माणिक सीताराम गोडघाटे ऊर्फ कवी ग्रेस यांची आज पुण्यतिथी; …म्हणून गोडघाटे यांनी ‘ग्रेस’ नावाने कविता लेखन केले

माणिक सीताराम गोडघाटे (Manik Sitaram Godghate) ऊर्फ कवी ग्रेस (Poet Grace) हे मर्ढेकरोत्तर नवकवींच्या दुसऱ्या पिढीतील प्रमुख कवी होते. "वाऱ्याने हलते रान" या त्यांच्या ललित लेखसंग्रहासाठी त्यांना 2012 सालचा साहित्य अकादमी पुरस्कार देण्यात आला.

माणिक सीताराम गोडघाटे ऊर्फ कवी ग्रेस यांची आज पुण्यतिथी; ...म्हणून गोडघाटे यांनी 'ग्रेस' नावाने कविता लेखन केले
कवी ग्रेस Image Credit source: Marathi Wikipedia
Follow us
| Updated on: Mar 26, 2022 | 5:40 AM

माणिक सीताराम गोडघाटे (Manik Sitaram Godghate) ऊर्फ कवी ग्रेस (Poet Grace) हे मर्ढेकरोत्तर नवकवींच्या दुसऱ्या पिढीतील प्रमुख कवी होते. “वाऱ्याने हलते रान” या त्यांच्या ललित लेखसंग्रहासाठी त्यांना 2012 सालचा साहित्य अकादमी पुरस्कार देण्यात आला. त्यांचे पाच काव्यसंग्रह आणि सात ललित लेखसंग्रह प्रकाशित झाले आहेत. 10 मे 1937 रोजी नागपूरमध्ये (Nagpur) ग्रेस यांचा जन्म झाला. कर्नल बाग या नागपुरातील वस्तीत त्यांचे कुटुंब राहत होते. ग्रेस यांचे प्रारंभीचे जीवन कष्टमय होते. आईच्या अकाली मृत्यूमुळे विस्कळित झालेले घर त्यांना सांभाळावे लागले. नोकरी आणि शिक्षण यांच्याशी त्यांना झगडावे लागले. डॉ. लीला माटे यांच्याशी विवाह झाल्यानंतरही हा संघर्ष सुरूच राहिला. एम.ए. ची परीक्षा जवळ आलेली असताना ते ज्या बसने प्रवास करत होते, त्या बसचा अपघात झाला. मात्र तरी देखील ग्रेस यांनी जीद्द सोडली नाही, ते 1966 मध्ये मराठी विषयातील ना.के. बेहरे सुवर्णपदक जिंकून नागपूर विद्यापीठातून एम.ए. झाले. प्लास्टर लावलेल्या हातांनी त्यांनी प्रमाणपत्र आणि सुवर्णपदक घेतले.

1958 पासून काव्यलेखनास प्रारंभ

इ.स. 1958 पासून माणिक गोडघाटे यांनी काव्यलेखनास प्रारंभ केला. इन्ग्रिड बर्गमन या पाश्चात्य अभिनेत्रीच्या अभिनयाने प्रभावित होऊन गोडघाटे यांनी ”ग्रेस” हे साहित्यिक नाव धारण केले. ”दी इन ऑफ द सिक्स्थ हॅपिनेस” या बोलपटात इन्ग्रिडसंबंधी शी इज इन ग्रेस असे वाक्य येते. हा बोलपट पाहत असताना तिने आपल्याला शीळ घातलेली आहे, असे गोडघाटे यांना वाटले. त्या लहरीने आपल्या आत्म्यावरची धूळ उडाली आणि प्रतिभा-रुपाचा पहिला साक्षात्कार आपल्याला इन्ग्रिडमध्ये झाला; तिचे ऋण आठवीत राहण्यासाठी आपण ग्रेस हे नाव धारण केले, असे गोडघाटे यांनी एखा मुलाखतीमध्ये सांगितले होते. त्यानंतर त्यांनी आपले सर्व कविता सग्रह आणि ललित लेख ग्रेस याच नावाने लिहिले. ग्रेस यांनी 26 मार्च 2012 रोजी जगाचा निरोप घेतला.

ग्रेस यांच्या काही गाजलेल्या कविता

असे रंग आणि ढगांच्या किनारी, अज्ञेयाहून गूढ दिसती झाडातली वर्तुळे, आठवण, ओळख, ओळखीच्या वाऱ्या तुझे घर कुठे सांग?, ऊर्मिलेचा सर्पखेळ, कंठात दिशांचे हार, कर्णभूल, कर्णधून, क्षितिज जसे दिसते, ग्रेसची वृत्ती, घर थकलेले संन्यासी, घनकंप मयूरा, जे सोसत नाही असले, डहाळी, तुळशीतले बिल्वदल, तुला पाहिले मी नदीच्या किनारी, तांबे-सोन्याची नांदी, तुझी बहार मंदशी तृषार्त जाग ये जरी, तुझ्यात नभवाहिनी कुठून रक्त गंधावले, देखना कबीर, देवी, दुःख घराला आले, दु:ख, निनाद आणि निरोप या ग्रेस यांच्या काही प्रसिद्ध कविता आहेत. ग्रेस यांच्या कविता गंभीर असत, या कवितेतून मानवी मनाचे दु:ख प्रकट होत असे.

इतर बातम्या

ED च्या संपत्ती जप्तीनंतर पहिल्यांदाच बोलले, प्रताप सरनाईकांच्या पत्रकार परिषदेतील 10 मोठे मुद्दे

हो खरंय, ईडीनं हिरानंदाणी येथील घर, मिरा रोडचा भूखंड जप्त केलाय, प्रताप सरनाईक यांची पहिली प्रतिक्रिया

आज Pratap Sarnaik ची प्रॉपर्टी अटॅच केली, नंतर त्यालाही अटॅच-अटक होणार, Kirit सोमय्यांचा इशारा!

Non Stop LIVE Update
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.