AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खासदार महुआ मोईत्रा दुसऱ्यांदा लग्नबंधनात, जर्मनीत केलं लग्न

तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा या प्रसिद्ध अशा खासदार आहेत. त्यांनी संसदेत केलेल्या प्रत्येक भाषणाची सगळीकडे चर्चा असते.

खासदार महुआ मोईत्रा दुसऱ्यांदा लग्नबंधनात, जर्मनीत केलं लग्न
mahua moitra and pinaki mishra marriage
| Updated on: Jun 05, 2025 | 3:47 PM
Share

Mahua Moitra Marriage : तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा या प्रसिद्ध अशा खासदार आहेत. त्यांनी संसदेत केलेल्या प्रत्येक भाषणाची सगळीकडे चर्चा असते. विशेष म्हणजे भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर त्या सडकून टीका करताना दिसतात. फाड-फाड इंग्रजी बोलणाऱ्या याच महुआ मोईत्रा यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. त्यांनी ओडिशा राज्यातील एका बड्या नेत्याशी लग्न केलंय. जर्मनीत त्यांनी विवाह केला आहे.

महुआ मोईत्रा यांनी केला जर्मनीत विवाह

मिळालेल्या माहितीनुसार महुआ मोईत्रा दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकल्या आहेत. त्यांनी बिजू जनता दल (बीजेडी) पक्षाचे नेते पिनाकी मिश्रा यांच्याशी लग्न केलं आहे. पिनाकी मिश्रा हे राजकारणात चांगलेच सक्रीय असून त्यांचे ओडिशा राज्यात मोठे नाव आहे. या दोघांनीही जर्मनीत विवाह केला आहे. दोन वेळा खासदार राहिलेल्या मोईत्रा आणि पिनाकी मिश्रा यांचे 30 मे रोजी लग्न झाले आहे.

रितसर घेतला गटस्फोट, आता पुन्हा लग्न

पिनाकी मिश्रा हे ओडिशा राज्यातील पुरी येथून खासदार राहिलेले आहेत. 2024 सालची लोकसभा निवडणूकही त्यांनी लढवली होती. मात्र त्यांना भाजपाचे संबित पात्रा यांनी पराभूत केले होते. महुआ मोईत्रा यांचे हे दुसरे लग्न आहे. आआधी त्यांनी डॅनिश फायनान्सर लार्स ब्रोरसन यांच्याशी लग्न केलं होतं. पुढे या दोघांनी रितसर घटस्फोट घेतला होता. महुआ मोईत्रा यांनी तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर 2024 सालची लोकसभा निवडणूक लढवली होती. त्या पश्चिम बंगालमधील कृष्णानगर मतदारसंघाच्या खासदार आहेत.

2009 साली केला राजकारणात प्रवेश

खासदार होण्याआधी महुआ मोईत्रा या आमदारर होत्या त्यांनी 2016 ते 2019 या काळात करीमपूर या विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्त्व केलेले आहे. महुआ मोईत्रा यांचा जन्म 12 ऑक्टोबर 1974 रोजी झाला. त्या एक अर्थशास्त्री आहेत. त्यांनी अमेरिकेतून शिक्षण घेतलेले आहे. 1998 साली त्यांनी मॅसॅच्युसेट्समधील माउंट होल्योक कॉलेज साउथ हॅडली येथून अर्थशास्त्र आणि गणितात पदवी मिळवलेली आहे. 2009 साली राजकारणात प्रवेश केला.

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.