AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bhushan Gavai : धक्कादायक, सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न

Bhushan Gavai : आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी दरम्यान धक्कादायक घटना घडली. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला. यावेळी तो वकिल आरडाओरडा करत होता, ' 'सनातनचा अपमान सहन करणार नाही'.

Bhushan Gavai : धक्कादायक, सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न
Bhushan Gavai
| Updated on: Oct 06, 2025 | 1:35 PM
Share

आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी दरम्यान धक्कादायक घटना घडली. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला. सुप्रीम कोर्टात वकिलाकडून सुनावणी दरम्यान बूट फेकण्याचा प्रयत्न झाला. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी वकिलाला वेळीच रोखलं. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, वकिलाने सुनावणी दरम्यान मंचाच्याजवळ जाऊन बूट काढून फेकण्याचा प्रयत्न केला. पण वेळीच सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला अडवलं. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी वकिलाला कोर्टाबाहेर काढलं. यावेळी तो वकिल आरडाओरडा करत होता, सनातनचा अपमान सहन करणार नाही‘. CJI गवई हे सर्व सुरु असताना शांत होते. ते म्हणाले की, अशा प्रकारांनी आम्ही विचलित होत नाही. तुम्ही तुमचा युक्तीवाद सुरु ठेवा

असं म्हटलं जातय की, खजुराहो येथील भगवान विष्णुंच्या एका नुकसानग्रस्त मुर्तीशी संबंधित एक जुन्या प्रकरणात सरन्यायाधीशांनी एक टिप्पणी केली. या टिप्पणींचा अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध केलाय. सुरक्षारक्षक या घटनेचा इन्कार करतायत. ते म्हणतायत की, कोर्टात एका माणसाने आरडाओरडा केला. त्याला आम्ही बाहेर काढलं

भगवान विष्णूंवर BR गवई काय बोललेले?

खजुराहो येथे भगवान विष्णुंच्या नुकसानग्रस्त मुर्तीची पूनर्स्थापना करण्याबद्दलच्या याचिकेवर मुख्य न्यायाधीश गवई बोललेले. जा, देवांनाच काहीतरी करायला सांग. तू म्हणतोस तू भगवान विष्णूंचा कट्टर भक्त आहेस, तर जा आणि आता प्रार्थना करं. हे एक पुरातत्व स्थळ आहे. ASI आदींची अनुमती आवश्यक आहे. क्षमा करात्यांच्या या वक्तव्यानंतर विरोधाची मोठी लाट उठलेली. अनेकांनी सरन्यायाधीशांच्या राजीनाम्याची मागणी केलेली.

मी सर्व धर्मांचा सन्मान करतो

वाद वाढल्यानंतर मुख्य न्यायाधीश म्हणालेले की, त्यांच्या टिप्पणीला सोशल मीडियावर चुकीच्या पद्धतीने सादर करण्यात आलं. कोणीतरी मला सांगितलं की, माझ्या टिप्पणीला सोशल मीडियावर एका खास पद्धतीने सादर केलं जातय. मी सर्व धर्मांचा सन्मान करतो

मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.