AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shocking : चमोली दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू, बोगद्यात अडकलेल्या कामगारांच्या गळ्यापर्यंत पाणी, बचाव कार्य वेगाने सुरू

चमोली दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला आहे. दुसऱ्यादिवशीही बचाव कार्य वेगाने सुरू आहे.

Shocking : चमोली दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू, बोगद्यात अडकलेल्या कामगारांच्या गळ्यापर्यंत पाणी, बचाव कार्य वेगाने सुरू
chamoli tragedy Image Credit source: tv9
| Updated on: Aug 14, 2026 | 10:34 AM
Share

उत्तराखंडच्या चमोली बोगदा दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 10 जणांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे. बोगद्यात मोठ्या प्रमाणात चिखल आणि पाणी शिरलं आहे. याच बोगद्यात अडकलेल्या लोकांचा शोध घेणे सुरू आहे. 10 जखमींना गोपेश्वर आणि पीपल कोटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर एका जखमीला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. काल दुर्घटना घडल्यानंतरही रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. बोगद्यात अडकलेल्या कामगारांच्या गळ्यापर्यंत पाणी आंल आहे. बोगद्यात ऑक्सिजनचे प्रमाण देखील कमी आहे. त्यामुळे बोगद्यातील रेस्क्यू ऑपरेशन थांबण्यात आलं होतं.

उत्तराखंडचे मुख्य सचिव आनंद वर्धन यांनी सांगितलं की, ‘अलकनंदा नदीवर जलविद्य्युत प्रकल्प विकसित करत आहे. हिंदुस्तान कन्ट्रक्शन कंपनीकडे या बांधकामाचे कंत्राट आबे. या प्रकल्पासाठी 3.5 किलोमीटर लांबीचा बोगदा बांधला जात होता. प्रकल्पाचे 70 टक्के काम पूर्ण झालं आहे. त्यात बोगद्यात 1.8 किलोमीटरच्या आत गुरुत्वाकर्षणाचे पॅकिंगचं काम सुरू असताना ही दुर्घटना घडली.

नेमकं काय घडलं?

उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील निर्माणाधीन बोगद्यात अचानक पाणी आणि चिखल शिरला. ही घटना गुरुवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडली. दुर्घटनेवेळी बोगद्यात 18 ते 19 मजूर काम होते. या बोगद्यात वेगाने पाणी आणि चिखल शिरल्याने मजूर आतमध्येच अडकले. या घटनेनंतर तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आलं. बचावकार्य करत काही मजुरांना सुरक्षितपणे बाहेर काढलं. काल 16 जणांचा सुखरुपपणे सुटका करण्यात आली.

दुर्घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफ, सीआयएसएफ आणि इतर यंत्रणा घटनास्थळी पोहोचल्या. या सर्व यंत्रणांनी एकत्रितपणे बचावकार्य सुरू केलं. या घटनेची तीव्रता लक्षात घेता इंडो-तिबेटियन बोर्डर पोलीस, भारतीय लष्कर देखील मदतीसाठी पुढे आले आहेत. या बचावकार्याचं काम जिल्हाधिकारी गौरव कुमार यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे.  ते देखील आता घटनास्थळी उपस्थित आहेत. सर्व यंत्रणांना महत्वाच्या सूचना देण्याचं काम गौरव कुमार हे करत आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी देखील या दुर्घटनेवर लक्ष ठेवून आहेत.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?