा यावर नेमके काय उत्तर देणार? मोईत्रा यांच्यावर काही कारवाई केली जाणार का? असे विचारले जात आहे.

अमित शाहांचं शीर धडावेगळं करायला हवं, महुआ मोईत्रांचं वादग्रस्त विधान!
mahua moitra and amit shah
| Updated on: Aug 29, 2025 | 6:32 PM
Share

Mahua Moitra : पश्चिम बंगालच्या राजकारणात तृणमूल काँग्रेस आणि भाजपा यांच्यात उघड संघर्ष पाहायला मिळतो. निवडणुकीच्या काळात तर या दोन्ही पक्षांचे नेते, कार्यकर्ते एकमेकांवर हल्ले करायलाही मागेपुढे पाहात नाहीत. वैचारिक मदतभेदांमुळे या पक्षांतील शीर्षस्थ नेतेदेखील एकमेकांवर सडकून टीका करताना दिसतात. दरम्यान, यावेळी तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांचा उल्लेख करत मोठे विधान केले आहे. त्यांच्या या विधानामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे मोईत्रा यांनी हे विधान भर सभेत केले आहे. आता भाजपा यावर नेमके काय उत्तर देणार? मोईत्रा यांच्यावर काही कारवाई केली जाणार का? असे विचारले जात आहे.

मोईत्रा नेमकं काय म्हणाल्या?

महुआ मोईत्रा यांनी आपला भाषणात बोलताना अमित शाहा यांचा शिरच्छेद करून त्यांचे शिर टेबलावर आणून ठेवायला हवे, असे विधान केले आहे. त्या भारतात केल्या जाणाऱ्या घुसखोरीच्या मुद्द्यावर बोलत होत्या. घुसखोरी थांबवण्याची पूर्ण जबाबदारी ही केंद्र सरकारची आहे, असेही त्या यावेळी म्हणाल्या. “ते फक्त घुसघोर..घुसखोर असं बोलताना दिसत आहेत. आपल्या सीमांचे रक्षण करणारी जी संस्था आहे ती संस्था केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अख्त्यारित येते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट रोजी दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून आंदोलन केले. या भाषणात त्यांनी घुसखोरांमुळे लोकसंख्येत मोठी वाढ होत आहे, असे विधान त्यांनी केले. पंतप्रधान हे विधान करत असताना समोरच्या रांगेत बसलेले केंद्रीय गृहमंत्री टाळ्या वाजवत होते,” असे मोईत्रा म्हणाल्या.

अगोदर अमित शाहा यांचे…

तसेच, “भाराताच्या सीमेचे रक्षण करणारे कोणीही नाही. दररोज अन्य देशातून शेकडो, हजारो, लाखोंच्या संख्येने घुसखोरी होत आहे. आपल्या माता-भगिनींवर वाकडी नजर टाकली जात आहे. आपल्या जमिनी बळकावल्या जात आहेत. असे असेल तर अगोदर तुम्ही अमित शाहा यांचे शिर धडापासून वेगळे करून टेबलावर ठेवायला हवे,” असेही मोईत्रा म्हणाल्या.

भाजपा नेमकी काय भूमिका घेणार?

देशातील रोहिंगे आणि बांगलादेशातील घुसखोरांना देशातून बाहेर काढण्यासाठी भारत सरकारकडून सध्या ऑपरेशन पुशबॅक चालू केले आहे. सरकारकडून ही कारवाई केली जात असताना आता मोईत्रा यांनी वरील विधान केले आहे. त्यांनी आपल्या भाषणातून बीएसएफवरच प्रश्न उपस्थित केले. दरम्यान, आता शाहा यांच्यावर केलेल्या या टीकेनंतर आता भाजपा नेमकी काय भूमिका घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा