‘सरकारी बाबूं’ना पुन्हा बनवलं शिपाई-वॉचमन! योगी आदित्यनाथांचा धडाकेबाज निर्णय

उत्तर प्रदेशातील 4 सहाय्यक जनसंपर्क अधिकाऱ्यांना त्यांच्या मूळ शिपाई, वॉचमन आणि सिनेमा ऑपरेटर-असिस्टंट या पदावर पाठवण्यात आलं आहे.

'सरकारी बाबूं'ना पुन्हा बनवलं शिपाई-वॉचमन! योगी आदित्यनाथांचा धडाकेबाज निर्णय
Yogi Aadityanath

नवी दिल्ली: बेकायदेशीररित्या प्रमोशन मिळवलेल्या सरकारी बाबूंना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जोरदार झटका दिला आहे. या कर्मचाऱ्यांना पुन्हा त्यांच्या मूळ जागांवर पाठवण्यात आलं आहे. उत्तर प्रदेशातील 4 सहाय्यक जनसंपर्क अधिकाऱ्यांना त्यांच्या मूळ शिपाई, वॉचमन आणि सिनेमा ऑपरेटर-असिस्टंट या पदावर पाठवण्यात आलं आहे. या सर्वांनी बेकायदेशीरपणे प्रमोशन मिळवल्याचं सांगण्यात येत आहे.(Yogi Adityanath reinstated the illegally promoted officers)

उत्तर प्रदेशच्या बरेली जिल्ह्यातील नरसिंह नावाच्या व्यक्तीला पुन्हा एकदा शिपाई बनवण्यात आलं आहे. तो बढती मिळवून सहाय्यक जनसंपर्क अधिकारी पदावर रुजू झाला होता. त्याप्रमाणेच फिरोजाबादचत्या दयाशंकर या व्यक्तीला वॉचमन बनवण्यात आलं आहे. तर मथुरा आणि भदोई जिल्ह्याच्या विनोद कुमार आणि अनिल कुमार यांना सिमेना ऑपरेटर-असिस्टंट बनवण्यात आलं आहे.

हायकोर्टात गेल्यानं प्रकरण उजेडात

माहिती विभागात काम करणाऱ्या हेल्परने आपल्या बढतीसाठी अलाहाबाद उच्च न्यायालयात एक रिट याचिका दाखल केली होती. त्याने ही याचिका दाखल करताना त्या चौघांचं उदाहरण दिलं होतं. त्यांना प्रमोशन देण्यात आलं मग मला का नाही? असा याचिकाकर्त्याचा सवाल होता. मात्र, उच्च न्यायालयाने ही याचिका दाखल करुन घेतली नाही आणि बढतीचा निर्णय संबंधित विभागाच्या नियमांनुसार असतो, असं उच्च न्यायालयाने म्हटलं आहे.

दरम्यान, उच्च न्यायालयाने अन्य बढत्यांची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर माहिती विभागानं केलेल्या चौकशीत बेकायदेशीरपणे त्या चौघांचं प्रमोशन झाल्याची धक्कादायक बाब समोर आली. त्यानंतर संबंधित विभागानं त्या चौघांना पुन्हा त्यांच्या मूळ पदावर पाठवलं आहे.

उत्तर प्रदेशात मद्य विक्री परवना मिळवणं अधिक सोपं

मद्यविक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नाचा विचार करुन उत्तर प्रदेश सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने बार लायसन्स मंजुरी नियन 2020 मध्ये बदल केले आहेत. नव्या नियमांनुसार मद्यविक्रीसाठी परवाना मिळवणं आणखी सोपं झालं आहे. त्याचबरोबर विमानतळ, रेल्वे आणि क्रूझमध्ये बार उघडता येईल. याशिवाय योगी सरकारने तात्पुरता परवानाधारकांची मुदत तीन ते सहा तासांपर्यंत वाढवली आहे

युपीत आता नव्या नियमांनुसार विमानतळ, स्पेशल ट्रेन आणि क्रूझमध्ये मद्यविक्रीचा परवाना देण्यात येईल. परवाना मिळवण्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया असेल. सकाळी 8 ते मध्यरात्रीपर्यंत सलग सहा तास ऑनलाईन विशेष परवाना उपलब्ध असेल. पूर्वपरवानगी आणि अतिरिक्त शुल्कासह हा कालावधी एक तासाने वाढवता येईल. पूर्वी फक्त तीन तास तात्पुरता परवाना होता. याशिवाय त्याला प्रदीर्घ प्रक्रियेचे पालन करावे लागायचे. मात्र, आता त्याची फारशी गरज लागणार नाही.

संबंधित बातम्या:

योगी सरकारचा मद्यविक्रेत्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय, परवाना मिळवणं आणखी सोपं

योगी सरकारचा मोठा निर्णय, 23 नोव्हेंबरपासून शाळा, कॉलेज सुरु, गाईडलाईन्स जारी

Yogi Adityanath reinstated the illegally promoted officers

Published On - 9:29 am, Sun, 10 January 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI