जम्मू काश्मीरमधील टॉप 10 दहशतवादी कोण? पोलिसांककडून यादी जाहीर, वाचा एका क्लिकवर

| Updated on: Aug 03, 2021 | 7:23 AM

काश्मीरचे पोलीस महासंचालक विजय कुमार यांनी आता जम्मू काश्मीरमधील टॉप 10 दहशतवाद्यांची यादीच जाहीर केलीय.

जम्मू काश्मीरमधील टॉप 10 दहशतवादी कोण? पोलिसांककडून यादी जाहीर, वाचा एका क्लिकवर
Follow us on

श्रीनगर : जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलाने ऑपरेशन क्लीन सुरू केलंय. दररोज कुख्यात दहशतवाद्यांचा खात्मा केला जातोय. काश्मीरचे पोलीस महासंचालक विजय कुमार यांनी आता जम्मू काश्मीरमधील टॉप 10 दहशतवाद्यांची यादीच जाहीर केलीय. यात काही जुन्या दहशतवाद्यांच्या नावाचा समावेश आहे, तर काही नव्या कट्टरतावाद्यांचा समावेश आहे. आता पोलिसांच्या ऑपरेशन क्लीन अंतर्गत या टॉप 10 दहशतवाद्यांवर लक्ष्य असणार आहे. हे सर्व दहशतवादी वेगवेगळ्या संघटनांचे आहेत.

टॉप 10 दहशतवादी कोण?

1. सलीम पैरी

2. युसुफ कांट्रो

3. अब्बास शेख

4. रियाज

5. फारुख नली

6. जुबैर वनी

7. अशरफ मौलवी

8. साकिब मंजूर

9. उमर मुश्ताक खांडे

10. वकील शाह.

या यादीतील पहिली 7 नावं जुन्या यादीतीलच आहेत. यात अनुक्रमांक 8-10 मधील 3 नव्या दहशतवाद्यांचा समावेश करण्यात आलाय.

कोणत्या संघटनेचे दहशतवादी?

सलीम पैरी हाजिन बांदीपोरात राहणारा आहे. तो लश्कर-ए-तैयबाशी संबंधित दहशतवादी आहे. कुंजर तंगमर्ग बारामूलातील असून तो यूसुफ कांट्रो लश्कर-ए-तैयबाचा सदस्य आहे. रामपोरा कैमोहमधील रहिवासी अब्बास शेख TRF शी संबंधित आहे. सेथरगुंड काकापोरा पुलवामात राहणारा रियाज लश्कर-ए-तैयबाचा दहशतवादी आहे. चेक यमराच यारीपोरा कुलगामच्या फारूक नालीचाही दहशतवाद्यांच्या टॉप 10 यादीत समावेश आहे. याशिवाय अनंतनागमधील देहरूनाचा जुबैर वानी आणि कोकेरनागचा अशरफ मौलवीचाही या यादीत समावेश आहे.

श्रीनगरमधील साकिब मंजूर TRF या दहशतवादी संघटनेचा सदस्य आहे. उमर मुश्ताक खांडे या यादीतील नवं नाव आहे. वकील शार पुलवामातील त्रालचा रहिवासी आहे. तो जैश ए मोहम्मदचा दहशतवादी आहे.

हेही वाचा :

Jammu-Kashmir : दगडफेक करणाऱ्यांना झटका, आता ना सरकारी नोकरी, ना परदेश प्रवास

पावसाने देशभरात हाहाकार, महाराष्ट्रासह उत्तराखंड, हिमाचल आणि जम्मू-काश्मीरमधील थरारक दृश्ये

जम्मू काश्मीरमध्ये आभाळ फाटलं, 4 मृत्यू, 40 बेपत्ता; हेलिकॉप्टरद्वारे रेस्क्यू ऑपरेशन सुरू

व्हिडीओ पाहा :

Top 10 Terrorist of Jammu Kashmir Police start Operation clean in valley