AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रुग्ण बेडवर झोपल्याचा राग अनावर, दुसऱ्या रुग्णाकडून हत्या; यूपीतील धक्कादायक प्रकार

उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर येथील एका रुग्णालयात एक अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. (Uttar Pradesh: patient murdered in up hospital by another patient)

रुग्ण बेडवर झोपल्याचा राग अनावर, दुसऱ्या रुग्णाकडून हत्या; यूपीतील धक्कादायक प्रकार
Uttar Pradesh
| Updated on: Apr 12, 2021 | 12:09 PM
Share

लखनऊ: उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर येथील एका रुग्णालयात एक अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एक रुग्ण आपल्या बेडवर झोपल्याचा राग आल्याने दुसऱ्या रुग्णाने त्याची रुग्णालयातच हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. (Uttar Pradesh: patient murdered in up hospital by another patient)

पोटात दुखू लागल्याने हंसराज नावाच्या रुग्णाला येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याला होल्डिंग एरियामध्ये भर्ती करण्यात आलं होतं. शनिवारी रात्री त्याला बेड नंबर 21 देण्यात आला. हंसराज मनोरुग्ण असल्याचंही सांगितलं जातं. तर आरोपी रुग्ण अब्दूल रहमान याला बेड नंबर 27वर भर्ती करण्यात आलं होतं.

बेड नंबर विसरला अन्

रहमान रविवारी सकाळी वॉशरुममध्ये गेला होता. परत आला तेव्हा तो त्याचा बेड नंबर विसरला होता. त्यावेळी त्याला एका बेडवर हंसराज पहुडलेला दिसला. त्यामुळे रहमानला हाच आपला बेड असल्याचं वाटलं आणि त्याने हंसराजशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. हंसराजने आपल्या बेडचा जबरदस्ती ताबा घेतल्याचा आरोपही त्याने केला. शाब्दिक चकमकी वाढल्याने संतप्त झालेल्या रहमानने हंसराजला बेडवरून उचलून जमिनीवर आपटले. त्यामुळे हंसराजचा जागीच मृत्यू झाला.

दोघांना अटक

यावेळी मृताच्या कुटुंबीयांनी रुग्णालय प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप ठेवत रुग्णालयात एकच गोंधळ घातला. पोलिसांनी आरोपी आणि त्याच्या वडिलाला अटक केली आहे. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. आरोपींना ताब्यात घेतलं असून मृताच्या कुटुंबीयांनी तक्रार दाखल केल्यास एफआयआर नोंदवला जाईल, असं पोलीस अधिकारी प्रवीण कुमार यांनी सांगितलं. (Uttar Pradesh: patient murdered in up hospital by another patient)

संबंधित बातम्या:

‘केंद्राकडून राज्याचा अपमान, भाजपने विरोध करावा, अन्यथा महाराष्ट्रात राजकारणाचा अधिकार नाही’

Corona Vaccine : भारताला ‘या’ आणखी 5 कोरोना लसी मिळणार, लसींचा तुटवडा संपणार?

Remdesivir Injection | भारत सरकारनं रेमेडेसिव्हीरची निर्यात थांबवली, मोदी सरकारचा मोठा निर्णय

(Uttar Pradesh: patient murdered in up hospital by another patient)

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.