AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

TV9 Satta Sammelan: गरब्यात मुस्लिमांना एंट्री का नाही? सार्वजनिक ठिकाणी नमाज पठणास मनाई का? रामदेव बाबांचं उत्तर काय?

TV9 Satta Sammelan 2026: TV9 भारतवर्ष आयोजित सत्ता संमेलनात बाबा रामदेव हे सहभागी झाले. त्यांनी अनेक विषयांवर मनमोकळी उत्तरं दिली. तर त्याचवेळी त्यांनी गरब्यात मुस्लिमांना एंट्री का नाही? सार्वजनिक ठिकाणी नमाज पठणास मनाई का? याप्रश्नांना सुद्धा उत्तर दिले.

TV9 Satta Sammelan: गरब्यात मुस्लिमांना एंट्री का नाही? सार्वजनिक ठिकाणी नमाज पठणास मनाई का? रामदेव बाबांचं उत्तर काय?
रामदेव बाबाImage Credit source: टीव्ही ९ नेटवर्क
| Updated on: Mar 24, 2026 | 11:18 AM
Share

TV9 Satta Sammelan 2026: TV9 भारतवर्ष आयोजित सत्ता संमेलनात रामदेव बाबा यांनी सहभाग घेतला आणि विविध मुद्दावर मनमोकळी उत्तरं दिली. याचेवळी त्यांना गरब्यात मुस्लिमांना एंट्री का नाही? सार्वजनिक ठिकाणी नमाज पठणास मनाई का? असे प्रश्न विचारण्यात आले. अशी चर्चा फूट पाडणारी असल्याचे म्हटले. त्याचवेळी त्यांनी मक्का आणि मदिना येथे प्रवेश करण्यास बंदी का आहे असा सवाल करत त्यांनी याचे उत्तर देता येईल का असे म्हटले. व्‍हाट इंड‍िया थ‍िंक्‍स टुडे WITT या कार्यक्रमात बाबा रामेदव यांनी सार्वजनिक रित्या द्वेष पसरवू नये असे आवाहन केले.

आपले मनच मंदिर

आपल्याला मक्का आणि मदिना येथे जाऊन काय करायचे आहे. “तेरे पूजन को भगवान बना मन मंदिर आलीशान”, असे सांगत, आपल्यातच देव आहे असे ते म्हणाले. आपल्याला मक्का-मदिना, व्हॅटकिन सिटीला जाण्याची गरज नाही. सध्याची अविचारी उदारता अत्यंत धोकादायक आहे. मशिदीत कोणी ऊँ नमःशिवाय, गायत्री मंत्र अथवा महामृत्यूंजय मंत्राचा जप ऐकला आहे का? तुम्ही यासाठी मंदिरातच प्रार्थना करायला लावणार आहात, त्यांना आपापल्या मेळाव्यात आनंद घेऊ द्या. प्रत्येक व्यक्ती त्याच्या कुटुंबासोबत आनंदात आहे. कोणी कुणाच्या घरात घुसेल तर ते ठीक आहे का? मंदिर-मशिदी खूप सजवा. पण सार्वजनिक रित्या द्वेष पसरवू नये असे आवाहन त्यांनी केले.

स्वामी रामदेव म्हणाले की जे लोक द्वेष पसरवतात. तेच लोक बंधुभावाचा नारा देतात. आणि इतरांना असहाय्य आणि हतबल समजतात. हीच मोठी गडबड आहे. जे लोक जाणूनबुजून द्वेष पसरवतात, ते आपले इप्सित साध्य करण्यासाठी हिंसाचाराला चिथावणी देतात आणि मग औदार्याबद्दल बोलतात, या दुप्पटीपणावर त्यांनी टिका केली.

UGC मुद्दावर काय दिलं उत्तर?

UGC मुद्दावर रामदेव बाबा यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी, UGC नियमावलीसंदर्भात सुरु असलेल्या वादावर त्यांनी उत्तर दिले. जो कोणी युजीसीच्या बाजूने आणि विरोधात बोलेल, लोक त्याचे ऐकतील. मला त्याची चिंता नाही असे रामदेव बाबा म्हणाले. जाती, समुदायाच्या नावावर कोणताही कायदा होऊ नये असे ते म्हणाले. कोणीच कुणाला त्रास देऊ नये, माझे इतकेच म्हणणे आहे, असे रामदेव बाबा म्हणाले.

ब्राह्मणांविषयी काय म्हणाले बाबा रामदेव?

ब्राह्मणांविषयी सुरू असलेल्या वादावर त्यांनी मन मोकळं केलं. ब्राह्मण ही काही जाती नाही. ज्यांचा मेंदू तल्लख असतो, त्यांना ब्राह्मण म्हणतात. त्यांचे मोठे योगदान आहे.प्रत्येक जातीचे आणि समुदायाचे वेगवेगळे काम आहे. मी बुद्धीने ब्राह्मण आहे. शक्तीने क्षत्रिय आहे. मी महादलित आहे कारण मी सर्वांची सेवा करतो. प्रत्येकाने एकमेकांचा सन्मान, आदर करावा. कोणी पंडित म्हणून जन्माला येत नाही. तर्काने समजून घेतल्यास कोणताही भेद दिसून येत नाही, असे रामदेव बाबा म्हणाले.

Follow Us
सर्व गणेश भक्तांकडून समुद्राचं पाणी उडवत लालबागच्या राजाला सलामी
Lalbugcha Raja Visarjan : सर्व गणेश भक्तांकडून समुद्राचं पाणी उडवत लालबागच्या राजाला सलामी
मुंबई चौपाटीवर गणेश विसर्जनानंतर 'Sea Shore Shine' स्वच्छता मोहिम,
मुंबई चौपाटीवर गणेश विसर्जनानंतर 'Sea Shore Shine' स्वच्छता मोहिम, अमृता फडणवीसांचा निर्धार
कोळी बांधवांचा मान कायम! त्यांच्याच मदतीने होणार लालबागच्या राजाचे...
Lalbaugcha Raja Visarjan video : कोळी बांधवांचा मान कायम! त्यांच्याच मदतीने होणार लालबागच्या राजाचे विसर्जन
राजाची शेवटची आरती संपन्न थोड्याच वेळात राजाचा तराफा खोल समुद्रात...
Lalbaugcha Raja Visarjan LIVE: राजाची शेवटची आरती संपन्न थोड्याच वेळात राजाचा तराफा खोल समुद्रात जाणार
थोड्याच वेळात लालबागच्या राजचं विसर्जन होणार, भाविकांचे डोळे पाणावले
Lalbaugcha Raja Visarjan | थोड्याच वेळात लालबागच्या राजचं विसर्जन होणार, भाविकांचे डोळे पाणावले
लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी अनंत अंबानी गिरगाव चौपाटीवर उस्थिती
Anant Ambani : लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी अनंत अंबानी गिरगाव चौपाटीवर उस्थिती
ढोल-ताशांच्या गजरात चिंचपोकळीच्या चिंतामणीला निरोप; गिरगाव चौपाटीवर...
ढोल-ताशांच्या गजरात चिंचपोकळीच्या चिंतामणीला निरोप; गिरगाव चौपाटीवर भाविकांची गर्दी
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोषात बाप्पाला निरोप
Mumbai Ganpati Visarjan | गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोषात बाप्पाला निरोप
20 तासांपासून लालबागच्या राजाची मिरवणूक सुरू; आणखी विलंब होण्याची...
20 तासांपासून लालबागच्या राजाची मिरवणूक सुरू... आणखी विलंब होण्याची शक्यता, नेमकं कारण समोर
गणेशोत्सव आणि विसर्जनाबाबत अमृता फडणीसांचं मोठं विधान
आजच्या मोहिमेत जवळपास 3 हजार... गणेशोत्सव आणि विसर्जनाबाबत अमृता फडणीसांचं मोठं विधान