AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घराबाहेरच बड्या संगीतकाराची हत्या… राहुल गांधी संतापले; थेट केंद्रीय गृहमंत्रालय आणि..

मणिपूरचे प्रसिद्ध संगीतकार विक्रम सिंह यांची हत्या झाल्यानंतर संपूर्ण देशात खळबळ माजली. आता या प्रकरणावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला आहे.

घराबाहेरच बड्या संगीतकाराची हत्या... राहुल गांधी संतापले; थेट केंद्रीय गृहमंत्रालय आणि..
Rahul GandiImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Sep 08, 2026 | 12:54 PM
Share

मणिपूरचे प्रसिद्ध संगीतकार विक्रम सिंह यांच्या हत्येनंतर काँग्रेस नेते राहुल गांधींनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. दिल्लीतील या घटनेबाबत प्रतिक्रिया देताना राहुल गांधी म्हणाले की, देशाच्या राजधानीत स्वतःच्या घराबाहेर एका वडिलांची हत्या होणे हे अत्यंत गंभीर आहे. ईशान्य भारतातील नागरिकांच्या सुरक्षेबाबत दिल्लीतील कुटुंबांमध्ये चिंता निर्माण झाली असल्याचेही त्यांनी सांगितले.

नेमकं काय घडलं?

विक्रम सिंह आपल्या घराबाहेर आवाज कमी करण्यास सांगण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना मारहाण करून ठार करण्यात आल्याचा आरोप आहे. ही घटना दिल्लीसारख्या शहरात घडल्याने अनेक जणांना धक्का बसला आहे. विशेषतः ईशान्येकडील नागरिकांच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. राहुल गांधी यांनी याबाबत स्पष्ट भूमिका घेत म्हटले की, अशा घटनांमुळे दिल्लीत राहणाऱ्या ईशान्य भारतीय कुटुंबांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दोषींना कठोर शिक्षा द्यावी

वाढत्या कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नावर राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्रालय आणि दिल्ली पोलिसांच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केले. ते म्हणाले की, राजधानीत अशा हिंसक घटना घडत असताना संबंधित यंत्रणांनी वेळीच आणि प्रभावी कारवाई केली पाहिजे. तातडीने तपास करून दोषींना न्यायाच्या चौकटीत आणावे, अशी मागणीही त्यांनी केली. हत्येच्या प्रकरणात दोषींना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी सरकारने तात्काळ पावले उचलण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली.

विक्रम सिंह यांच्या हत्येने केवळ एका कुटुंबाचे नुकसान झाले नसून, संपूर्ण समाजामध्ये असंतोषाची भावना निर्माण झाली आहे. संगीत क्षेत्रात योगदान देणाऱ्या या कलाकाराच्या मृत्यूने मणिपूरसह देशभरात शोक व्यक्त केला जात आहे. राहुल गांधी यांनी या घटनेला ‘गंभीर अपयश’ म्हटले असून, कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी पार पाडण्यात संबंधित यंत्रणांकडून अपेक्षित कार्यवाही होत नसल्याचे मत व्यक्त केले.

या प्रकरणात तात्काळ आणि निष्पक्ष तपास होणे आवश्यक आहे. दोषींना शिक्षा मिळाल्यासच लोकांचा विश्वास कायदा-सुव्यवस्थेवर टिकून राहील, असे मत काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केले आहे. राहुल गांधी यांच्या या प्रतिक्रियांनंतर या प्रकरणाकडे अधिक लक्ष वेधले जाण्याची शक्यता आहे. दिल्ली पोलिसांकडून याबाबत अधिक माहिती येण्याची अपेक्षा आहे.

Follow Us
लाडक्या बहिणींना ओवाळणी मिळाली अन्... वाघ यांचा पटोलेंवर घणाघात
Chitra Wagh | लाडक्या बहिणींना ओवाळणी मिळाली अन् सावत्र भावाच्या... चित्रा वाघ यांचा नाना पटोलेंवर घणाघात
मराठा आरक्षणावर मुनगंटीवारांचा मोठा दावा; खासदारांना काय केलं आवाहन?
Sudhir Mungantiwar | मराठा आरक्षणावर सुधीर मुनगंटीवारांचा मोठा दावा; खासदारांना काय केलं आवाहन?
बिनबुडाचं गाडगं... बिना पेंदे का लोटा! सदावर्तेंनी जरांगेंना डिवचलं
बिनबुडाचं गाडगं... बिना पेंदे का लोटा! गुणरत्न सदावर्तेंनी जरांगेंना डिवचलं
नरेंद्र मोदी हे गुजरातचे पंतप्रधान आहेत का? संजय राऊतांचा थेट सवाल
Sanjay Raut | नरेंद्र मोदी हे गुजरातचे पंतप्रधान आहेत का? संजय राऊतांचा थेट सवाल; पुढे म्हणाले, देशाचे कॅबिनेट...
श्वेता महालेंना प्रत्युत्तर देताना संजय गायकवाडांची जीभ घसरली! म्हणाले
Sanjay Gaikwad | श्वेता महालेंना प्रत्युत्तर देताना संजय गायकवाडांची जीभ घसरली! म्हणाले...
रात्री 2 वाजेपर्यंत वर्षा बंगल्यावर खलबतं! मराठा आरक्षणावर सरकारची...
Maratha Reservation | रात्री 2 वाजेपर्यंत वर्षा बंगल्यावर खलबतं! मराठा आरक्षणावर सरकारची महत्त्वाची बैठक; फडणवीसांसह...
डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट
Aishwarya Jadhav Dancer | डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट...
दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
Dancer Radha Patil News | पुण्यात दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
Baramati | बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं स्वतंत्र पॅनल; सोमेश्वर कारखान्याची निवडणूक रंगणार
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर