AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! अमेरिका इराण युद्ध संपलं, ट्रम्प प्रशासनाकडून सर्वात मोठी घोषणा, मध्य पूर्वेतून गुड न्यूज

अमेरिका आणि इराणमध्ये तब्बल 40 दिवस युद्ध सुरू होतं. त्यानंतर युद्धविरामाची घोषणा देखील करण्यात आली होती. मात्र तरीही स्ट्र्टे ऑफ होर्मूमध्ये तणाव कायम होता. आता ट्रम्प प्रशासनाकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे.

मोठी बातमी! अमेरिका इराण युद्ध संपलं, ट्रम्प प्रशासनाकडून सर्वात मोठी घोषणा, मध्य पूर्वेतून गुड न्यूज
donald trumpImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 01, 2026 | 4:09 PM
Share

इस्त्रायलकडून 28 फेब्रुवारीला इराणवर पहिला हल्ला करण्यात आला आणि एका भीषण युद्धाला सुरुवात झाली. या युद्धात इस्त्रायलनंतर अमेरिकेनं देखील इराणवर हल्ला केला. अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये तब्बल 40 दिवस हे युद्ध सुरू होतं. अखेर 40 व्या दिवशी इराण आणि अमेरिकेनं युद्धविरामाची घोषणा केली. मात्र अजूनही स्ट्रेट ऑफ होर्मूजवर तणाव कायम आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणने स्ट्रेट ऑफ होर्मूज आधीच बंद केला होता, त्यानंतर अमेरिकेनं देखील या मार्गावर नाकेबंदी केली. स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद असल्यामुळे सध्या जगावर मोठं ऊर्जा संकट निर्माण झालं आहे, अमेरिका आणि इराणमधील युद्ध कधी संपणार? याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागतलेलं असतानाच आता एक गुड न्यूज समोर आली आहे.

इराणसोबत सुरू असलेल्या युद्धासंदर्भात ट्रम्प प्रशासनाकडून अशी एक घोषणा करण्यात आली आहे, ज्यामुळे संपूर्ण जगाला मोठा झटका लागला आहे. इराणसोबत सुरू असलेलं युद्ध आता संपलं आहे, अशी घोषणा ट्रम्प प्रशासनाकडून करण्यात आली आहे. 28 फेब्रुवारी रोजी सुरू झालेल्या या युद्धाची डेडलाइन 60 दिवसांची ठेवण्यात आली होती, मात्र त्यापूर्वीत दोन्ही देशांमध्ये युद्धविरामाची घोषणा करण्यात आली होती. आता याबाबत ट्रम्प प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून अधिकृतरित्या माहिती देण्यात आली आहे. हे युद्ध संपल्यात जमा असल्याचं या अधिकाऱ्याने म्हटलं आहे. तसेच 7 एप्रिलनंतर दोन्ही देशांमध्ये एकदाही ड्रोन किंवा मिसाईल हल्ला झालेला नाही, तसेच गोळीबार देखील झाला नसल्याची माहिती या अधिकाऱ्याने दिली आहे.

अमेरिकेच्या कायदा वॉर पावर रिझॉल्यूशननुसार अमेरिकेचे राष्ट्रापती संसदेच्या मंजूरीशिवाय कोणतंही युद्ध फक्त 60 दिवस सुरू ठेवू शकतात, त्यानंतर त्यांना ते युद्ध कोणत्याही परिस्थितीमध्ये संपवावचं लागतं. जर युद्ध सुरूच ठेवायचं असेल तर राष्ट्रपतींना काँग्रेसची परवानगी घ्यावी लागते. किंवा जर संसदेची परवानगी मिळाली नाही तर संसदेकडे युद्ध सुरू ठेवण्यासाठी 30 दिवसांची अतिरिक्त मुदत मागावी लागते, या युद्धाला आता दोन महिन्यांपेक्षा अधिकचा कालावधी झाला आहे, मात्र अजूनही ट्रम्प यांनी काँग्रेसकडे परवानगी मागितलेली नाही, त्यामुळे हे युद्ध जवळपास संपल्यात जमा असल्याचं वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटलं आहे.

Follow Us
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101 अमेरिकन डॉलरचा..
Mumbai Cha Raja | हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101 अमेरिकन डॉलरचा हार, व्हिडीओ होतोय व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल