AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Love Marriage नंतर हॉटेलमध्ये पोहोचल्या, 10 वी आणि 12 वीत शिकणाऱ्या मुलींनी ओलांडल्या सर्व मर्यादा, कोर्टाने सुनावला निकाल

Two Girls Marriage In Patna : आता मुलं कोणाचं काहीच ऐकत नाहीत, असं आपण कायम ऐकतो, आता अशीच एक घटना समोर आली आहे, जिथे 10 वी आणि 12 वीच्या मुलींनी सर्व मर्यादा ओलांडल्या आहे... अशात मुलींबाबत कोर्टाने मोठा निर्णय सुनावला आहे.

Love Marriage नंतर हॉटेलमध्ये पोहोचल्या, 10 वी आणि 12 वीत शिकणाऱ्या मुलींनी ओलांडल्या सर्व मर्यादा, कोर्टाने सुनावला निकाल
फाईल फोटो
| Updated on: Aug 13, 2026 | 1:48 PM
Share

Two Girls Marriage In Patna : प्रेमात व्यक्ती काय करेल काहीही सांगता येत नाही. अशीच एक घटना समोर आली आहे. जिथे दोन मुलीचं एकमेकींवर प्रचंड प्रेम होतं आणि दोघांनी पळून लग्न केलं… ही घटना बिहारची राजधानी पाटणा येथे घडली आहे. त्या दोघांमधील प्रेम इतकं होतं की, त्यांनी केवळ सामाजिक आणि कौटुंबिक बंधनं झुगारून दिली नाहीत, तर धर्माची बंधनंही तोडली आहेत. समोर येत असलेल्या माहितीनुसार, वेगवेगळ्या धर्मातील दोन मुली गेल्या तीन वर्षांपासून एकमेकांवर प्रेम करत आहेत. अखेर त्यांनी घरातून पळून एका मंदीरात लग्न केलं. पोलिसांच्या तपासात असं समोर आलं आहे की, दोन्ही मुली शेजारी राहतात आणि एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी आहेत, यामधील एक महिला 10 वी इयत्तेत शिकत आहे, तर दुसरी मुलगी 12 वी इयत्तेत शिकत आहे.

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, 10 वीत शिकणाऱ्या मुलीचे वडील सीआयडीमध्ये कार्यरत आहेत. समोर येत असलेल्या माहितीनुसार, मुलींनी कायमच त्यांच्या नात्याचं लग्नात रुपांतर करण्याचा निर्णय घेतलेला. अशात मुली 7 ऑगस्ट रोजी कोणालाच न सांगता घरातून पळाल्या. दोघींनी एका स्थानिक मंदिरात लग्न केलं आणि दोघी हॉटेलमध्ये राहिल्या. मुली घरातून निघाल्या तेव्हा त्यांच्याकडे फक्त 3 हजार 500 रुपये होते.

दोन्ही मुली अचानक बेपत्ता झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांमध्ये घबराट पसरली. त्यानंतर 7 ऑगस्ट रोजी कुटुंबीयांनी पाटण्यातील कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन, कोतवाली पोलीस ठाण्यातील महिला पोलीस अधिकारी पूनम कुमारी यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष पथक स्थापन करण्यात आलं. पाळत ठेवून पोलिसांनी खगरिया स्थानकाजवळ दोन्ही मुलींना सुखरूप शोधून काढलं आणि त्यांना पाटण्याला परत आणलं.

पोलीसांनी ताब्यात घेतल्यानंतर देखील मुली त्यांच्या निर्णयावर ठाम होत्या. त्या दोघांनीही पोलीस आणि आपल्या कुटुंबीयांसमोर स्पष्टपणे सांगितलं की, ते एकमेकांवर मनापासून प्रेम करतात आणि यापुढे कधीही वेगळ्या होणार नाहीत. दोघींपैकी कोणालाही आपापल्या कुटुंबीयांसोबत घरी जायचं नव्हतं.

कोतवाली पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासादरम्यान एक तरुणी सज्ञान आणि दुसरी अल्पवयीन असल्याचं निष्पन्न झालं आहे. पोलिसांनी या दोघींनाही न्यायालयात हजर केलं. न्यायालयाच्या आदेशानुसार, अल्पवयीन मुलीला सुरक्षितता आणि देखभालीसाठी बालसुधारगृहात पाठवण्यात आलं आहे. तर सज्ञान तरुणीला मात्र तिच्या पसंतीच्या ठिकाणी राहण्याचेआणि जाण्याचे पूर्ण स्वातंत्र्य न्यायालयाने दिले आहेत.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?