AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ट्रम्प घेणार चीनमधल्या अपमानाचा बदला, दौऱ्यावरून परतताच सर्वात मोठी घोषणा, जगात लवकरच नव्या युद्धाला सुरुवात?

काही दिवसांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प हे चीनच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यामध्ये त्यांचा चांगलाच अपमान झाला. चीनने त्यांना उघड उघड धमकी दिली. दरम्यान त्यानंतर आता अमेरिकेत परतल्यानंतर त्यांनी मोठी घोषणा केली आहे.

ट्रम्प घेणार चीनमधल्या अपमानाचा बदला, दौऱ्यावरून परतताच सर्वात मोठी घोषणा, जगात लवकरच नव्या युद्धाला सुरुवात?
donald trumpImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 18, 2026 | 5:34 PM
Share

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हे दोन दिवसांच्या चीन दौऱ्यावर होते. या काळात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. चीनने डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका दिला. चीनमध्ये डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे राष्ट्रापती शी जिनपिंग यांच्यामध्ये महत्त्वाची बैठक देखील झाली. मात्र या बैठकीमध्ये चीनने डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा अपमान केला. शी जिनपिंग यांनी ट्रम्प यांना उघड उघड धमकी दिली. तैवानचा मुद्दा हा जर योग्य पद्धतीने हाताळला गेला नाही तर अमेरिका आणि चीनमधील संबंध खराब होऊ शकतात, गोष्ट युद्धपर्यंत पोहोचून शकते असा स्पष्ट संदेश शी जिनपिंग यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना दिला होता. जर अमेरिकेनं तैवान मुद्द्यात हस्तक्षेप केला नाही तर मात्र अमेरिका आणि चीनचे संबंध मैत्रीपूर्ण राहातील असं देखील त्यांनी म्हटलं होतं. एवढंच नाही तर ट्रम्प यांचं जेव्हा बिजिंग विमानतळावर आगमन झालं होतं, तेव्हा त्यांचं स्वागत करण्यासाठी देखील शी जिनपिंग गेले नव्हते, चीनच्या उपराष्ट्रपतींना पाठवण्यात आलं होतं.

दरम्यान त्यानंतर आता मोठी बातमी समोर आली आहे. ज्या तैवानच्या मुद्द्यावरून चीनने अमेरिकेला धमकावलं होतं, त्याच मुद्द्यावर बोलताना आता डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठं विधान केलं आहे. अमेरिकेची तैवानसोबत मोठी शस्त्र डील होणार आहे. मात्र शी जिनपिंग आणि ट्रम्प यांच्या भेटीनंतर ही डील थंड बस्त्यात पडणार असा अंदाज व्यक्त केला जात होता. परंतु यावर बोलताना आता ट्रम्प यांनी मोठं विधान केलं आहे. या संदर्भात मला सध्या तैवानमध्ये ज्यांची सत्ता आहे, त्यांच्यासोबत बोलावं लागेल असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. ट्रम्प यांच्या या विधानानंतर तैवानला मोठा दिलासा मिळाला आहे, त्यानंतर लगेचच तैवानकडून प्रतिक्रिया देखील देण्यात आली आहे. जर ट्रम्प यांना तैवानचे प्रमुख लाई चिंग यांच्यासोबत बोलायचं असेल तर आम्ही त्यांचं स्वागत करू, असं तैवानने म्हटलं आहे.

दरम्यान जर डोनाल्ड ट्रम्प यांनी शस्त्रांच्या डील संदर्भात लाई चिंग यांच्यासोबत बोलणी केली तर हा चीनसाठी मोठा धक्का असणार आहे. चीन दौऱ्यावरून परतताच ट्रम्प यांनी मोठं विधान केलं आहे. मी तैवानच्या प्रमुखांशी बोलणार आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. तसेच डोनाल्ड ट्रम्प तैवानचा दौरा करण्याची देखील शक्यता आहे. यावर आता चीन काय भूमिका घेणार हे पहाणं महत्त्वांच ठरणार आहे, कारण चीनने आधीच ट्रम्प यांना युद्धाची धमकी दिली आहे.

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...