पंतप्रधान कार्यालयाकडून पुण्यातील MIDC आगीतील मृतांच्या नातेवाईकांना दोन लाखांची मदत

उरवडेतील क्लोरिफाईड कंपनीत लागलेल्या भीषण आगीत 15 महिला कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला. त्यानंतर आता पंतप्रधान कार्यालयानंही मृतांच्या कुटुंबीयांना मदत जाहीर केलीय. Prime Minister Office Two lakh help

पंतप्रधान कार्यालयाकडून पुण्यातील MIDC आगीतील मृतांच्या नातेवाईकांना दोन लाखांची मदत
narendra modi
Follow us
| Updated on: Jun 07, 2021 | 11:03 PM

पुणेः पुण्याच्या मुळशीतील उरवडे येथील औद्योगिक वसाहतीत आगीची मोठी दुर्घटना घडलीय. उरवडेतील क्लोरिफाईड कंपनीत लागलेल्या भीषण आगीत 15 महिला कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला. त्यानंतर आता पंतप्रधान कार्यालयानंही मृतांच्या कुटुंबीयांना मदत जाहीर केलीय. (Two lakh assistance to the relatives of the deceased from the Prime Minister’s Office)

आगीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांसाठी PMNRF कडून प्रत्येकी दोन लाख

महाराष्ट्रातील पुणे येथील औद्योगिक वसाहतीत लागलेल्या आगीत मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या नातेवाईकांसाठी PMNRF कडून प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत देण्यात आलीय, तर जखमींना 50,000 रुपये देणार असल्याचं पंतप्रधान कार्यालयानं जाहीर केलंय.

तर राज्य सरकारकडूनही मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत

पुण्याच्या मुळशी तालुक्यातील उरवडे गावाजवळील दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांबद्दल सहानुभूती असून, मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात येईल,” अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली. पुण्याच्या मुळशी येथील उरवडे येथील औद्योगिक वसाहतीत आगीची मोठी दुर्घटना घडली आहे. उरवडे येथील क्लोरिफाईड कंपनीत ही घटना घडली. या दुर्घटनेत 15 महिला कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला. संबंधित कंपनीचं नाव एसव्हीएस अक्वा टेक्नॉलॉजिस असं आहे. आग कशामुळं लागली हे मात्र अद्याप समोर आलेलं नाही. या घटनेत एकूण 18 जणांचा मृत्यू झाला आहे.

दुपारी दोनच्या दरम्यान आग लागल्याची माहिती

मुळशी मधील उरवडे येथील औद्योगिक परिसरातील एसव्हीएस अक्वा टेक्नॉलॉजिस या रासायनिक कंपनीला आज दुपारी दोनच्या दरम्यान आग लागली. या ठिकाणी पंधरा ते वीस कामगार अडकून पडले असल्याची प्राथमिक माहिती होती. या केमिकल कंपनीत सकाळी 41 कर्मचारी कामासाठी आले होते. या 41 पैकी 17 लोकं मिसिंग आहेत. त्यापैकी 15 महिला आणि दोन पुरुष आहेत. आतापर्यंत आठ ते दहा मृतदेह जळून खाक झालेल्या अवस्थेत मिळाले, अशी माहिती स्थानिक आमदार संग्राम थोपटे यांनी दिली.

कंपनीमध्ये सॅनिटायझर निर्मिती

ही जी कंपनी आहे याठिकाणी सॅनिटायजर तयार केले जाते. सकाळी 41 कामगार कामावर आले होते. आगीनंतर 17 जण बेपत्ता आहेत. यात 15 महिला आणि 2 पुरुषांचा समावेश असून 8 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. सॅनिटायजर सारखा ज्वलनशील पदार्थ असल्याने यंत्रणा कितपत काम करते हे पाहाव लागेल, असं आमदार संग्राम थोपटे म्हणाले.

बंधित बातम्या: 

Pune Fire | पुण्यात केमिकल कंपनीला भीषण आग, 15 ते 20 जण अडकल्याची भीती

Pune Fire : सॅनिटायझर कंपनीत 15 महिलांसह 17 जणांचा जीव घेणारी आग नेमकी कशी लागली?

Two lakh assistance to the relatives of the deceased from the Prime Minister Office

Non Stop LIVE Update
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.