AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपच्या ‘मिशन यूपी’मध्ये संघाचीही उडी; होसबळे, भैयाजी जोशी लखनऊमध्ये तळ ठोकणार!

उत्तर प्रदेशात 2022मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. (Dattatreya Hosabale and Bhaiyyaji Joshi)

भाजपच्या 'मिशन यूपी'मध्ये संघाचीही उडी; होसबळे, भैयाजी जोशी लखनऊमध्ये तळ ठोकणार!
Dattatreya Hosabale
| Edited By: | Updated on: Jul 01, 2021 | 11:19 AM
Share

लखनऊ: उत्तर प्रदेशात 2022मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. नुकत्याच झालेल्या पंचायत समितीच्या निवडणुकीत मोठं अपयश आल्याने भाजपने ‘मिशन यूपी’साठी कंबर कसली असून त्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही उडी घेतली आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशातील राजकीय घडामोडींकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. (up elections 2022: RSS leader Dattatreya Hosabale and Bhaiyyaji Joshi will stay in UP)

संघाचे नवे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे हे उत्तर प्रदेशातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लखनऊचा दौरा करणार आहेत. तर भैयाजी जौशी हे राम मंदिर प्रजोक्टचे केअर टेकर असणार आहेत. त्यामुळे भाजपबरोबर संघही मिशन 2022साठी सक्रिय झाल्याचं उघड होत असल्याचं वृत्त ‘आज तक’ने दिलं आहे.

सत्ता टिकवायची म्हणून

पुढच्यावर्षी पाच राज्यांमध्ये निवडणुका होत आहेत. त्यात उत्तर प्रदेशातील निवडणूक ही सर्वात महत्त्वाची मानली जात आहे. 15 वर्षाच्या राजकीय वनवासानंतर भाजप उत्तर प्रदेशात सत्तेत आली होती. त्यामुळे पुन्हा एकदा यूपी सर करण्यासाठी भाजप कामाला लागला आहे. उत्तर प्रदेशातील सत्ता भाजपच्या हातून जाऊ नये म्हणून संघही कामाला लागला आहे. धार्मिक, सांस्कृतिक आणि वैचारिक कारणाने उत्तर प्रदेश अत्यंत महत्त्वाचे असल्याने संघ आणि भाजपला यूपीची सत्ता हातून जाऊ द्यायची नाही, त्यामुळे या दोन्ही संघटनांनी कंबर कसली आहे, असं सूत्रांनी सांगितलं.

संघाचे शताब्दी वर्ष आणि मिशन यूपी

2022मध्ये उत्तर प्रदेशातील निवडणुका झाल्यानंतर 2024मध्ये लोकसभेच्या निवडणुका होत आहे. लोकसभेत चांगलं यश मिळवण्यासाठी उत्तर प्रदेश जिंकणं भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. उत्तर प्रदेश हे देशातील सर्वात मोठं राज्य असल्याने भाजपने उत्तर प्रदेशसाठी मोर्चबांधणी सुरू केली आहे. शिवाय 2025मध्ये संघाचं शताब्दी वर्ष आहे. त्यामुळे केंद्रात आणि राज्यात सत्ता असणं संघ आणि भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचं असल्याचंही सूत्रांनी सांगितलं. त्यामुळेच संघाचे नवे सरकार्यवाहक दत्तात्रय होसबळे हे नागपूर मुख्यालयात राहण्याऐवजी लखनऊमध्ये राहून मिशन यूपीवर जोर देणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

होसबळे-जोशी पहिल्यांदाच यूपीत एकत्र

होसबळे यांच्यासह भैयाजी जोशीही उत्तर प्रदेशातच राहणार आहेत. भैयाजी जोशी अयोध्येतील राम मंदिर प्रकल्पाचे केअरटेकर असतील. ते या प्रकल्पावर नजर ठेवून असतील. राम मंदिराच्या माध्यमातून जनतेपर्यंत जाण्याची भाजपची योजना असल्याचंही सांगितलं जात आहे. विशेष म्हणजे होसबळे आणि जोशी पहिल्यांदाच यूपीत एकत्र राहणार असून पडद्यामागून राजकीय वातावरण निर्मिती करण्याचं काम करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. (up elections 2022: RSS leader Dattatreya Hosabale and Bhaiyyaji Joshi will stay in UP)

संबंधित बातम्या:

लोकसभा आणि राज्यसभेच्या किती खासदारांनी कोरोना लस घेतली? एकही डोस न घेतलेले किती खासदार?

Jammu Kashmir: श्रीनगरमध्ये सामान्य लोकांना वाचवत दहशतवाद्यांचा खात्मा, काय आहे हे ‘स्पेशल ऑपरेशन’?

President Ramnath Kovind : राष्ट्रपती कोविंद गावी पोहोचताच भावूक, जन्मभूमीची माती भाळी लावून नमन, लहानपणीच्या मित्राचीही भेट!

(up elections 2022: RSS leader Dattatreya Hosabale and Bhaiyyaji Joshi will stay in UP)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.