India America Tariff War : सतत टॅरिफची धमकी देणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना भारताचं एकदाच एकदम कडक उत्तर, विषयच संपवला
India America Tariff War : भारताची आर्थिक स्थिती मजबूत आहे. देशात विदेशी मुद्रा भंडार, शेअर बाजार आणि पायाभूत सुविधा मजबूत आहेत. आपल्याकडे महागाई अन्य उदयोन्मुख अर्थव्यवस्थांच्या तुलनेत कमी आहे. सध्या भारत आणि अमेरिकेमध्ये टॅरिफ वॉर सुरु आहे. टॅरिफवरुन दोन्ही देशातील संबंध ताणले गेले आहेत. अमेरिकेकडून सतत दिल्या जाणाऱ्या धमकीला भारताने एकदाच कडक उत्तर दिलं आहे.

भारत आणि अमेरिकेमध्ये सध्या टॅरिफवरुन प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. कॅनडा, ब्राझील, चीन यांच्यानंतर ट्रम्प यांनी भारताविरोधात आघाडी उघडली आहे. भारतातून अमेरिकेत निर्यात होणाऱ्या वस्तुंवर त्यांनी 25 टक्के टॅरिफ आकारला आहे. भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद करावी, यासाठी ट्रम्प अशा प्रकारे दबावाचा गेम खेळत आहेत. पण भारताने ट्रम्प यांच्या दबावाला अजिबात जुमानलेलं नाही. भारताची अजूनही रशियाकडून तेल खरेदी सुरु आहे. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी एका कार्यक्रमात बोलताना स्पष्टपणे सांगितलं की, ‘भारत कोणासमोरही झुकणार नाही’ एका न्यूज चॅनलवरील कार्यक्रमात त्यांना जागतिक व्यापर गटांसोबत भारताच्या भविष्यातील संबंधांबद्दल विचारण्यात आलं. त्यावर ते म्हणाले की, “आजच्या तारखेला देश मजबूत स्थितीत असून आत्मविश्वास आहे. जीडीपी वर्षाला साडेसहा टक्क्याच्या दराने वाढतोय. वेगाने हा जीडीपी वाढत जाणार आहे”
“मला पूर्ण विश्वास आहे, भारत यावर्षी मागच्यावर्षीपेक्षा जास्त निर्यात करेल. व्यापार मार्गातील अडथळ्यांचा सामना करण्यासाठी आधीपासून उपायोजना केल्या जात आहेत” असं केंद्रीय मंत्री पीयूष गोयल म्हणाले. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये भारताने 82.5 कोटी अमेरिकी डॉलरपर्यंत वस्तू आणि सेवा निर्यात केली.
4 ट्रिलियन अमेरिकी डॉलरची अर्थव्यवस्था
फ्री ट्रेड अॅग्रीमेंटच्या प्रश्नावर गोयल म्हणाले की, “भारताचा अप्रोच आता टॅरिफ सवलत मागणीच्या पुढे गेला आहे” चार देशांसोबतच्या ईएफटीए ब्लॉकच्या चर्चेचा दाखल दिला. “आमची 4 ट्रिलियन अमेरिकी डॉलरची अर्थव्यवस्था आहे. जगात वेगाने पुढे जाणारी अर्थव्यवस्था आहे. आमच्याकडे युवा शक्ती आहे. तुमची लोकसंख्या वुद्धवात्कडे चालली आहे” या मुद्यांकडे गोयल यांनी लक्ष वेधलं.
जागतिक विकासात भारताचं योगदान किती टक्के?
“सगळं जग आपल्याला वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून ओळखतं. जागतिक विकासात आपलं 16 टक्के योगदान आहे. भारताचे 140 कोटी युवा, कुशल आणि महत्वाकांक्षी नागरिक जागतिक भागिदारीसाठी एक शक्तिशाली आकर्षण आहेत” असं पियूष गोयल म्हणाले.
या उद्योगामुळे हजारो नोकऱ्यांची निर्मिती
त्यांनी वर्ष 2000 नंतर भारतात झालेल्या मोठ्या बदलाचा उल्लेख केला. त्यांनी आयटी उद्योगाला देशात हजारो नोकऱ्यांची निर्मिती करण्याच श्रेय दिलं. कोरोना संकटाला देशाने कशाप्रकारे एका संधीमध्ये बदललं, त्याची आठवण गोयल यांनी करुन दिली. आव्हानात्मक परिस्थितीत भारत नेहमी विजयी होणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
