‘केंद्राकडून राज्याचा अपमान, भाजपने विरोध करावा, अन्यथा महाराष्ट्रात राजकारणाचा अधिकार नाही’

'केंद्राकडून राज्याचा अपमान, भाजपने विरोध करावा, अन्यथा महाराष्ट्रात राजकारणाचा अधिकार नाही'
संजय राऊत, शिवसेना खासदार

महाराष्ट्र सरकार आणि मुख्यमंत्र्यांनी 'प्राण जाये पर वचन ना जाये', अशा पद्धतीने करोनासंदर्भातील लढाई सुरु ठेवली आहे | Sanjay Raut BJP

Rohit Dhamnaskar

|

Apr 12, 2021 | 3:14 PM

मुंबई: कोरोनाच्या संकटकाळातही केंद्र सरकार प्रशासनाला हाताशी धरून भाजपची (BJP) सत्ता नसलेल्या राज्यांमध्ये राजकारण करत आहे. हा महाराष्ट्राचा अपमान आहे. राज्यातील विरोधी पक्षाने याचा सर्वप्रथम विरोध केला पाहिजे. परंतु, त्यांना केंद्र सरकारची (Modi govt) ही कृती महाराष्ट्राचा अपमान वाटत नसेल तर विरोधकांना महाराष्ट्रात राजकारण करण्याचा अधिकार उरणार नाही, असे मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले. (Shivsena MP Sanjay Raut slams BJP)

ते सोमवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर पुन्हा एकदा टीकेची तोफ डागली. भाजपचे मुख्यमंत्री असलेल्या राज्यांमध्ये कोरोना पळालेला आहे. तर सरकार नसलेल्या राज्यांमध्ये कोरोना आहे, अशाप्रकारे केंद्र सरकार वागत आहे. महाराष्ट्र, छत्तीसगढ आणि पंजाब ही राज्ये कोरोना हाताळणीत अपयशी ठरली असे केंद्र सरकारेच म्हणणे आहे. मात्र, हे त्या राज्यांचे नव्हे तर मोदी सरकारचे अपयश आहे. कारण, ही राज्यं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलेल्या मार्गदर्शक तत्वांचं पालन करत होती. त्यानंतरही कोरोना आटोक्यात येत नसेल तर हे त्या राज्यांचे नव्हे तर केंद्र सरकारचे अपयश आहे, असे संजय राऊत यांनी ठणकावून सांगितले.

भाजप नेत्यांना राऊतांच्या कानपिचक्या

लॉकडाऊन केल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा देणाऱ्या भाजप नेत्यांना संजय राऊत यांनी फैलावर घेतले. हा भाजपचा राष्ट्रीय कार्यक्रम असेल तर त्यांना करु द्यावं. पण आम्हाला महाराष्ट्राच्या जनतेच्या जीवाची काळजी आहे. एकीकडे महाराष्ट्र सरकार अपयशी झाल्याचं म्हणायचं आणि दुसरीकडे तुम्ही मुख्यमंत्र्यांना त्यासंदर्भातील निर्णय घेऊ देत नाही. हे काय चाललं आहे?, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.

केंद्र सरकारने अशा प्रसंगी अत्यंत सावध आणि संवेदनशीलपणे वागायला हवं. असे आरोप-प्रत्यारोप करु नयेत. महाराष्ट्र सरकार आणि मुख्यमंत्र्यांनी ‘प्राण जाये पर वचन ना जाये’, अशा पद्धतीने करोनासंदर्भातील लढाई सुरु ठेवली आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले.

संबंधित बातम्या:

‘फडणवीसांची सूचना चांगली, पण व्यापाऱ्यांना आर्थिक पॅकेजसाठी केंद्राने सढळ मदत करावी’

Maharashtra Lockdown: मुंबईतील दुकानं बंद ठेवायचेत, तर आर्थिक पॅकेज द्या; अन्यथा लॉकडाऊनला जुमानणार नाही: विरेन शाह

Maharashtra Lockdown : आमदारांचा निधी 2 कोटीने कमी करा आणि कामगारांना द्या, चंद्रकांत पाटलांची दर्यादिली

(Shivsena MP Sanjay Raut slams BJP)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें