ममता बॅनर्जी यांना सर्वात मोठा धक्का, महुआ मोइत्रा यांची खासदारकी रद्द; काय आहे प्रकरण?

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मोठा झटका बसला आहे. त्यांच्या खासदार महुआ मोइत्रा यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. संसदेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी चौकशी समितीही नेमली होती. या समितीने अहवाल दिला होता. त्यात त्या दोषी आढळल्या. या प्रकरणावर आज संसदेत चर्चा झाली आणि मोइत्रा यांची खासदारकी रद्द करण्यात आली.

ममता बॅनर्जी यांना सर्वात मोठा धक्का, महुआ मोइत्रा यांची खासदारकी रद्द; काय आहे प्रकरण?
Follow us
| Updated on: Dec 08, 2023 | 3:48 PM

नवी दिल्ली | 8 डिसेंबर 2023 : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का बसला आहे. ममता बॅनर्जी यांच्या टीएमसी पक्षाच्या खासदार महुआ मोइत्रा यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. पैसे घेऊन संसदेत प्रश्न विचारल्याच्या आरोपात तथ्य आढळल्यानंतर मोइत्रा यांची खासदारकी रद्द करणअयात आली आहे. एथिक्स समितीने अहवाल दिल्यानंतर हा रिपोर्ट मंजूर करण्यात आला आहे. या अहवालावर संसदेत चर्चा झाली. त्यानंतर आवाजी मतदानाने महुआ यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. या समितीने महुआ यांच्यावरील आरोप गंभीर असल्याचं म्हटलं होतं. तसेच त्यांच्यावर गंभीर कारवाई करण्याची मागणीही केली होती. त्यानंतर ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.

तृणमूलच्या खासदार महुआ मोइत्रा यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. एथिक्स कमिटीच्या चौकशीत त्या दोषी आढळल्या होत्या. आज लोकसभेत समितीचा अहवाल सादर करण्यात आला. संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी एथिक्स समितीच्या रिपोर्टवर अॅक्शन घेण्यासाठी प्रस्ताव मांडला. महुआ यांच्यावर पैसे घेऊन प्रश्न विचारल्याचा आरोप आहे. भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनीच हा आरोप केला होता. या आरोपानंतर महुआ यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेऊन दुबे यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा ठोकला होता.

स्पीकर आमच्यासोबत

महुआ मोइत्रा यांच्या विरोधात लोकसभेत प्रस्ताव मंजूर झाला. याआधी सभागृहात चर्चा झाली. यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी भूमिका स्पष्ट केली. आम्ही न्याय नव्हे तर चर्चा करत आहोत. हे सभागृह न्यायालयासारखं काम करणार नाही. मी नियमानुसार काम करत आहे. माझा तो अधिकार नाही. हा सभागृहाचा अधिकार आहे. सभागृहाला अधिकार नसता तर मी आतापर्यंत निर्णय दिला असता, असं ओम बिरला म्हणाले. तर, कोई आमच्यासोबत असो वा नसो. आपले स्पीकर सोबत आहेत. ते योग्य निर्णय घेतील आणि आम्ही ऐकू, असं काँग्रेस नेते अधीर रंजन म्हणाले.

रागाने निघाल्या

संसदेत गेल्यानंतर महुआ या थोड्यावेळाने परत संसदेतून बाहेर पडल्या. यावेळी त्या प्रचंड रागात होत्या. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. आज माझी खासदारकी रद्द करण्यात आली आहे. उद्या माझ्या घरी सीबीआय येईल. पण अदानीचं काहीच होणार नाही. मी अदानीचा मुद्दा उचलला होता. अदानींच्या 30 हजार कोटीच्या घोटाळ्यावर मौन का साधलं गेलंय? माझ्या चौकशीत एक छदामही सापडला नाही. कमिटीने कांगारु कोर्टासारखं काम केलं आहे, अशी टीका महुआ यांनी केली.

मिटकरी 'या' मतदारसंघातून विधानसभा लढणार? बॅनरबाजीनं चर्चांना उधाण
मिटकरी 'या' मतदारसंघातून विधानसभा लढणार? बॅनरबाजीनं चर्चांना उधाण.
काकानं केलं पुतण्याचं कौतुक, अजितदादा रोहित पवारांबद्दल काय म्हणाले?
काकानं केलं पुतण्याचं कौतुक, अजितदादा रोहित पवारांबद्दल काय म्हणाले?.
निलेश राणेंना शिंदे गट घेणार की नाही? उदय सामंत यांना सवाल करताच ते...
निलेश राणेंना शिंदे गट घेणार की नाही? उदय सामंत यांना सवाल करताच ते....
एसटी कर्मचाऱ्यांच्या PF, मेडिकल बिल, LIC त घोटाळा? पगारातून पैसे कट पण
एसटी कर्मचाऱ्यांच्या PF, मेडिकल बिल, LIC त घोटाळा? पगारातून पैसे कट पण.
ईईईईई..घाणेरडे कुठले? शौचालयात कप धुतले, जळगाव महापालिकेत चाललंय काय?
ईईईईई..घाणेरडे कुठले? शौचालयात कप धुतले, जळगाव महापालिकेत चाललंय काय?.
'गिरे तो भी टांग उपर', सामना अग्रलेखावरून उदय सामंत यांचा हल्लाबोल
'गिरे तो भी टांग उपर', सामना अग्रलेखावरून उदय सामंत यांचा हल्लाबोल.
शिंदेंचं हरियाणातील विजयानंतर ट्विट, त्यांच्या स्वप्नांचा चुराडा अन्..
शिंदेंचं हरियाणातील विजयानंतर ट्विट, त्यांच्या स्वप्नांचा चुराडा अन्...
'... त्यांच्या तोंडाला फेस येईल', फडणवीसांच्या टीकेवर राऊतांचा पलटवार
'... त्यांच्या तोंडाला फेस येईल', फडणवीसांच्या टीकेवर राऊतांचा पलटवार.
प्रतापगड 365 मशालींच्या तेजोमय प्रकाशानं उजळला, बघा नेत्रदिपक नजारा
प्रतापगड 365 मशालींच्या तेजोमय प्रकाशानं उजळला, बघा नेत्रदिपक नजारा.
दादा म्हणजे बारामती, देव अन् काळजाचा तुकडा, बारामतीत उमेदवारीसाठी राडा
दादा म्हणजे बारामती, देव अन् काळजाचा तुकडा, बारामतीत उमेदवारीसाठी राडा.