AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Navneet Rana: लोकसभा अध्यक्षांपाठोपाठ आता केंद्रीय गृहमंत्रालयाने अहवाल मागवला, नवनीत राणा प्रकरण राज्य सरकारला भोवणार?

Navneet Rana: अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी त्यांना कोठडीत मिळालेल्या हीन वागणुकीबद्दल लोकसभा अध्यक्षांना पत्रं पाठवलं आहे.

Navneet Rana: लोकसभा अध्यक्षांपाठोपाठ आता केंद्रीय गृहमंत्रालयाने अहवाल मागवला, नवनीत राणा प्रकरण राज्य सरकारला भोवणार?
रवी राणा आणि नवनीत राणा. Image Credit source: tv9 marathi
Reporter Sandeep Rajgolkar
Reporter Sandeep Rajgolkar | Edited By: | Updated on: Apr 26, 2022 | 1:11 PM
Share

नवी दिल्ली: खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांना कोठडीत दिलेल्या हीन वागणुकीची आता लोकसभा अध्यक्षांपाठोपाठ (lok sabha speaker) केंद्रीय गृहमंत्रालयाने गंभीर दाखल घेतली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्य सरकारला पत्रं पाठवलं असून या प्रकरणाचा अहवाल मागवला आहे. त्यामुळे नवनीत राणा यांनी केलेले आरोप राज्य सरकारला भोवणार असल्याचे संकेत मिळत आहेत. खासदार नवनीत राणा यांना करण्यात आलेली अटक आणि त्यांच्याशी करण्यात आलेला अमानवी व्यवहार या संदर्भात अहवाल सादर करा, असे निर्देश केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्य सरकारला दिले आहेत. त्यामुळे राज्य सरकारला हा दुसरा झटका बसला आहे. त्यामुळे राज्य सरकार (maharashtra government)  या प्रकरणावर काय उत्तर देते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, राणा दाम्पत्यांना आजही कोर्टाकडून दिलासा मिळालेला नाही. त्यांच्या जामिनावर येत्या 29 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे.

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी त्यांना कोठडीत मिळालेल्या हीन वागणुकीबद्दल लोकसभा अध्यक्षांना पत्रं पाठवलं आहे. आपल्याला शौचालाही जाण्यास मज्जाव करण्यात आला. मागासवर्गीय असल्याने आपल्याला पाणीही दिलं गेलं नाही. कोठडीत आपला छळ करण्यात आला, असा आरोप नवनीत राणा यांनी या पत्रात केला होता. लोकसभा अध्यक्षांनी या पत्राची गंभीर दखल घेतली होती. त्यानंतर राज्य सरकारला याबाबतचा अहवाल पाठवण्याचे आदेश लोकसभा अध्यक्षांनी दिले होते. त्यानंतर आता केंद्रीय गृहमंत्रालयाने राणाप्रकरणावरून राज्य सरकारकडे पुन्हा एकदा अहवाल मागितला आहे.

दिलासा नाहीच

दरम्यान, नवनीत राणा यांना आजही कोर्टाकडून दिलासा मिळू शकला नाही. राणा यांचे वकील रिजवान मर्चंट यांनी राणा यांच्या जामिनासाठी सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सुनावणी घेण्याची विनंती मर्चंट यांनी कोर्टाला केली. पण कोर्टाने ही विनंती फेटाळून लावली. 29 एप्रिल रोजी पोलिसांनी आपलं लेखी म्हणणं मांडण्याचे आदेश देतानाच येत्या 29 एप्रिल रोजी या प्रकरणावर सुनावणी करणार असल्याचं कोर्टाने स्पष्ट केलं. त्यामुळे राणा दाम्पत्यांचा मुक्काम येत्या शुक्रवारपर्यंत कोठडीतच राहणार आहे.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार