AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अखेर मोनिंदर सिंग मोनीला अटक; लाल किल्ला परिसरात हवेत भिरकावलेली तलवारही जप्त

प्रजासत्ताक दिनी लाल किल्ला परिसरात झालेल्या हिंसेतील मोस्ट वाँटेड आरोपी मनिंदरसिंग मोनीला अखेर 21 दिवसानंतर अटक करण्यात आली आहे. (Wanted accused in Red Fort violence case arrested)

अखेर मोनिंदर सिंग मोनीला अटक; लाल किल्ला परिसरात हवेत भिरकावलेली तलवारही जप्त
| Updated on: Feb 17, 2021 | 4:14 PM
Share

नवी दिल्ली: प्रजासत्ताक दिनी लाल किल्ला परिसरात झालेल्या हिंसेतील मोस्ट वाँटेड आरोपी मनिंदरसिंग मोनीला अखेर 21 दिवसानंतर अटक करण्यात आली आहे. 30 वर्षीय मोनी हा व्यवसायाने मॅकेनिक आहे. पोलीस निरीक्षक पवनकुमार आणि करमबीर यांच्या पथकाने मोनीला काल 16 फेब्रुवारी रोजी सीडी ब्लॉक पीतमपुरा येथील बस स्टॉपवरून ताब्यात घेतलं. त्याच्या घरातून लाल किल्ला परिसरात हवेत भिरकावलेली तलवारही जप्त करण्यात आली आहे. (Wanted accused in Red Fort violence case arrested)

स्वरुप नगर येथील मोनीच्या घरातून 4.3 फूटाच्या दोन तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत. लाल किल्ला परिसरात हिंसा घडली तेव्हा या परिसरात मोनीने तलवार नाचवून धुमाकूळ घातला होता. त्याचा एक व्हिडीओही व्हायरल झाला असून तो लाल किल्ला परिसरात तलवार नाचवत असल्याचं दिसत आहे. पोलिसांच्या दाव्यानुसार, मोनी हा तलवार नाचवून जमावाला पोलिसांवर हल्ला करण्यासाठी उसकवत होता. त्याने भडकावणाऱ्या अनेक पोस्टही केल्या होत्या. शेतकरी आंदोलना दरम्यान तो सिंधु बॉर्डरवर जात होता. तिथे दिल्या जाणाऱ्या भाषणांमुळे तो अधिक प्रभावित झाला होता, असं सूत्रांनी सांगितलं.

लोकांना उद्युक्त केलं

तो राहत असलेल्या स्वरुप नगर परिसरातील 6 लोकांना ट्रॅक्टर रॅलीत सहभागी होण्यासाठी त्याने उद्युक्त केलं होतं. तशी कबुलीही त्याने दिली आहे. हे सहा लोक बाईकवरून सिंधु बॉर्डर ते मकबरा चौकापर्यंत जाणार्या ट्रॅक्टर रॅलीमध्ये सहभागी झाले होते. दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार, मोनीने पाच सहकाऱ्यांसह इतर दोन लोकांसोबत मिळून लाल किल्ल्यात घुसखोरी केली होती. तिथे त्यांनी तलवारबाजी केली होती. त्यामुळे काही लोकांना स्फूरच चढलं आणि त्यांनी पोलिसांवर हल्ला केला.

तलवारबाजीचा क्लास

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मोनी हा स्वरुप नगरमध्ये एक क्लास सुरू केला आहे. त्यात तलवारबाजी कशी करायचे याचं प्रशिक्षण दिलं जातंय. त्याच्या फोनमधून लाल किल्ल्यातील घटनेचा व्हिडीओही सापडला आहे. (Wanted accused in Red Fort violence case arrested)

संबंधित बातम्या:

पंजाबमध्ये भाजप भूईसपाट, तर हरसिमरत कौर यांच्या मतदारसंघातच अकाली दल बॅकफुटवर!

Farmer Protest : शेतकरी आता रेल्वे रुळावर उतरणार, 18 फेब्रुवारीला 4 तास ‘रेल्वे रोको’

‘अहंकाराची खुर्ची सोडा आणि शेतकऱ्यांना त्यांचा हक्क द्या’, कृषी कायद्यांवरुन राहुल गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

(Wanted accused in Red Fort violence case arrested)

इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.