Corona Vaccine Update : आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द, देशातील पहिलं लसीकरण उत्तर प्रदेशात

उत्तर प्रदेशच्या कुटुंब कल्याण विभागाकडून यासंदर्भात एक परिपत्रक जारी करण्यात आले आहे. | Corona Vaccine Update

Corona Vaccine Update : आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द, देशातील पहिलं लसीकरण उत्तर प्रदेशात
मुंबईतील अनेक लसीकरण केंद्र बंद पडायला सुरुवात झाली आहे.
Follow us
| Updated on: Dec 16, 2020 | 2:29 PM

लखनऊ: कोरोनाच्या लसीकरणाला (Corona Vaccination) सुरुवात करणारे उत्तर प्रदेश (UP) हे देशातील पहिले राज्य ठरणार आहे. त्यादृष्टीने उत्तर प्रदेशात हालचालींना वेग आला असून सर्व सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. (COVID-19 vaccination may take place months of December 2020 and January 2021 in UP)

उत्तर प्रदेशच्या कुटुंब कल्याण विभागाकडून यासंदर्भात एक परिपत्रक जारी करण्यात आले आहे. यामध्ये 20 डिसेंबर ते 21 जानेवारी या काळात लसीकरण मोहीम राबवली जाणार असल्याचा उल्लेख आहे. यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांचे सहकार्य आवश्यक आहे. त्यामुळे पूर्ण विचाराअंती सर्व सरकारी कर्मचारी, नर्सेस, कंत्राटी कर्मचारी आणि रोजंदारी कामगारांच्या सुट्ट्या 31 जानेवारीपर्यंत रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे परिपत्रकात म्हटले आहे.

आजपासून लसीकरणाच्या ट्रेनिंगला सुरुवात

चिकित्सा आणि स्वास्थ्य विभागाचे अपर मुख्य सचिव अमित मोहन प्रसाद यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोविडची लस साठवण्याबरोबरच ती कशाप्रकारे द्यायची याबाबतचे व्यवस्थापन सध्या सुरु आहे. त्यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांना तांत्रिक प्रशिक्षण दिले जात आहे. कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणारे मास्टर्स ट्रेनर्स तयार आहेत. हे मास्टर्स ट्रेनर्स आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस कशाप्रकारे द्यायची, याचे प्रशिक्षण देतील.

केंद्र सरकारकडून सिरम लशीच्या आपातकालीन वापराला अद्याप परवानगी नाही

सिरम इन्स्टिट्यूटने कोव्हॅक्सीन या लशीच्या आपातकालीन वापरासाठी काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारकडे अर्ज केला होता. याशिवाय, भारत बायोटेक आणि फायझरकडून आपापल्या लशीच्या आपातकालीन वापरासाठी केंद्र सरकारकडे परवानगी मागण्यात आली होती. मात्र, भारतीय औषध महानियंत्रकांकडून नेमण्यात आलेल्या तज्ज्ञ समितीकडून या तिन्ही कंपन्यांकडे लशीसंदर्भातील अधिक तपशील मागवण्यात आले होते. जेणेकरून या लशींच्या परिणामकारकतेची नेमकी खात्री पटवता येईल. तज्ज्ञ समितीच्या या भूमिकेनंतर सिरम, भारत बायोटेक आणि फायझरने आणखी वेळ मागितला होता. त्यामुळे भारतातील कोरोना लसीकरण मोहीम तुर्तास लांबणीवर पडली आहे.

संबंधित बातम्या:

बापरे, मलनिस्सारण वाहिन्यांच्या पाण्यात कोरोना विषाणू; पालिका म्हणते, मुंबईकरांना धोका नाही

कोरोनातून बरे झाल्यानंतरही नव्याच आजाराचं संकट; जाणून घ्या, लक्षणे आणि उपचार?

कोरोना लसनिर्मिती ते लसीकरण, जाणून घ्या 3 महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं

(COVID-19 vaccination may take place months of December 2020 and January 2021 in UP)

Non Stop LIVE Update
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?.
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ.
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात.
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश.
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप.
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?.
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?.
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?.
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं.