AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या बेधडक कारवाया, थेट आंतरराष्ट्रीय स्थरावर… नेमकं काय घडलं?

Tukaram Mundhe: अधिकारी तुकाराम मुंढे यांनी FDA ची सूत्रे हातात घेतल्यावर संपूर्ण राज्यभर कारवाया सुरू केल्या आहेत . अनेक भेसळ खोरांवर त्यांनी कडक कारवाई केली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरही आता त्यांच्या कारवायांची दखल घेण्यात आली आहे.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या बेधडक कारवाया, थेट आंतरराष्ट्रीय स्थरावर... नेमकं काय घडलं?
तुकाराम मुंढेImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Oct 05, 2026 | 10:12 AM
Share

तुकाराम मुंढे यांची प्रशासकीय कारकीर्द आणि कार्यपद्धती याबाबत अमेरिकेतील प्रतिष्ठित वृत्तपत्र ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने विशेष दखल घेतली आहे. त्यांच्या कामाचा आणि प्रभावाचा उल्लेख या आंतरराष्ट्रीय स्तरावरील वृत्तपत्रात झाल्याने त्यांची चर्चा पुन्हा एकदा जागतिक स्तरावर झाली आहे. ही घटना महाराष्ट्रातील प्रशासकीय क्षेत्रासाठी अभिमानास्पद ठरली आहे.

तुकाराम मुंढे हे महाराष्ट्र कॅडरचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी विविध जिल्ह्यांमध्ये आणि विभागांमध्ये काम करताना कायद्याचे कठोर पालन, भ्रष्टाचाराविरोधी भूमिका आणि जनतेच्या हिताला प्राधान्य देणारी कार्यपद्धती अंगीकारली आहे. त्यांच्या या कार्यशैलीमुळे ते नेहमीच चर्चेत राहिले आहेत. विशेषतः त्यांच्या निर्णायक आणि निःपक्षपाती कारभाराची तुलना अनेकदा आदर्श प्रशासनाशी केली जाते.

अधिकारी तुकाराम मुंढे यांनी FDA ची सूत्रे हातात घेतल्यावर संपूर्ण राज्यभर कारवाया सुरू केल्या आहेत . अनेक भेसळ खोरांवर त्यांनी कडक कारवाई केली आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात भेसळखोरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने त्यांच्या कामाची दखल घेतल्याने हे स्पष्ट होते की चांगले प्रशासन केवळ स्थानिक स्तरापुरते मर्यादित राहत नाही. ते जागतिक पातळीवरही दखलपात्र ठरते. मुंढे यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक आव्हानांना सामोरे जातानाही सुशासनाचे तत्त्व कायम ठेवले. त्यांच्या या प्रयत्नांमुळे सामान्य नागरिकांना न्याय मिळाला आणि प्रशासनातील पारदर्शकतेला चालना मिळाली.

२१ वर्षांत २५ वेळा झाल्या बदल्या

अधिकारी तुकाराम मुंढे यांच्याबद्दल बोलायचे झाले तर, ते केवळ त्यांच्या छापेमारीमुळे चर्चेत नाहीत तर त्यांचा करिअरचा ग्राफ देखील लक्ष वेधून घेत आहे. २१ वर्षांच्या सेवेत त्यांची २५ वेळा बदली झाली आहे. ही संख्या त्यांच्या ओळखीचा तितकाच महत्त्वाचा भाग बनली आहे, जितके त्यांचे काम.

या आंतरराष्ट्रीय उल्लेखामुळे तरुण अधिकाऱ्यांना प्रेरणा मिळाली आहे. मुंढे यांचे उदाहरण हे दाखवते की योग्य ध्येय, चिकाटी आणि जनतेप्रती निष्ठा असल्यास प्रशासकीय पदावर असतानाही मोठा प्रभाव पाडता येतो. त्यांच्या कार्यपद्धतीत शिस्त, पारदर्शकता आणि जबाबदारी या तीन गोष्टी प्रमुख आहेत. यामुळेच त्यांचे नाव केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देश-विदेशातही चर्चेत आले आहे. ‘न्यूयॉर्क टाइम्स’सारख्या प्रतिष्ठित वृत्तपत्राने घेतलेली ही दखल महाराष्ट्राच्या प्रशासकीय यशस्वीतेचे प्रतीक आहे.

Follow Us
रत्नागिरीत गोवा बनावटीच्या दारूचा तब्बल 1.75 कोटींचा साठा जप्त....
Ratnagiri Liquor Seizure : रत्नागिरीत गोवा बनावटीच्या दारूचा तब्बल 1.75 कोटींचा साठा जप्त; हातखंबा येथे उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
बिहारमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्याच्या हालचालींना वेग; संजय शिरसाट....
Sanjay Shirsat : बिहारमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्याच्या हालचालींना वेग; संजय शिरसाट यांनी घेतली मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांची भेट
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादीची खेळी; भाजप नाराजी....
Satara Bank Election : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादीची खेळी; भाजप नाराज असल्याची चर्चा
जमीन व्यवहार करताय? सावधान; 2 लाखांपेक्षा जास्त रोख व्यवहाराची माहिती
Chandrashekhar Bawankule : जमीन व्यवहार करताय? सावधान; 2 लाखांपेक्षा जास्त रोख व्यवहाराची माहिती आयकर विभागापर्यंत पोहोचणार
दुष्काळातही मुंबईकरांची पिण्याच्या पाण्याची तहान भागणार, फडणवीस सरकार
Mumbai Water : दुष्काळातही मुंबईकरांची पिण्याच्या पाण्याची तहान भागणार, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
पांडुरंगाचा आशीर्वाद आहे, चिंता कसली? हेलिकॉप्टरमधील बिघाडावर शिंदेंची
Eknath Shinde Helicopter : पांडुरंगाचा आशीर्वाद आहे, चिंता कसली? हेलिकॉप्टरमधील बिघाडावर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून भाजपत वादंग....
Nashik : नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून भाजपत वादंग; नेमकं काय घडलं?
सरकारने करसवलती दिल्या, आता उद्योजकांनी काय केलं? पंतप्रधान मोदींनी...
PM Modi : सरकारने करसवलती दिल्या, आता उद्योजकांनी काय केलं? पंतप्रधान मोदींनी FICCIच्या व्यासपीठावरून सुनावलं
लग्नसराईत दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सोन्या-चांदीचे दर
Gold Silver Price Today : लग्नसराईत दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सोन्या-चांदीचे दर अचानक घसरले...
पाच एकरांतील मोसंबीची बाग जेसीबीने उपटली, दुष्काळापुढे शेतकरी हतबल....
Nagpur : पाच एकरांतील मोसंबीची बाग जेसीबीने उपटली, दुष्काळापुढे शेतकरी हतबल; नागपुरातील विदारक वास्तव आलं समोर