भयानक दुतोंडीपणा, दिल्ली स्फोटावर पाकिस्तानच्या मित्र राष्ट्राची प्रतिक्रिया ऐकून तुमची तळपायाची आग मस्तकात जाईल
तुर्कीचा दुतोंडीपणा पुन्हा एकदा जगासमोर उघड झाला आहे, भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या स्फोटावर तुर्कीची पहिली प्रतिक्रिया आता समोर आली आहे. ही प्रतिक्रिया ऐकून तुमचाही संताप झाल्याशिवाय राहणार नाही.

तुर्कीचा दुतोंडीपणा पुन्हा एकदा जगासमोर उघड झाला आहे, भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या स्फोटावर तुर्कीची पहिली प्रतिक्रिया आता समोर आली आहे. पाकिस्तानमध्ये झालेल्या स्फोटाचा तुर्कीकडून निषेध करण्यात आला आहे, तसेच हा एक दहशतवादी हल्ला होता असं तुर्कीने म्हटलं आहे. मात्र दुसरीकडे भारतामध्ये झालेल्या स्फोटाबाबत बोलताना हा फक्त एक स्फोट होता असं तुर्कीनं म्हटलं आहे. तुर्कीच्या या वक्तव्यामुळे आता अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. विशेष म्हणजे दिल्लीमध्ये आधी स्फोट झाला, आणि त्यानंतर अनेक तासांनी पाकिस्तानमध्ये स्फोटाची घटना घडली आहे. मात्र तुर्कीने पाकिस्तानमध्ये स्फोट झाल्या-झाल्या लगेचच यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्तानमध्ये झालेला स्फोट हा दहशतवादी हल्ला असून, आम्ही त्याचा निषेध करतो असं म्हटलं आहे. तर त्यानंतर भारतामध्ये झालेल्या स्फोटावर प्रतिक्रिया देण्यात आली आहे.
दिल्लीमध्ये सोमवारी दहा नोव्हेंबरला मोठा स्फोट झाला, यावर प्रतिक्रिया देताना तुर्कीच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं भारतामध्ये झालेल्या स्फोटावर प्रतिक्रिया देताना भारतात हल्ला असं टायटल देत म्हटलं की, आम्ही या हल्ल्यामध्ये जे मृत्युमुखी पडले त्यांच्या कुटुंबाप्रति संवेदना व्यक्त करतो. तसेच या घटनेत जे जखमी झाले आहेत, ते लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना करतो. तुर्की सर्व प्रकारच्या दहशतवादाविरोधात आहे, असं तुर्कस्तानने म्हटलं आहे.
पाकिस्तानवर प्रतिक्रिया
दरम्यान भारतात स्फोट झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी पाकिस्तानच्या इस्लामाबाद येथे देखील स्फोट झाला आहे, त्यावर देखील तुर्कीच्या वतीनं प्रतिक्रिया देण्यात आली आहे. यावर प्रतिक्रिया देताना तुर्कीने पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ला असं टायटल दिलं आहे. ११ नोव्हेंबर रोजी पाकिस्तानमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. आम्ही या दहशतवादी हल्ल्यात ज्यांचा मृत्यू झाला आहे, त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो, तसेच या हल्ल्यात जखमी झालेले लोक लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना करतो असं तुर्कीच्या परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे, तसेच दहशतवाद विरोधी लढाईत तुर्की कायम पाकिस्तानसोबत असल्याचं देखील तुर्कस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. दुसरीकडे भारतावर झालेल्या हल्ल्यासंदर्भात पाकिस्तानकडून हास्यास्पद प्रतिक्रिया देण्यात आली आहे, भारतामध्ये जो स्फोट झाला तो गॅस सिलिंडरचा स्फोट होता, भारत कोणत्या गोष्टीमध्ये राजकीय फायदा शोधत आहे, अशी प्रतिक्रिया पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी दिली आहे.
