Jammu Kashmir: श्रीनगरमध्ये सामान्य लोकांना वाचवत दहशतवाद्यांचा खात्मा, काय आहे हे ‘स्पेशल ऑपरेशन’?

जम्मूमध्ये एअरफोर्स स्टेशनवर ड्रोन हल्ला झाल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. भारताकडून तातडीने इस्राईलची अँटी ड्रोन सिस्टम खरेदी करण्याबाबत प्रयत्न सुरु होऊ शकतात.

Jammu Kashmir: श्रीनगरमध्ये सामान्य लोकांना वाचवत दहशतवाद्यांचा खात्मा, काय आहे हे 'स्पेशल ऑपरेशन'?
Jammu Kashmir security forces


नवी दिल्ली : जम्मूमध्ये एअरफोर्स स्टेशनवर ड्रोन हल्ला झाल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. भारताकडून तातडीने इस्राईलची अँटी ड्रोन सिस्टम खरेदी करण्याबाबत प्रयत्न सुरु होऊ शकतात. इस्राईच्या ‘स्मश 2000 प्लस’ला भारतात तैनात केलं जाऊ शकतं. याच्या खरेदीची प्रक्रिया आधीपासून सुरु होती, मात्र आता आपतकालीन स्थितीत खरेदी खरेदी केलं जाऊ शकतं. दरम्यान जम्मू ड्रोन हल्ल्याप्रकरणी NIA ने जम्मूच्या सतवारी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलाय. या तक्रारीत संबंधित ड्रोन हल्ला सुनियोजित असल्याचं सांगण्यात आलंय. दुसरीकडे या ड्रोन हल्ल्याचा संबंध जम्मूमधील एका कारवाईशी देखील जोडला जातोय. श्रीनगरच्या जवळ मल्हूरामध्ये सैनिकांनी तब्बल 15 तास हे ऑपरेशन केलं (Know how Indian army saved many peoples life from terrorist).

आधी सामान्य नागरिकांचे जीव वाचवले, मग दहशतवाद्यांचा खात्मा

15 तास चाललेल्या या कारवाईत सैन्याने आधी खूप चतुराईने सामान्य लोकांना वाचवलं आणि मग दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. टीव्ही9 ने हे संपूर्ण ऑपरेशन आपल्या कॅमेऱ्यात कैद केलेय. सैन्याने कुशलतेने सामान्य नागरिकाचा जीव वाचवत दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानं स्थानिक लोकांमध्ये विश्वासाचं आणि दहशतवाद्यांमध्ये भीतीचं वाटावरण तयार झालंय.

नेमकं काय घडलं?

श्रीनगरच्या मल्हूरा भागात अचानक गोळीबार सुरू झाला. सुरक्षा दलाच्या कारवाईने दहशतवाद्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला. जवानांनी एका घराला घेरलं. फायरिंगची सुरुवात दहशतवादी लपलेल्या घरातूनच झालेली. घरात घेरलेल्या दहशतवाद्याने जम्मू-काश्मीर पोलीस, सैन्य आणि CRPF च्या संयुक्त पथकाला निशाणा बनवलं. दहशतवाद्यांनी AK-47 ने गोळीबार केला. त्याला सुरक्ष दलाने चोख प्रत्युत्तर दिलं. त्याआधी या भागातील सर्व सामान्य नागरिकांना तेथून सुरक्षित बाहेर काढण्यात आलं.

लश्कर टॉप कमांडरचा खात्मा

सैनिकांनी या भागातील वयोवृद्ध, महिला आणि मुलांना सुरक्षित बाहेर काढल्यानंतर ज्या घरात दहशतवादी लपले होते ते उद्ध्वस्त करण्यात आलं. या कारवाईत लष्करचा टॉप कमांडर नदीम अबरार आणि आणखी एक पाकिस्तानी दहशतवादी मारले गेले.

हेही वाचा :

नांदेडमध्ये नेत्यांच्या हत्येचा कट, लष्कर-ए-तोयबाच्या तीन दहशतवाद्यांना दहा वर्षांचा कारावास

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून 2 युवकांची हत्या, सैन्याकडून परिसराची कडक नाकेबंदी

दहशतवादी संघटनेशी संबंध, जम्मू काश्मीरच्या राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त पोलीस अधिकाऱ्याची हकालपट्टी

व्हिडीओ पाहा :

Know how Indian army saved many peoples life from terrorist

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI