AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तामिळनाडू भाजपात खदखद,अण्णामलाई यांच्यानंतर दोन बड्या नेत्यांचा राजीनामा

तामिळनाडूत भाजपातील अंतर्गत असंतोष समोर आला आहे. पक्षाचे राज्य सचिव सुमती व्यंकटेश यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तसेच राज्य उपाध्यक्ष करु नागराजन यांनी देखील पक्षाला सोडचिट्टी दिली आहे.

तामिळनाडू भाजपात खदखद,अण्णामलाई यांच्यानंतर दोन बड्या नेत्यांचा राजीनामा
Annamalai
| Updated on: Jun 05, 2026 | 11:09 PM
Share

भारतीय जनता पार्टीचे तामिळनाडू प्रदेश अध्यक्ष असलेल्या अण्णामलाई यांनी पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर आता तामिळनाडू भाजपात फूट पडली आहे. भाजपाचे राज्य सचिव व्यंकटेश यांनीही राजीनामा दिला आहे. तसेच भाजपाच्या तामिळनाडू उपाध्यक्ष करु नागराजन यांनी देखील पक्षाला सोडचिट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही नेत्यांच्या राजीनाम्याने तामिळनाडूत भाजपाच्या अंतर्गत राजकारणात खळबळ उडाली आहे.

तामिळनाडू येथील राज्यसभेच्या निवडणूकीत विजय थलपती यांच्या टीव्हीके पक्षाचे सरकार आले आहे. त्यानंतर भाजपाचे प्रदेश अध्यक्ष के.अण्णामलाई यांनी राजीनामा दिला होता. आता मिळालेल्या माहितीनुसार करु नागराजन अण्णामलाई यांची विमानतळावर भेट घेणार आहेत. अण्णामलाई यांनी सांगितले की मी जनतेत राहून त्यांच्यासोबत काम करु इच्छीत होतो. माझी दृढ इच्छा होती की भाजपाने स्वबळावर तामिळनाडूत प्रत्येक निवडणूक लढावी.

राजकारणापासून दूर नाही – अण्णामलाई

अण्णामलाई यांनी राजीनामा दिल्यानंतर लागलीच घोषणा केली आहे की तामिळनाडूत राजकीय आंदोलन सुरु करणार आहेत. अण्णामलाई यांनी स्पष्ट केले की ते राजकारणापासून दूर जाणार नाहीत. या ऐवजी ते जमीनीस्तरावर राजकीय आंदोलनाची सुरुवात करणार आहेत. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर त्यांच्या नव्या मोहिम ‘अण्णामलाई मक्कल इयक्कम’ची घोषणा देखील केली आहे.

त्यांनी एक्सवर पोस्ट केली आहे की अण्णामलाई मक्कल इयक्कम ( AMI ) शी जोडण्यासाठी आतापर्यंत ३ हजाराहून अधिक स्वयंसेवकांनी नोंदणी केली आहे. जनतेचा हा विश्वास आणि उत्साह आमच्या अपेक्षापेक्षा जास्त आहे. आमची टीम येणाऱ्या दिवसात प्रत्येक स्वयंसेवकाला संपर्क करणार आहे. तुमचे समर्थन आणि सहकार्यासाठी पुन्हा एकदा धन्यवाद !

अण्णामलाई यांच्या या पावलाने संकेत मिळाले आहेत की ते तामिळनाडूच्या राजकारणात आपली स्वतंत्र ओळख आणि स्वतंत्र राजकीय आधार तयार करण्याच्या दिशेने पुढे जात आहेत. तसेच अण्णामलाई यांनी दावा केला आहे की भाजपात सामील होण्याच्या एक दिवस आधी अभिनेता रजनीकांत यांनी त्यांना त्यांच्या संघटनेत येण्याचे आमंत्रण दिले होते. परंतू भाजपाचे वरिष्ठ नेते बी.एल. संतोष यांना वचन दिले असल्याने आपण त्यांचा प्रस्ताव नाकारला होता आणि भाजपात जाण्याचा निर्णय घेतला होता.

Follow Us
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडल
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडलं?
पंढरीकडे पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
Pandharpur Wari 2026 | पंढरीकडे संतांच्या पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?.

जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?

CJP protest : मोठी बातमी! विद्यार्थ्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात, थेट मोठी घोषणा, उद्या….

CJP protest : मोठी बातमी! विद्यार्थ्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात, थेट मोठी घोषणा, उद्या…

भाजप आमदाराच्या गाडीवर हल्ला, मारण्याचा प्रयत्न.

भाजप आमदाराच्या गाडीवर हल्ला, मारण्याचा प्रयत्न

खरंच की काय? टीम इंडियाच्या हट्टामुळे हा खेळाडू दुखापतग्रस्त! नेमकं काय घडलं ते जाणून घ्या.

खरंच की काय? टीम इंडियाच्या हट्टामुळे हा खेळाडू दुखापतग्रस्त! नेमकं काय घडलं ते जाणून घ्या

मराठी अभिनेत्रीचा CJP आंदोलनाला विरोध, थेट विरोधी पोस्ट करत म्हणाली….

मराठी अभिनेत्रीचा CJP आंदोलनाला विरोध, थेट विरोधी पोस्ट करत म्हणाली…

Farmer Loan Waiver List : कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरुवात, पण या शेतकऱ्यांना लाभ मिळणारच नाही, ती अट काय?.

Farmer Loan Waiver List : कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरुवात, पण या शेतकऱ्यांना लाभ मिळणारच नाही, ती अट काय?