Budget 2019 Live: बंपर बजेट! 5 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त

Union Budget 2019 नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर मोदी सरकारने बजेटच्या माध्यमातून मास्टरस्ट्रोक मारला. अर्थमंत्री पियुष गोयल यांनी सादर केलेल्या अंतरिम बजेटमध्ये (Interim Budget 2019) 5 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त केलं. तसंच शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपये, असंघटीत कामगारांना बोनस, माजी सैनिकांच्या पेन्शनमध्ये दुप्पट वाढ असा बजेट बाऊन्सर टाकले.  हे बजेट देशाला वैभवाकडे नेणारं आहे, ‘कमरतोड’ महागाईची कंबर तोडली, […]

Budget 2019 Live: बंपर बजेट! 5 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:32 PM

Union Budget 2019 नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर मोदी सरकारने बजेटच्या माध्यमातून मास्टरस्ट्रोक मारला. अर्थमंत्री पियुष गोयल यांनी सादर केलेल्या अंतरिम बजेटमध्ये (Interim Budget 2019) 5 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त केलं. तसंच शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपये, असंघटीत कामगारांना बोनस, माजी सैनिकांच्या पेन्शनमध्ये दुप्पट वाढ असा बजेट बाऊन्सर टाकले.  हे बजेट देशाला वैभवाकडे नेणारं आहे, ‘कमरतोड’ महागाईची कंबर तोडली, असं म्हणत पियुष गोयल यांनी बजेट सादर करण्यास सुरुवात केली. मोदींनी जोरदार बाकं वाजवून गोयल यांना समर्थन दिलं. अर्थमंत्री अरुण जेटली उपचारासाठी अमेरिकेत असल्याने त्यांच्याऐवजी रेल्वेमंत्री पियुष गोयल (Piyush Goyal) यांनी बजेट मांडलं. पियुष गोयल यांनी सकाळी 11 वाजता बजेट मांडण्यास सुरुवात केली. त्याआधी केंद्रीय मंत्रिमंडळाची बजेटला मंजुरी मिळाली.  मग राष्ट्रपतींच्या सहीने या बजेटला हिरवा कंदील मिळाला.

Interim Budget 2019 Live Update

बजेट बंपर! 5 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त

मोदी सरकारने नोकरदारांना मोठं गिफ्ट दिलं आहे. 5 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न पूर्णता करमुक्त अर्थात टॅक्स फ्री केलं. या घोषणेनंतर सभागृहात मोदी मोदीच्या घोषणा सुरु झाल्या. सरकारच्या करमुक्तीच्या घोषणेमुळे  80 C अंतर्गत 6.5 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त होईल.

5 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न टॅक्स फ्री या मोठ्या घोषणेमुळे नोकरदारांना सर्वात मोठं गिफ्ट मिळालं आहे. पियुष गोयल यांच्या या घोषणेनंतर संसद सभागृहात मोदी मोदीचा जयघोष सुरु झाला. 5 लाख आणि त्यामध्ये 80C अंतर्गत मिळणारी दीड लाखांची सूट यामुळे तब्बल 6.50 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न टॅक्स फ्री असेल. या घोषणेमुळे जवळपास तीन कोटी मध्यमवर्गीय करदात्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मात्र त्याचवेळी मोदी सरकारने नोकरदारांचा आनंद नियम आणि अटींमध्ये गुंडाळून टाकला. कारण 5 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त केलं असलं तरी, त्यापुढे ज्यांचं उत्पन्न असेल, त्यांना जुन्या टॅक्स स्लॅबप्रमाणेच कर भरावा लागेल.

आधी किती कर द्यावा लागत होता, आता किती द्यावा लागणार?

उत्पन्न                      आधीचा टॅक्स                          आताचा टॅक्स

5 लाख                      13 हजार रुपये                        00

7.5 लाख                   65 हजार रुपये                        49,920 रु.

10 लाख                    1.17 लाख रुपये                      99,840 रु.

20 लाख                     4.29 लाख रुपये                     4.02 लाख रु

वाचा :  बजेटमधील 6 महत्त्वाच्या घोषणा  

GST

जानेवारी महिन्यात जीएसटी 1 लाख 3 हजार कोटी असल्याचा अंदाज.

घर घेणा-यांना जीएसटीमध्ये सवलत देण्यासाठी मंत्र्यांची समिती बनविण्यात आली आहे. लवकरचं जीएसटी कमी करण्यासाठी जीएसटी काऊन्सिल विचार करत आहे

टॅक्स

मध्यम वर्गाचा टॅक्स कमी करणं आमचं ध्येय

जीएसटी आतापर्यंतचा सर्वात क्रांतिकारी निर्णय, टॅक्स भरणाऱ्यांची संख्या 80 टक्क्यांनी वाढली. करवसुली वाढली, सर्व पैसा गरिबांसाठी वापरणार

करवसुली 12 लाख कोटीपर्यंत गेली. टॅक्स रिटर्न्स भराऱ्यांची संख्या 6.85 कोटींवर पोहोचली. 99.54 टक्के टॅक्स रिटर्न्स जसेच्या तसे स्वीकारले. करवसुलीचा पैसा गरिबांसाठी वापरणार

नोटाबंदीमुळे 1 लाख 36 हजार कोटींचा टॅक्स वसूल झाला

इंटरनेट

भारतात सगळ्यात जास्त इंटरनेटचा वापर. भारतात सर्वात स्वस्त इंटरनेट सेवा

फिल्म

फिल्म क्षेत्रानेही खूप रोजगार निर्माण होत आहेत. फिल्म क्षेत्रातील लोकांना शुट परवानगी मिळण्यासाठी सिंगल व्हिन्डो योजना

99.54 टक्के इकन्मक टॅक्स रिर्टनला आम्ही लगेच मान्यता दिली . 12 लाख कोटीचं टॅक्स कलेक्शन

रेल्वे बजेट

रेल्वेच्या बजेटसाठी 64 हजार 500 कोटींची तरतूद.

देशात आता मानवरहित रेल्वे क्रॉसिंग राहिले नाहीत

सैनिकांसाठी

संरक्षणसाठीचं बजेट 3 लाख कोटी. गरज पडल्यास संरक्षणाचं बजेट वाढवणार

35 हजार कोटी वन रँक वन पेन्शनसाठी खर्च केले.

हाय रिस्क जवानांचे भत्तेही वाढवले

जवानांच्या मिलिट्री पे मध्येही वाढ करण्यात आली

तरुणांसाठी

भारतात खूप रोजगारांच्या संधी तयार झाल्या आहेत. मुद्रा योजने अंतर्गत 70 टक्के महिला लाभार्थी ठरल्या आहेत. मध्यम , लघु आकाराच्या उद्योगासाठी 1 कोटीचं कर्ज घेणाऱ्यांना 2 टक्क्यांची सूट. जीएसटी अंतर्गत त्यांनी नोंद केलेली असावी

देशामध्ये 100 शंभरहून अधिक एअरपोर्ट आहेत त्यामुळे तरूणांना या क्षेत्रात रोजगार मिळत आहे

महिलांसाठी काय?

उज्ज्वला योजने अंतर्गत 8 कोटी गॅस कनेक्शन. मुद्रा योजने अंतर्गत 70 टक्के महिला लाभार्थी ठरल्या आहेत.

गर्भवती महिलांना 26 आठवड्याची पगारी सुट्टी

कामगारांसाठी

21 हजार रुपयांपर्यंत पगार असलेल्या असंघटीत नोकरदारांना 7 हजार रुपये बोनस

ईपीएफमध्ये सरकारचा वाटा वाढणार.

20 लाखांपर्यंतच्या ग्रॅच्युएटीवर कर लागणार नाही 20 लाखांपर्यंत ग्रॅच्युटीवर कर लागणार नाही. आतापर्यंत 10 लाखांची ग्रॅच्युटी करमुक्त होती, ती 20 लाखापर्यंत वाढवली

कर्मचाऱ्यांना मृत्यूनंतर 6 लाखांपर्यंतची भरपाई

सैनिकांची पेन्शन दुप्पट, 3500 वरुन 7 हजार

60 वर्षानंतर मजुरांना 3 हजार रुपये पेन्शन

10 कोटी मजुरांना फायदा

पंतप्रधान श्रमयोगी योजने अंतर्गत सरकारतर्फे 10 लाख कामगारांसाठी पेन्शन योजना. वयाच्या 18 वर्षी 55 रूपये तो भरेल बाकीचे पैसे सरकार भरेल.

पशुपालन आणि मस्तपालन

पशुपालन , मत्सपालन कर्जांना दोन टक्यांची सूट, शेतक-यांना 500 रूपये कामधेनु अंतर्गत मिळणार, नैसर्गिक आपत्ती पिकाचं नुकसान झालेल्या कर्जात पाच टक्क्याची सूट .

शेतकरी

शेतक-यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी प्रयत्न केले. 22 पिकांना हमीभाव निश्चित करण्यासाठी आम्ही निर्णय घेतला. उत्पादन खर्चाच्या 50 टक्के आम्ही हमीभाव दिला.

-पंतप्रधान किसान योजना – शेतकऱ्यांना दरवर्षी  6 हजार रुपये मिळणार,  2 हेक्टरपेक्षा कमी जमीन असलेल्यांना लाभ मिळणार, शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे जमा होणार. 12 कोटी शेतक-यांना फायदा, यासाठी 75 हजार कोटी सरकार भरणार. तीन हप्यामध्ये पैसे मिळणार.  1 डिसेंबर 2018 म्हणजेच गेल्या महिन्यापासून लागू करणार. 

पाच एकरापर्यंत शेतक-यांना 500 रूपयांची मदत

नैसर्गिक आपत्ती पिकाचं नुकसान झालेल्या कर्जात पाच टक्क्याची सूट – गोयल

आरोग्य

आम्ही जगातील सर्वात मोठ हेल्थ केअर प्रोगाम राबवला. 10 लाख लोकांचे उपाचार आयुष्य भारत योजने अंतर्गत झाले. आयुष्मान भारतच्या माध्यमातून जवळपास 50 कोटी लोकांना आरोग्यासंदर्भात फायदा होत आहे

LED बल्ब

143 कोटी एलएडी LED बल्ब गरिब कुटुंबाना पुरवली. प्रत्येक घराला जवळपास मोफत पुरवला आहे.

घरं

1 करोड 53 लाख घर आम्ही पंतप्रधान आवास योजने अतर्गंत बनवले आहेत

रस्ते

पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या अंतर्गत झालेली कामं तिप्पट वाढली. या योजनेसाठी 19 हजार कोटीची तरतूद

आरक्षण

गरिबांसाठी आम्ही आरक्षण आणलं. आरक्षण व्यवस्थेत कोणतीही छेडछाड केली नाही. आम्ही मनरेगा योजनेला आणखी निधी देऊ

देशातील साधनसंपत्तीवर पहिला अधिकार देशातील नागरिकांचा आहे – पियुष गोयल

बँका

तीन राष्ट्रीयकृत बँकांवरील निर्बंध उठवण्यात आले असून, बँकिंग क्षेत्रात सुधारणा होत आहे. भारताची अर्थव्यवस्था जगातील सहावी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. आज बँका कर्जवसुली करु शकत आहेत. जे पैसे देऊ शकत नव्हते, ते आता देत आहेत. आता लोक कर्ज भागवत आहेत किंवा अन्य कामाकडे वळत आहेत. एनपीए अर्थात बुडीत कर्जावर आम्ही जोर दिला. क्लीन बँकिंगच्या दिशेने आम्ही पावलं टाकली. फरार झालेल्या आर्थिक गुन्हेगारांच्या संपत्तीवर टाच आणली. आर्थिक टप्प्यांवर इच्छाशक्ती दाखवून, 3 लाख कोटींची कर्जवसुली केली

महागाई

आम्ही महागाईवर नियंत्रण ठेवले नसते, तर 40 टक्क्यांनी महागाई वाढली असती. वित्तीय तुट आम्ही 3.4 टक्क्यावर आणली. सध्या महागाई दर कमी झाली आहे. ‘कमरतोड’ महागाईची कंबर तोडली

पियुष गोयल 

भारतात परदेशी गुंतवणूक वाढली आहे. एफडीआय आम्ही 2.13 बिलियन वर घेवून गेलो. वित्तीय तुट आम्ही 3.4 टक्क्यावर आणली. सध्या महागाई दर कमी झाली आहे. आपण जगातील सहावी मोठी अर्थव्यवस्था बनलो

जीडीपी मागच्या वर्षामधील चांगल्या स्तावर – पियुष गोयल

देशाला वैभवाकडे नेणारं हे बजेट आहे, ‘कमरतोड’ महागाईची कंबर तोडली – पियुष गोयल

मोदी सरकारने देशवासियांचा विश्वास वाढवला, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी वेगाने प्रयत्न सुरु आहेत, गेल्या 5 वर्षात सर्वाधिक विकास दर गाठला.

मी अभिमानाने सांगतो, भारताची अर्थव्यवस्था कणखर वाटेवर आहे, शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होईल.

11.01 AM – अर्थमंत्री पियुष गोयल यांनी बजेट मांडण्यास सुरुवात केली.

*****************************************************

10.50 AM 

अर्थमंत्री पियुष गोयल यांनी बजेट सादर केल्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा देशाला संबोधित करणार आहेत. सूत्रांनी ही माहिती दिली. अर्थमंत्र्यांचं भाषण 45 मिनिटांचं असू शकतं. त्यानंतर मोदी देशाला संबोधित करतील. सकाळी 11.45 नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करतील. या भाषणात मोदी काही घोषणा करणार नाहीत, पण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनतेला काही संकेत देऊ शकतात.

10.40 AM शेतकऱ्यांसाठी सरकारने मदतीचा घोषणा करावी, तसेच नोटबंदीमध्ये जे व्यवसाय संपले आहेत, त्या युवकांना मदतीची घोषणा करावी, राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार धनंजय महाडिक यांची टीव्ही 9 ला प्रतिक्रिया

10.15 AM बजेटमध्ये ‘जुमले’च असतील, काँग्रेसचा हल्लाबोल

10.00 AM – पंतप्रधान नरेंद्र मोदी संसद भव मध्ये पोहोचले

कॅबिनेटनंतर पंतप्रधान मोदी, अर्थमंत्री पियुष गोयल आणि काही महत्वपूर्ण नेत्यांची बैठक. पियुष गोयल यांना बजेटसाठी 90 मिनिटे मिळू शकतात. बजेट कागदपत्रांची साईज मोठी असल्याने, मोठ्या घोषणा होण्याची शक्यता. अंतरिम बजेट असलं, तरी निवडणुकीआधी बजेट असल्याने भाजप पूर्ण बजेटप्रमाणेच घोषणा करण्याची शक्यता

9.57 AM – अर्थमंत्री पियुष गोयल संसदेत दाखल

-अर्थमंत्री पियुष गोयल राष्ट्रपतींच्या भेटीला

-शेअर बाजारात सकारात्मक सुरुवात, बाजार सुरु होताच सेन्सेक्समध्ये 90 अंकांनी वाढ

-अर्थसंकल्पाच्या कॉपी संसदेत पोहोचल्या

-पियुष गोयल अर्थसंकल्प सादर करणार, सकाळी 11 वा. अर्थसंकल्पीय भाषण

अंतरिम बजेट काय असतं ?

पूर्ण आर्थिक वर्षाशिवाय सादर केलं जाणारं बजेट म्हणजे अंतरिम बजेट

अंतरिम बजेटमध्ये काही महिन्यांच्या आर्थिक ताळेबंदचा लेखाजोखा असतो

अंतरिम बजेटलाच व्होट ऑन अकाऊंट असंही म्हटलं जातं

लोकसभेच्या ज्यावर्षी निवडणुका असतात त्यावर्षी शक्यतो अंतरिम बजेट सादर होतं

अंतरिम बजेटच्या वेळेस कुठलंही आर्थिक सर्वेक्षण सादर होत नाही.

अंतरिम बजेटमध्ये कुठल्याही मोठ्या खर्चाचा ताळेबंद नसतो

संबंधित बातम्या 

बजेटमधील 6 महत्त्वाच्या घोषणा  

संपूर्ण बजेट – Budget 2019 Live: बंपर बजेट! 5 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त  

साडे सहा लाखापर्यंतचं उत्पन्न टॅक्स फ्री कसं होणार?

Non Stop LIVE Update
महायुतीत मढ्यातील तिढा काही सुटेना, धैर्यशील मोहिते पाटील अपक्ष लढणार?
महायुतीत मढ्यातील तिढा काही सुटेना, धैर्यशील मोहिते पाटील अपक्ष लढणार?.
महायुतीचा फॉर्म्युला निश्चित! शिंदेंच्या 10 उमेदवारांची यादी तयार
महायुतीचा फॉर्म्युला निश्चित! शिंदेंच्या 10 उमेदवारांची यादी तयार.
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात.
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल.
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य.
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात.
मग घाबरता कशाला? अजितदादांच्या 2019 च्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर
मग घाबरता कशाला? अजितदादांच्या 2019 च्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर.
लोकसभा लढवणार की नाही? शिवतारेंनी शिंदेंच्या भेटीनंतर केलं स्पष्ट
लोकसभा लढवणार की नाही? शिवतारेंनी शिंदेंच्या भेटीनंतर केलं स्पष्ट.
एवढी मोठी हस्ती, जीवाला धोका;कडूंनी उडवली राणांच्या वक्तव्याची खिल्ली
एवढी मोठी हस्ती, जीवाला धोका;कडूंनी उडवली राणांच्या वक्तव्याची खिल्ली.
टाईमपास,फुलस्टॉप, केहना क्या चाहते हो; गांधींच्या सभेवर सामंतांची टीका
टाईमपास,फुलस्टॉप, केहना क्या चाहते हो; गांधींच्या सभेवर सामंतांची टीका.