खासदार नुसरत जहांनी बलात्काऱ्यांना शिक्षेसाठी जालीम उपाय सुचवला

दोषी सिद्ध झाल्यानंतर बलात्काऱ्यांना महिन्याभरात फासावर चढवा, अशी मागणी खासदार नुसरत जहां यांनी केली आहे.

खासदार नुसरत जहांनी बलात्काऱ्यांना शिक्षेसाठी जालीम उपाय सुचवला

मुंबई : हैदराबादमधील डॉक्टर तरुणीची गँगरेप करुन हत्या आणि उन्नावमधील बलात्कार पीडितेला जिवंत जाळल्याची घटना समोर आल्यानंतर देशभरातील वातावरण ढवळून निघालं आहे. अशातच प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहां यांनी तोडगा सुचवला आहे. दोषी सिद्ध झाल्यानंतर बलात्काऱ्यांना महिन्याभरात फासावर चढवा, असा मागणी खासदार नुसरत जहां यांनी (Nursat Jahan on Unnao Rape) केली आहे.

हैदराबाद आणि उन्नावमधील घटनांनंतर सर्वसामान्यांपासून राजकीय क्षेत्रातील आणि क्रीडा क्षेत्रापासून मनोरंजन विश्वातील अनेक जणांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. नुसरत जहां यांनीही देशातील बलात्काराच्या वाढत्या घटनांवर संताप व्यक्त केला आहे.

‘नाही म्हणजे नाही. कायदा कितीही कठोर असला तरी प्रशासन आणि पोलिसांना जबाबदारीने वागायला पाहिजे. जामीन नको. माफी नको. दोषी ठरल्यास एका महिन्यात फासावर लटकवा’ अशा शब्दात नुसरत यांनी राग (Nursat Jahan on Unnao Rape) व्यक्त केला.

शुक्रवार सकाळी जल्लोष आणि रात्री शोककळा

हैदराबादमध्ये डॉक्टर तरुणीवर सामूहिक बलात्कार करुन तिची हत्या करणाऱ्या चार नराधमांचा एन्काऊंटर झाल्यानंतर सर्वसामान्यांमध्ये आनंदाचं वातावरण होतं. शुक्रवारी सकाळीच (6 डिसेंबर) ही बातमी आल्यामुळे देशभरात दिवसभर जल्लोष झाला, परंतु त्याच दिवसाची अखेर उन्नावमधील गँगरेप पीडितेसाठी काळरात्र ठरली.

उन्नाव बलात्कार पीडितेची मृत्यूशी झुंज अपयशी, डॉक्टरांना अखेरची इच्छा सांगत प्राण सोडले

उन्नावमध्ये सामूहिक बलात्कार झालेल्या पीडितेला दोन दिवसांपूर्वी (5 डिसेंबर) आरोपींनी पेट्रोल ओतून जिवंत जाळलं होतं. मात्र दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात काल रात्री (शुक्रवार 6 डिसेंबर) 11 वाजून 40 मिनिटांनी तिने अखेरचा श्वास घेतला. पेटवल्यामुळे गंभीररित्या भाजलेल्या पीडितेचा कार्डिअॅक अरेस्टमुळे मृत्यू झाला.

उन्नाव बलात्कार

डिसेंबर 2018 मध्ये पीडितेचं अपहरण करुन तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे. लग्नाच्या आमिषाने शिवम त्रिवेदी याने आपलं शारीरिक शोषण केल्याचा दावा पीडितेने केला होता. त्यानंतर उन्नाव गावात पंचायत बोलावली गेली. शिवमने माघार घेतली होतीच, मात्र तीन लाख रुपये देण्याचं सांगत त्याने पीडितेला पिच्छा सोडण्याची ताकीद दिली. अखेर ती न ऐकल्याने शिवमने शुभम त्रिवेदीच्या मदतीने तिचं अपहरण केलं आणि तिच्यावर गँगरेप केला, असा आरोप आहे.

Nursat Jahan on Unnao Rape

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *